रविवार, २८ डिसेंबर, २०२५

जुनी बिल्डिंग

 


आज एक मित्र भेटायला आला होता.छान गप्पा झाल्या.मी आधी रहायचो ती जागा त्यानं घेतली होती. मग तो हि सोडून मुंबईत गेला.आपली जुनी बिल्डिंग आहे का रे अजून?म्हटल चल दाखवतो.इमारत अजून तग धरून शेवटची घरघर सहन करत उभी आहे.अंगभर भेगांच्या जखमातून शरीराच्या नसा
भासत असलेल्या लोखंडी शिगा उघड्या पडलेल्या लेऊन.सर्वांची दारे निखळून पडलेली. एका दारावर मराविम.
ची नोटीस अजूनही काळी अक्षर फिकट असली तरी दाखवत होती.
होती.
एकेकाळी जिवंत असलेली वास्तू माणसाविना भकास झाली आहे.
सर्व घरातली माणसं आठवली.एकत्र जगलेले आयुष्य आठवल.सर्वात महत्वाच म्हणजे आम्ही तीन मित्रांनी त्या जागेत एकत्र केलेला तासनतास रियाज,एकमेकांची केलेली मस्करी,मारलेल्या गप्पा सगळ जसच्या तसं आठवल.
मित्रा,तू वॉल टू वॉल लावून घेतल्यास त्या टाईल्स बघ अजूनही तश्याच आहेत रे.
हो.त्यावेळी लाख भर रू खर्च करून लावल्या होत्या.
म्हटल त्या अजूनही ईमान राखून आहेत शाबूत.बाकी इमारत मात्र वार्धक्याने,दुर्लक्ष झाल्यामुळे फक्त शेवटचे श्वास घेत आहे.
त्या जराजर्जर वास्तूला सोडून निघालो.आज फक्त तिचा निरोप घेतला होता.पण ती जेव्हा पूर्ण नामशेष होईल तेव्हा मात्र आमची सगळ्यांच्या आठवणींच्या जुन्या खुणा बेघर होतील.पण नाही.त्यांना आमच्या मनात आम्ही असू तोवर तरी रहायला कायमची जागा नक्की राहील.शेवटी महत्त्व वास्तूला नसून तिच्यात राहणाऱ्या माणसांचं असत.दगड विटा सिमेंट नुसत्या भिंती तयार करतात.पण त्या रहाणारी माणसं आणि त्यांच्यातल आपसातील नातं त्या वास्तूला घर करतात.त्या घराला मग घर मिळत ते माणसांच्या मनात.

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

मे महिन्याची आठवण.



कंच हिरवा रंग तिचा

 निवळू दे की जरा थांबा।

नका न पाडू अजून

हुंदे ( होऊन दे ) की तिचा आंबा।


पोयनाडला मित्राकडे झाडाचा मोहोर चांगला बाजलाय. मे महिन्याची चाहूल निसर्ग देऊ लागलाय. साली करवंदाची जाळी ही पिकेल. निसरडी जांभूळ फांदी फांदीत भरेल. रोज बकुळ अंगण भर पसरेल. परसातील आवळी हिरवी हून ( होऊन ) जाईल. बिट्टी गुडघ्याला बाशिंग बांधून पिवळी धमक होईल. मागच्या अंगणात तो मोरकिडा जमिनीत भोवरा फिरवल्या सारखं भोक करील. पांढरा चाफा भिरभिरत अलगद जमिनीवर उतरेल. कुठंतरी लपून हिरवा चाफा दरवळून जाईल. विहीर मात्र उन्हाच्या तडाख्याने हैराण होऊन खाली खाली जाईल! ,,,,

पण आम्हाला हे काहीही अनुभवता येणार नाही! 😔


असो पण कधीतरी अनुभवलेलं आजही मजा आणतं. ज्या मुलांना हे माहीतच नाही त्यांच्या बद्दल खंत वाटते. त्यांच्या नशिबी हे सुख नाही.


बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

कमाल

 आखे ऐसी के गेहरी ताल

मोहिनी सुरत लंबे बाल 

चले है ऐसे हिरन कि चाल

गोरे गोरे गुलाबी गाल

जो भी देखे केहने लगे

उफ ये कमाल है बा कमाल



काल सिंहासनी  सुचली.

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

तलखी.

 लाईट गेलेत.खूप उकडतंय.घराची आठवण आली.तिथ सेम असंच असायचं.लाईटचा भरोसाच नाही.नेमक दुपारी आणि रात्री गायब.पण आता ब्लॉक मध्ये आणि त्या वेळच्या घरात यात बरीच तफावत आहे.

तेंव्हा,बाहेर पडवी च्या गजाना बाबांनी पडदे करून लावले होते.त्यावर मस्त पाणी शिंपडून घ्यायचं दुपारी जेवण झाली कि. अंगणातून झळ मारत असते गरम हवेची ती मग जाणवत नसे.उन्हाळा जरा कमी दाहक होई.आमचे तात्या तर उकाडा कमी करायला अंगावर पंचा ओला करून पांघरत. मग त्यांनी पूजेकर्ता वापरलेल्या चंदनाचा आणि फुलांचा सुगंध त्यांच्या भोवती दरवळू लागे. मी नी बाबा पण तसच करत असू.झोप झाली कि झोपाळ्यावर झोके घेत बसायच.माज घरात सारवलेल्या जमिनीवर अंग टाकून झोपलं कि गार वाटे.बाळंतीणी च्या खोलीतून आढी तले आंबे सुवासाने आमंत्रण देत.चहा झाला कि सर्व जण मागच्या पडवीत किंवा स्वयंपाक घराच्या उंबऱ्यात पिकलेल्या आंब्यांची रोवळीच घेऊन बसत.चुपून आंबे खायचे नी साली बकुळीच्या अंगणात टाकून ठेवायच्या. मग गोळा करून गायी बैलांना द्यायच्या. अख्खे रायवळ आंबे पण गुरांना देत असू.आवाडात मागच्या आंब्यावर कोकीळ कुहू कुहू करत बसे.

अंगणात पाणी शिंपडलं कि मस्त वाटे.संध्याकाळी कुपणी पलीकडील मोठ्या झाडाची पडलेली जांभळ वेचायला जायचं.मित्रांसोबत भरपूर खेळून दमल कि त्याच झाडा पुढून गेलेल्या रस्त्याच्या बैल गाडी नी st जाऊन पडलेल्या चाकोऱ्यात असलेल्या मऊ पण गरम लाल मातीत पाय बुडवून बसायच.मग पाय दुखत असतील तर बर वाटे.आणि गुर पाण्यावर न्यायची.तळ्यात आधी उभ राहून ती पाणी पिताना बघायला मस्त वाटे.बैलगाडी तळ्यात बैला सह उतरवून गुडघा भर पाण्या उभी करायची.मग बैलांना काथ्याच्या घासणी न घासून अंघोळ घालायची.बैल देखील सुखावून हि सेवा करू देत.तोवर उन्ह उतरली असत.संध्याकाळ वेगळी असे.

आत्ता सगळं आठवलं.पण आता ते सगळं नाही.उरली फक्त तलखी.


बुधवार, ३ एप्रिल, २०२४

लय

 तबल्याची किंवा गाण्याची मैफिल संथ लयीत सुरु होऊन मध्य नी मग दृत लयीत संपते.

पण आता वाटत,आयुष्याची मैफिल मात्र उलट प्रवास करते.बालपण, तारुण्य,दृत लयीत केंव्हा गेल समजतच नाही.मग मध्यवय आलं कि आयुष्य मध्य लयीत प्रवेश करत.मग येणार वार्धक्य शेवटी इतकी विलंबीत,संथ लय पकडत कि मैफिल शेवटा कड आली तरी संपता संपत नाही.


काही नाही,सहज आलं मनात.मध्य लयीत आहोत तिथंच मैफिल संपावी वाटत.हा उलट लयी चा प्रवास इथवरच ठिक. पण संगीतात रसिकांची इच्छा मैफिल लांबवते.आयुष्यात मात्र देवा च्या इच्छे वर भैरवी कधी ते ठरत.

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

दिवाळी

 

दिवाळी.
सणांची चाहूल आता tv आणि इतरत्र जाहिराती वरून लागते.
अलार्म काका ची जाहिरात बघितली नी दिवाळी जवळ आल्याची जाणीव झाली.
अश्या वेळी मग मन भूतकाळात जात.
गावाकडच मोठ घर.सभोवती भरपूर चौ.फु.जागा इतकी कि...
आधी शाळेत दिवाळीच्या अभ्यासाची वही सजवायची असे.
मुंबईत चाळीत आणि रस्त्यावर लगबग सुरु होई.बाजार पेठ बहरात आजही येते.पण त्यावेळच अप्रूप वेगळच होत.महागाई तेंव्हाही होती पण आजच्या इतकी जाणवत नव्हती मध्यम वर्गास.फटाके शे दीडशे मध्ये खूप येत.त्या लड्या एकदम न वाजवता सुट्या करून एकेक पुरवून फोडायची पद्धत होती.व्यापारी मात्र रस्त्यावर फटाक्याचा ढीग फोडत.
किल्ले व्हायचे बच्चा कम्पनीचे.गावी मस्त सारवलेली अंगणी भुरळ घालत.रात्री तिथ मांडवा खाली झोपायची ऐश उपभोगलीय याच समाधान आजही वाटत.
गावी व्यापारी लोक आजोबांना शिधा आणि टोपली भर फटाके घर पोच करत.फराळ तयार करायला शेजारणी मदतीस येत एकमेकींच्या.जाताना आणि दिवाळीत फराळाची देवाण घेवाण होत असे.अंघोळीस कुणी बसला कि अंगणात फटाके वाजत.घरीच केलेला पारंपरिक बांबू चा कंदील झक्कास दिसे.
मुंबईत आयते मिळत.चांदणी तीही फोल्डिंग ची फेमस होती.
एक आठवण आजही कोरून राहिलीय मेंदूत.
माझा मामा तेंव्हा गावाहून मुंबईस आमच्याकडं आला.तेंव्हा 15 वर्ष्य वय असावं त्याच.नोकरी नव्हतीच.आई वडील गेलेले लहानपणी म्हणून बाबांनी त्याला गावच्या घरी आणलं.तो तिथ आजी आजोबा सोबत राहत असे.आजोबानी प्रवास खर्च आणि थोडे जास्तीचे म्हणजे विस पंचवीस रु त्याला दिले होते.तो यायच्या आधी आई खुश होतीच पण तिन मला सांगितलं,मामा येतोय पण त्याला त्रास द्यायचा नाही हट्ट करून कसलाही म्हटलं,मी कधी कुणा कड तसा हट्ट केलाय का?
तस नाही रे.पण त्याला खर्चायला पैसे नसतात.तो कमवत नाही न अजून.तात्यांनी उतार खर्च दिला असेल तितकाच.
तू नको काळजी करू.मी नाही काही मागणार त्याच्या कड.
आणि एक दिवस आधी मामा आला.आजही लख्ख आठवतंय मला.किरकोळ शरीर्यष्टी चा मामा दोन जड पिशव्या घेऊन आला.खूप आनंद झाला तो आला म्हणून.मग आईन सांगितल्या प्रमाणे मी गप्प बसलो.त्याच चहा पाणी झाल नी तो मला म्हणला,तू का गप्प?ये इकडं.
आणि त्याम एक पिशवी मोकळी केली.त्यात आजीन दिलेला फराळ,मेतकूट अस काय काय होत.आणि दुसरी पिशवी मात्र मला जवळ घेऊन उघडत म्हणला,हे तुझ्या करता.
चक्क फटाके होते त्यात.इतक मस्त वाटलं.मग त्यातलं एक पाकिट काढत तो म्हणला,हे बघ हे विशेष आहे.नवीन आलंय अस दुकानदार म्हणाला.बघितलं तर ते स्वस्तिक च्या आकारातलं भुई चक्र होत.पेटवलं तर प्रत्येक दांडी वेगळी पेटली आणि उलट सुलट फिरली बराच वेळ.
आई म्हणाली,अरे इतका खर्च का केलास?कुठून आणलेस पैसे.
अगो तात्यांनी दिले मला त्यातले वापरले.मी कुठून आणणार पैसे?
अरे मग तुलाच ठेवायचे त्याला फटाके का आणलेस?
असू दे.भाचा आहे माझा तो.मग मला जवळ घेऊन एक पापी घेतलीन.त्या दिवशी इतका आनंद झाला ते चक्र बघून कि सांगता येत नाही.आणि तस चक्र दादरला देखील आलं नव्हतं म्हणून जास्तच खुशी.
पण आता इतकी वर्ष गेल्यावर आणि आयुष्याच्या थपडा खाल्ल्यावर त्या प्रसंगाचा वेगळा अर्थ समजून मामाला मनापासून दंडवत असत माझं.
लहानपणी आई वडील गेले.आधी वडील गेले.त्यांच्या घरी अन्न छत्र होत.रेवदंडा समुद्र किनाऱ्या लागत त्यांच घर होत.नारळाची वाडी होती.दुध दुभत घरच होत.पावसाळा सोडला तर बंदरात बोट लागली नी माणस उतरून जाऊ लागली कि आजोबा तिथ जाऊन मोठ्या आवाजात,कुणी अतिथ आहे का?अशी हाक देत.कुणी परगावं चा प्रवासी असेल तो हो म्हणत असे.मग त्याला घरी घेऊन येत.जेवायला वाढून दक्षिणा देऊन तृप्त करत.मग तो पुढील प्रवासास जाई.
तर अस सुरळीत चालू असता आजोबांची दृष्टी अचानक गेली.मग आजारपण त्यांना घेऊनच गेल.नातलगानी फसवलं. रहात घर सोडून म्हणजे,आल्या किमतीस विकून आजी मामाला घेऊन पेणं ला भाड्यान घर घेऊन राहिली.जिच अन्न छत्र होत,साई बाबा जिवंत असताना तिन लहानपणी शिर्डीत राहून त्यांची सेवा केली होती त्या बाईवर हि परिस्थिती आली.का? दैव कस वागेल सांगता येत नाही.मग आजी 4 घरी स्वयंपाक करून दिवस काढत होती मामा सोबत.मामाला काही ब्राह्मणांनी वार लावून दिले होते आपणहून.म्हणजे,रोज त्यांच्या दारी जाऊन ओम भवती भिक्षांदेही म्हणायचं.मग झोळीत घर धणीन जे वाढील ते घरी घेऊन यायच.आणि रोज फक्त एकच घर.तिथ जे मिळेल तेच .या श्रमान किंवा मला वाटत मानसिक खचून आजी लवकरच गेली.मामा एकटा पडला.मग बाबा आजीच्या दिवस कार्यास गेले ते त्याला घेऊनच आले.मग तो आमच्या गावी बरीच वर्ष राहिला.आजी आजोबांची सेवा केलीन.तिथ एकूण तीन वृद्ध माणसां ची त्यानं अहोरात्र सेवा केली.शेवटची दुखणी काढलीन.मग तो आमच्याकडं मुंबईत आला तो आजही माझ्या सोबत आहे.तो मला मामा न वाटता मोठा भाऊ वाटतो आणि आतातर वडिलांच्या जागी आहे.तिकड त्या माणसाचं केलंन तसच इकडं आमच्या घरी त्याच्या ताई च आणि मेव्हण्यांचं शेवटच आणि दीर्घ आजारपण देखील त्यानं काढलं.आम्ही यावेळी त्याच्या जोडीला होतो.तरी त्याची कमाल आहे.
आज त्याच वय 75 असावं.आजही पहाटे उठून कामाला लागतो.याच काम कमी व्हाव म्हणून मी केल तर हा दुसर काम करत बसेल.कधीही चिडत नाही.शांत असतो.कुणीही हाक मारली तरी हा जाऊन मदत करणारच.याला कसलं व्यसन नाही.कुठली छान छोकी नाही.फक्त रोज पेपर लागतो.
आजवर एकदाही त्याच्या तोंडून निराशेचा बोल ऐकला नाहीये.कधीही म्हणला नाही कि,काय साल नशीब आहे माझं!इतक सगळं माझ्याच वाट्याला का?अजिबात चकार तक्रार नाही.अजात शत्रू आहे.जातो तिथ सख्य होत याच.
त्या वर्षी दिवाळीत मला फटाके त्यान् आणलेन त्यातून आणि त्याच्या दीर्घ सहवासातून  मी  शिकलोय कि,
आपली ऐपत नसली तरी आपल्या वाटच आपल्या माणसाशी वाटून घ्यावं नव्हे तर त्याला ते देऊन टाकाव.कितीही विपरीत परिस्थिती असली तरी तोंडातून निराशा आणि संतापाचे बोल काढायचे नाहीत.सतत पडेल ते काम करत आनंदी रहावं .
पण मला ते त्याच्या सारखं खरच जमत नाही अजून.
कुणी माझ्याशी नीट वागला नाही मी नीट वागूनही तर मला चिड येते.मामा मात्र शांत राहील.उलट कुणी याला बेदम चोपला अकारण तरी हा त्याला म्हणेल,खूप दुखले असतील हात तुझे दाबून देऊ?
मामा हेच मला पटत नाही तुझं.अरे गांधी नी शाम व्हायचे दिवस गेले आता.जशास तस वाग.पण ते तुला जमणार नाही हे देखील कळतंय.तेंव्हा नको.तू आहेस तसाच रहा.मी जिवंत आहे तोवर त्या दिवाळीत तू मला दिलेला आनंद मला आयुष्य भर पुरेल रे.त्या करता दिवाळीची आवश्यकता नाही.रोज दिवाळीच असते अश्या आठवणींची.

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

* तारुण्याच्या वेशी वरच्या सर्वांस*

 या वयात नवे पंख फुटतात.ते उत्सुकतेचे,शिक्षणाचे,धाडसाचे असे असतात.उत्साह खूप असतो.धोक्याच वळण देखील इथंच असत.या वळणावर जर गाडी घसरली तर पुन्हा मार्गावर येण खूप कठीण असत.बरेचदा आयुष्य नासून जात.फक्त एकच व्यक्तीचं नव्हे,तर कुटुंबाचे देखील.

व्यसन खुणावतात ती याचं वयात.त्या पासून दूर रहा.जाहिरातदारांना तुम्ही कस जगावं हे शिकवू देऊ नका.एखादा हिरो जाहिरातीत मस्त कपडे घालून,आलिशान गाडी चालवत सिगरेट ओढतांना बघून फसू नका.तस करण म्हणजे पौरुषत्व नसत.

पण मला दुसरी धोक्याची जागा सांगायचीय.

ती म्हणजे प्रेमात पडायची.तस होण साहजिक आहे.फक्त प्रेम म्हणजे काय? हे समजत नसत.बरेचदा ते शारीरिक आकर्षण असत. सहवासाने माणूस उलगडत जातो.कधी बरीच वर्ष जाऊन देखील अस होत नाही.तेंव्हा या वयातच हे ठरवावं कि, इथून पुढ प्रत्येक महत्वाचा निर्णय बुद्धी वर घासून घेईन.भावनेच्या आहारी जाऊन नाही.

जोडीदार आपल्या एकूण स्थितीला योग्य आहे का हे बघावं.

त्याची शरीर भाषा अभ्यासावी.त्यातून माणूस बराच प्रगट होत असतो.अधिकार गाजवत राहणारा आहे का? आपण जसे आहोत तसे स्वीकारणारा आहे का? संयमी आहे का?आपल्या मताची ,आवडीची किंमत ठेवणारा आहे का?अस बरंच तपासून पहावं. मग निर्णय घ्यावा.कारण हे नात आयुष्यभर सांभाळायचं आहे.नातेवाईक निवडून घेता येत नाहीत.मात्र मित्र नी जोडीदार निवडता येतात.

आणि समजा काही दिवसांनी बिनसलं,ब्रेकप झाला तर दुनिया संपत नसते हे नक्की.जन्मा पासून आपल्याला वाढवणारे जन्मदाते असतातच कि आपल्या सोबत.मित्र मैत्रिणी सुद्धा.त्यामुळं अचानक कुणीतरी आपल्या आयुष्यात येतो नी आपल्याला सोडून जातो तर जाऊ दे कि.त्या एक माणसा करता आपण आपल नी कुटुंबाच आयुष्य का खराब करायचं? तुम्हांला वाढवायला आई वडिलांनी मेहनत घेतलीय.शिक्षण आणि इतर उत्तम गोष्टी अंगीकरून तुम्ही स्वतः आपल व्यक्तिमत्व उभ केलंय.ते अस कुणा एकाच्या करता वाऱ्यावर सोडायला नक्कीच नाही.

हे लिहायचं कारण,

माझा भाऊ प्रेमात पडला.आम्ही घराच्यांनी काहीच आडकाठी घेतली नाही.पण त्या दोघांच आपसात काही बिनसलं.ती मुलगी घरी येऊन सांगून गेली,मला हा नकोय.आत्ता अस वागावतोय पुढ काय करेल?

बस्स.तिथ पासून बंधूनच वागणं बदललं.रागीट झाला.सारासार विचार संपला.उलट सुलट विचार करून तिचे भास होऊ लागले.स्किझोफ्रेनिया चा पक्का रुग्ण झालाय.हॉस्पिटल मध्ये शॉक ट्रीटमेन्ट झाली मग जरा हिंसक कमी झाला.बरंच भोगावे लागतंय मला अजूनही.आई बाबा गेले.मी लग्न केलच नाही.कारण याचं वागणं बेताल असत.सगळं नाही सांगत बसत.पण जिवंत नरक भोगत आयुष्य काढतोय.एका वेड्या सोबत त्याच्या लहरी नुसार .

तेंव्हा ब्रेकप न खचून जाऊ नका.आयुष्य कुणासाठी थांबत नसत.वेळ निघून गेली तर ती परत येत नाही.आपणच आपले नसतो.आपल कुटुंब देखील या आगीत अकारण होरपळून निघत याची जाणीव ठेवा.

आणखी एक गोष्ट मुलींकरता.

हल्ली लव्ह जिहाद सुरूय.तो खरा हि आहे.केरला स्टोरी बघून घ्या.

कंव्हर्नजन् सिनेमा देखील बघा.

आपला धर्मच उत्तम आहे.तो धर्म स्वीकारे पर्यंतच ,मेरा अब्दुल ऐसा नही है म्हणू शकाल.एकदा लग्न झाल कि किंवा मुलगी झाली नी मोठी झाली कि त्यांचं खर रूप समजेल.पण वेळ गेलेली असेल.

 बरेचदा हे आधीच हळूहळू सुरु होईल.तु जरा दुपट्टा डोक्यावरून घे न.कुणाशी बोलत होतीस फोन वर इतका वेळ?अस पझेसिव्ह वागणं सुरु होईल.आधी धर्म बदलला नाहीस तरी चालेल म्हटलं जाईल.पण मग निदान अम्मी कि खातीर नमाज शुरु करो अस म्हटलं जाईल.घरचे लोक टोमणे सुरु करतील.हळूहळू धर्मांतर केलच जाईल.

त्या धर्मातील धक्कादायक गोष्टी आपल्याला माहित नसतात.त्या करता एक्स मुस्लिम लोकांचे व्हिडीओ युट्यूब वर बघा.उदाहरण म्हणूंन सांगून ठेवतो त्यांचे व्हिडीओ बघा.हे मुस्लिमच होते.पण जसा धर्माचा अभ्यास केला तशी त्यातलं खर स्वरूप त्यांना कळलं.आणि कुणी यात नव्याने फसू नये आणि जे त्या धर्मात आहेत त्यांना खर कळावं म्हणून स्वतः चा जीव धोक्यात घालून हे लोक समाज जागृतीच काम करतायत.एक्स मुस्लिम साहिल आणि एक्स मुस्लिम adam seekar हे ते दोघे.यांच्या कडून नुसतच त्या धर्माच खर स्वरूप कळेल इतक नाही.तर एखाद्या गोष्टी चा कसा अभ्यास करावा नी मग त्या गोष्टी वर वाद विवाद कसा अभ्यास पूर्ण करावा याचं उत्तम उदाहरण मिळेल.साहिल शांत पण ,समजूतीन पटवतो.adam मात्र रोखठोक आहे.समोरचा ज्या पातळीवर असेल तस बोलतो.पण दोघांचा अभ्यास मात्र कमालच आहे.

शेवटी खास करून मुलींनी,स्त्रियांनी सोबत मुलांनी देखील आपल बँक खात आपणच सांभाळावं.वाढवावं.त्याच्यात कुणाचीही भागीदारी नको.मुलींनी घरावर आपल नाव घातलं जावं याची कटाक्षाने दखल घ्यावी.मी पुरुष असून देखील सांगतो कि,पुरुषांचा भरवसा नाही.कधीही म्हणतील,हे घर माझं आहे.इथ मी म्हणीन तेच होईल.पटल तर रहा नाहीतर चालू पडा.

आपली पूर्ण आर्थिक सुरक्षा जपूनच रहायचं.म्हणजे कुणी उगा अधिकार गाजवत नाही.एखादी कला किंवा स्किल नक्की आत्मसात करावं.जे तुम्हांला अर्थार्जन कधीही कुठंही करून देईल.नोकरीला निवृत्ती असते.स्किल ला नाही.

जमेल तितकं मिळून मिसळून रहावच.थोडी आपल्या मताला मुरड हि घालावी दुसऱ्य करता.पण जोवर आपण गुलाम होत नाही तिथवरच.

आपले फक्त आपणच असतो दुसरं कुणीही नाही.बिरबलाची माकडीणीची गोष्ट खरी आहे.नाती ताणली जात नाही तोवर छान वाटतात.तणाव वाढला कि तुटतात तेंव्हा कळतात.अशी नाती तुटलेलीच उत्तम.

अनेक शुभेच्छा सहित...


शनिवार, ३ जून, २०२३

एका मागणीची गोष्ट.

 वट सावित्री पूजन दिसलं आज सर्वत्र.

काल फणस येऊन पडले रस्तोरस्ती तेंव्हाच जवळ आलीय अस जाणवलं.

घरी पोचलो.निवांत झालो नी एक कल्पना सुचली.

आज पोरी गटवायला पोर काय करत असतील? कुठली प्रश्नोत्तर होत असतील? चालू वर्तमान काळ चालू घडामोडीत येतोच.तेंव्हा ,

 विल यू मॅरी मी,आज कस होईल?याच कल्पना चित्र तयार झाल.ते पेश करतोय.राजकीय हेतू नाही.प्रसंग पूर्ण पण काल्पनिक आहे.त्याचा कुठ संदर्भ नाही पण लागल्यास तो योगायोग समजावा.टाकतो,

                        *एका मागणी ची गोष्ट !*

कॉलेज मध्ये धीर करून तिला त्यानं लॉबी मध्ये कुणी बघत नाही अस पाहून थांबवलं.

थांब न जरा .

काय आहे?

तुझ्याशी मन कि बात कर्नी है.

हो ओ ss अले अले.

पेहले शिक्षा पे चर्चा

फिर

परीक्षा पे चर्चा

फिर

मन कि बात.त्यात रोजगार वार्ता.मग तुझा विकास किती झालाय बघीन.मग साथ द्यायची कि नाही ठरवीन.

अरे पण अजून शिक्षण पूर्ण झाल नाहीये आपल नी तू विकास आणी त्यावर साथ बोलतेस.समज नाही झाला विकास तुला हवा तसा माझा तर?

अगली बार तेरी हार😀

अस कस बोलू शकतेस?

अरे,मुलगी शिकली, प्रगती झालीय.

पण मला काहीच नाही जमलं तर,पकोडे तळीन, चहा विकिन.


बाबू,हर चाय वाला pm नही बनता.

तू तळ हा पकोडे मी एखाद दिवशी येईन चव बघायला.


तू अस नको बोलू.पकोडा तळण काय रोजगार नाही होत?


पॅकेज कितीच होऊन होईल तुझं?

कस सांगू?नशीबावर अवलंबून आहे.


मग घर कस घेशील?मुलांना शाळेत कुठल्या घालशील?त्या आधी कुठल्या हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी करता नाव घालशील माझं?

सोप्पय.

म सांग इसकटून.

आपण गुजराथ मध्ये स्थलांत्रित होऊ.

त्यानं काय होईल?

मी जे कमवेन त्यात भागेल.मॉडेल आहे गुजरात च न!

तुझं नाव पालिकेच्या रुग्णालयात् टाकणार.तिथ तुला दर महा फुकट तपासणी . दर महिन्यात स्वतः ची नी मग बाळाची कशी काळजी घ्यावी याची सचित्र मार्ग पुस्तिका मिळेल फुकट. डिलिव्हरी च्या वेळी पेशल गाडी गुलाबी रंगाची तुला न्यायला एक फोनवर येईल.परत सोडायला हि येईल.परिचारिका दर महिना विचार पुस करायला येतील.औषध फुकट.टॉनिक फुकट.

मुलगी झाली तर ठरावीक रक्कम धन लक्ष्मी योजनेत जमा होईल बँकेत.

शिक्षण फुकट.लग्नाच्या वेळी पण लाखभर मिळतील.pm योजनेत घर स्वतात मिळेल.पाईप गॅस कमी दरात.सोलर छतावर बसवलं कि वीज जवळपास फुकट.जास्तीची जमा होईल त्याचे पैसे वळते होतील.

तुझ्या नावावरच घर घेईन.म्हणजे आणखी सबसिडी लागू होईल.

सोलर ला मिळाली तशी.आपल्याला काही रोग झालाच तर सरकारी हॉस्पिटल मध्ये इलाज फुकट.

मग माझ्या भजी तळून मिळेल त्यात आपल भागेल कि नाही माझे भागू बाई?

अरे अस कस?

आता आहे तस तर तिकड.

कस शक्यय?

का नाही?

निवडणुकीत बोलतात ते सगळं तू मनावर घेतोस कि काय?

तू नाही घेत?आणि एखाद मॉडेल सेट केल्या शिवाय पुढचे प्रोजेक्ट कसे मिळणार?तेंव्हा तिकड आहे तस.

पण महाराष्ट्रात कुटुंब प्रमुख असून सुद्धा नाही तस . नी तू म्हणतो तिकड आहे तस?!?!

जाऊन बघूच न आपण.मग कळेलच.

आणि नाही जमलं तर?

पदरी पडलं कि सगळं पवित्र होताना बघत नाहीस का तू?

शी बाबा.तू म्हणजे अस्सा आहेस न,बोलण्यात पटाईत ..

मग मै ये रिश्ता पक्का समजू?

हो,बाकी कुणावर नसला तरी तुझ्यावर विश्वास आहे रे माझा.गुजरात का?कुठंही राहू आपण.प्रेम टिकलं कि संसार टिकायला अजून काय लागत?

वट सावित्री  दिनी आमच्या नायक नायिकेची कथा अयशस्वी कशी होईल.सो हॅप्पी एंडिंग.आणि ते राजा राणी सुखान नांदू लागले.त्यांना जस यश मिळालं तस सर्व प्रेमिकास मिळो.कुणाचाही लव जिहाद न होवो.

वसुधैव कुटुंबकम सुखान नांदो अशी त्या प्रभू चरणी प्रार्थना.



शनिवार, ६ मे, २०२३

सावंत कुटुंबीय.

 

मित्र परिवार नंबर दोन.

यांचं घर आणि त्यात ओटीवर ठेवलेलं बाकड हा आमचा अड्डा होता.

कुटुंब दादा,मामी,आजी आणि सावन्त भावन्ड अस कुटुंब.

विवेक,संजय,अविनाश आणि वंदना अशी मुल दादांची.

मोठा विवेक नाव सार्थ करणारा.तसा अबोल.कधी तक्रार म्हणून कसली नाही.अवी च्या पायाला भिंगरी लागलेली.सर्वत्र आणि सर्व ठरात वावर.घरात कमीच तो.ओळखी भरपूर.

संदीप लहान.तो त्याच्याच् नादात असणार.कामाला वाघ पण मनात नसलं तर संपलं.

वंदू कामसू,समजूतदार आणि लाजाळू .पण तशी खोडकर पण.आमच्या सर्व शेजारी असणाऱ्या मुल मुली एकत्र कुटुंब असावं तस नात होत.एकदा होळीला आम्हा मित्रांना आईन भेळ करून पार्टी दिली.आणि मुलींना बोलवायच राहील.तर वंद्या नी तिच्या मैत्रिणी न रात्री दारात मोठ मोठे दगड आणून रचून ठेवलेले.मग विचारलं तर म्हणली,त s तुम्ही पार्टी करा आम्हांला बोलवू नका मग असंच करणार आम्ही.

नंतर एकदा त्यांच्या घरून मी निघत होतो.सापाला नाही पण झुरळ मला आवडत नाही हे तिला कळलं होत.अचानक आतून थांब रे म्हणत आली.काय विचारलं तर हातात काडे पेटी ठेवलीन.हे काय?

काय नाय तुला दिली ती जा घेऊन.

मी उघडून बघितलं तर मोठ झुरळ बाहेर आलं.मी तशीच टाकून पळालो वेस्कटी कड.वंद्या तुला बघतो थांब नंतर म्हणत.अशी खट्याळ हि.आजही न चुकता राखी येते तिची.पोस्ट कृपेने मला मिळत नाही कधी ते वेगळं.

राहिला तो आमचा संजू बाबा.

हा पण रवी सारखा पढाकू.बुटका होता पण हेअर स्टाईल अमिताभ सारखी.कपडे अप टू डेट. गोट्या खेळण्यात संजू,उदय नी आमचे बंधू म्हणजे x पर्ट. तिघांच्या कड मोठ्या बरण्या भरून जिंकलेल्या गोट्या.संजू उदय कड आजही असतील कदाचित.

संजू शिक्षणात हुशार.दादा रिटायर्ड झाल्यावर घरची जबबादारी यान समर्थ पण अंगावर घेतलीय ती आज तागायत पेलतोय.आता घर नव्यान मोठ बांधलन.अनेक  व्यवसाय केलंन उत्तम पण.तब्येती मूळ मग शिकवण सुरु केलंन ते आज गावात संजू सरांचा क्लास म्हटलं तर कुणीही सांगेल कुठ ते.

याचं मला आश्चर्य वाटत.सकाळी 8 ते संध्याकाळी सहा हा क्लास रूम मध्ये शिकवत बसलेला असतो.इमानदारीत शिकवण हा आमचा दोघाचा स्थायी भाव.याच शिकवण बघून वाटत याला याच्या मेहनती चा योग्य मोबदला त्या गावात मिळतच नाहीये.मुंबईत असता तर खोऱ्यान ओढलं असत.

आई वडिलांना सुख व्हाव असा पुत्र.त्यांच्या मागे त्याचा संसार यान पूर्ण केला.भाऊ बहीण यांची लग्न.भावाना दुकान काढून दिलन आहे.

याच्या बद्दल तक्रार एकच असते माझी.हा माणूस घरा बाहेर निघतच नाही.दरवेळी बोलतो तर याच उत्तर,

कधी निघू सांग.सकाळ पासून बसलेला असतो शिकवत.मग बाहेर पडायला इच्छा होत नाही.

म्हटलं मेल्या निदान दुकानी तरी जात जा तुझ्या तरी ऐकत नाही.या माणसाला चप्पल बुट यावर खर्च करावा लागत नसणार.

तल्लाख शार्प.लक्ष माझ्या सारखं नेट वरून सर्वत्र असत.नव्या कल्पना याला सुचत असतात धंद्या च्या पण शिकवण्यात अडकून पडतो.

आणि आमच्यातलं साम्य म्हणजे दोघे ब्रह्मचारी.

रोज संध्याकाळी आमचं बोलण असतच जनरली.एकमेकांना त्याच त्या रोजच्या अडचणी सांगायला हक्काची जागा आहे.याला मी कधीही मनात येईल तेंव्हा फोन करू शकतो असा मित्र.एकमेकांचे सल्ले देण घेणं सुरूच असत आमचं.माझ्या आयुष्यात याच तिथ पलीकडं फोन वर का होईना असणं खूप धीर देऊन जात.

रव्या !



रविन्द्र महादेव पिळवणकर.आमचा मित्र रव्या.


याची माझी दोस्ती आम्ही पोयनाड ला मुंबई सोडून रहायला गेल्यावर झाली.

आमच्या सावंत बंधुच्या घरी सर्व मित्र दिवसात केंव्हाही ओटीवरच्या बाकड्यावर जमायचो.संध्याकाळी आमच्या घरी.

हा तसा मित भाषी.उंच.इमानदारीत अभ्यास करणारा.इतकच नव्हे तर स्वतः शिकत असताना आणखी काही लोकांना शिकवत असे.मला सुद्धा गणितात पास होण्यात याचाच सहभाग आहे.मी कधीही तयार नसे शिकायला गणित.हा घरी येऊन फक्त बसत असे.मला कधी रागावला नाही.पण मी जास्तच टाईम पास करतोय दिसलं कि,बर आपण आता बसूया अभ्यासाला कि मी जाऊ म्हणत असे.मग मी बसत असे.मी नाही तोच पास झाला गणितात पुन्हा एकदा.

गुगुल अलीकडं आलं.तेंव्हा गावात संध्याकाळी 6 च्या आत ट्यूब लाईट लावून ठेवली तर ती पेटत असे कारण मग लाईट लोड जास्त झाल्याने डिम होत.मग ट्यूब लागत नसे.अशी स्थिती.

युट्यूब ,नेट तर नावाच नव्हतं अस्तित्वात.

तर त्या काळी देखील याचं ज्ञान अप टू डेट असे.बर घरात सायन्स नियतकलिक वग्रे पडिक असत असही नव्हतं.हा सायन्स चाच विद्यार्थी तसा.पण आज आहेत तशी साधन अजिबात नव्हती.

तरी देखील याच्याकडं रेडिओ,स्टोव्ह,टेप रेकॉर्डर,एकतर प्रोजेक्टर आला होता अस सगळं रिपेअर करत असे.माझी सायकल त्यानं रायगड ट्रिप वेळी स्वतः केली होती तशी आज माझी बाईक देखील चालत नाही अशी मस्का तयार केली होती.माझा tv देखील बंद पडला तर यान उघडला आणि सरळ बाबांना मी म्हणतो तो नंबर लिहून दे.तो ट्रान्झिस्टर आणायला सांग tv चालू होईल.मी आ वासून बघतच राहिलो.तुला कस कळलं?

अ तो पॉवर सप्लाय चा आहे.तो उडाला.म्हणून बंद पडलाय tv.

पण तो बसवेल कोण?

मी आहे न!!!

तर अस हे ज्ञान तो कुठून गोळा करीत असे हे आजही कळत नाहीये मला.

एकदा मजा झाली.गावात काही आणायला गेलो तर व्यापाऱ्यांची पोर बाईक वर जात होती आणि येताना गोणीतून काही भरभरून आणत होती.काय सुरूय कळत नव्हतं.मग सावन्ताच्या ओटीवर जनरली सगळे असत तिथ बातमी लागली.कुठंतरी बोट फुटली नी त्यात काही माल आहे तो गोळा करून आणतायत.कोळी म्हणत होते,डायऱ्या आहेत कसल्या आणि खोके आहेत.रवी आला.म्हटलं काय रे असेल?

आ ss वर्णन ऐकून व्हिडीओ कॅ सेट न प्लेअर असतील.

हे काय असत?

तू ऑडिओ ऐकतोस न प्लेअर वर तस व्हिडीओ.

म्हणजे?

सिनेमा दिसेल तुला .

कुठ?

tv ला प्लेअर कनेक्ट करायचा.त्यात व्हिडीओ कॅसेट टाकायची.सिनेमा सुरु.

अस कस होईल?

होत.

मला पटल नव्हतं.पण लगेच काही दिवसात गावात व्हिडीओ प्लेअर भाड्यान मिळू लागला.आम्ही तो भाड्यान आणला तेंव्हा समजलं.

तो आणल्यावर देखील एकदा कॅसेट स्लो वाटू लागली.हा उठला आणि एक बटन पिळलं तर परत स्पीड जागेवर आला.

हे सगळं कुठ माहित झाल याला समजत नाही.

मला ब्रेच प्रश्न पडत असतात आजही.पण आज युट्यूब,नेट मदतीस आहे.गुगुल बाबा आहे.विचारलं कि सांगतो बिचारा.पण कधी तो हि निरुत्तर होतो मग आमचा ओरिजनल गुगुल बाबा ला आहे त्याला माझा फोन जातो.उत्तर मिळतच.

pc च्या बाबतीत पण हा निष्णात आहे.एकदा त्याच्या घरी गेलो होतो तेंव्हा यान त्याचा pc दाखवत सगळं प्राथमिक समजावलं. आता मी ड्युटी वर जातो तू बस pc वर नी हवं ते कर.

अरे पण मी काही चूक केली तर?

नाही करणार तू मला खात्री आहे.

आणि तुझं काही खाजगी ओपन झाल तर?

ते तस काही नाही त्यात.आणि असलं तरी निदान आज तरी तुला सापडणार नाही😀

म्हणून गेला नी मी त्याच्या pc वर बसलो होतो बघत सगळं कस चालत ते.

पुढ माझ्या एका स्टुडन्ट न या बाबतीत बरंच शिकवलं.

रवीन एकदा त्याच्या कड असेम्बल करायला आलेला pc मुद्दाम माझ्या समोर जोडून दाखवला होता.

आता भेट होत नाही रोजची.कधी काळी गेलो नी तो घरी असेल तर थोडावेळ भेट होते.

असे आणि काही मित्र भेटले पोयनाड ला जे इतकी वर्ष झाली तरी अत्यंत जवळचे आहेत.कधीही गेल तरी मधली गॅप बिलकुल जाणवत नाही.

त्यांच्या विषयी मग लिहीनच.

मुंबईत एक ग्रुप आणि पोयनाड चा एक असे दोन सेट आहेत आमचे मित्रांचे.दोन्ही प्रिय.आणि दोन तबल्यातले आहेत.

या सर्व लोकांमुळ आयुष्य समृद्ध होत.

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

काळ देहा सी आला खाऊ.

 काळ देहा सी आला खाऊ

आम्ही आनंदे नाचू गाऊ,,,


काळ खायला येण !या अभंगातलं वेगळं.पण तो तसा खायला येतो मलाही कधी,,नव्हे बरेचदा.


बाबांनी एक नाटक बसवलं होत.त्यातले डायलॉग मला पाठ झाले होते.पैकी एक,

व्यंक्या किती वाजले?

काय कि.पण एक ठोका ऐकला.

मग एक वाजला असेल.

जी.

कदाचित दीड.

हा.

कदाचित साडे बारा हि.

असेल जी.

काळाचे ठोके साडे बारा वर असोत एक वर वा दीड वर.तुझ्या साठी ठोका एकच!

व्यंक्या तुला कधी काळ खायला आल्याच नाही वाटत?


नाय जी.

मग लेका या भिंताडा सारखं तुझं जिण.कुणा एकाच्या वासनेची एक विट कुणा एकीच्या वासने ची दुसरी विट. त्यावर मारला मुलामा मुठ भर तांदुळाचा आणि त्यातून उभ राहील हे भिंताड जे उभ ते उभ.पून्हा एकदा कोसळण्याची वाट पहात.


त्यातला व्यंक्या हा नोकर आहे.त्याचा आता मला हेवा वाटू लागलाय.काळ त्याला खायला येत नाही हा त्याचा गुण विशेष.

त्याच नाटकात मुख्य पात्र आंग्रे सरकार.तो एका तरुणीला ,ती डोक दुखतंय म्हणते तेंव्हा म्हणतो,

दुखण्या इतपत का होईना तुम्हांला डोक आहे तर!

या डोक्यात देवान अजब ऑर्गन निर्माण करून ठेवलाय.मेंदू.

बर तो देखील एक मे दो कटिंग सारखा.एक मोठा एक लहान मेंदू.

तो मोठा दिवस भर तर्हा तऱ्हा चे विचार करतो,निर्णय घेतो.मग थकतो.त्याला रात्री विश्रांती.

पण देव तिथंच थांबला नाही.त्यानं स्टेपनी सारखी व्यवस्था करत लहान मेंदू जोडून दिलाय.साला तो एरवी सुप्तवस्थेत असतो पण रात्री स्टिअरिंग तो हाती घेतो ऑटो पायलट सारखं.

मग मोठ्या न दिवसभर,मागच्या आयुष्यात जे चिंतन केल,बघितलं,भोगलं ते याच्याशी मेमरीत बाय डिफॉल्ट पडिक असत.मग हे धाकटे भाऊ रात्री झोप लागू देत नाहीत आम्हास.साल सिनेमा सारखी स्वप्न दाखवतात.इतकी कि कधी खरी वाटून भिऊन उठायला होत किंवा स्वप्न स्वप्नात खर झाल्या सारखं वाटून जाग येते चक्क.मग मोठा जागा होऊन सूत्र हाती घेतो.त्याच विश्लेषण सुरु होत.परिणाम आमच्या झोपेच खोबर ते हि खवट.अश्या वेळी मग काळ खायला येतो.आपण चक्क टकटकीत जागे आणि दुनिया गाढ झोपलेली.

किंवा दिवसा देखील आपण या काळाच्या मिठीत करकचून बांधलेले आणि भोवताली सगळे त्यांच्या कामात गर्क.आपला वेळ शून्य झालेला.

याला काळ खायला येण म्हटलं जात असावं.

अभंगात आहे तसा काळ खायला प्रत्येकास येतोच .तेंव्हा त्याचा ग्रास होण आहेच.पण तो होताना काहींना त्रास होऊ शकतो.मला मात्र होणार नाही नक्की.कारण काळ तर आम्हास आयुष्य भर आलाय खाऊ.

सो आय माई सेल्फ इज खाऊ ऑफ काळ.हौ ब्लेस्ड न.मजा है.

शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

उन्हाळ्याची सुट्टी.

 आता सुट्टी शाळेला.म्हणजे रिझल्ट पचवून गावी जायची तयारी.जाताना उन्हाळी करता म्हणून खास ते सुटी हाफ शर्ट पांढरे खरेदी व्हायचे.बाबा बॅग मधे आठवणीन पाटणकर काढ्या च्या दोन बाटल्या घ्यायचेच ज्या प्याव्या लागत.मुंबईची चहा पावडर घ्यायची.st च आरक्षण बघायचं.

 स्टॅण्ड वर उतरताच लक्ष जायच्या आधी बैलगाडी लावून उभा असलेला आमचा गणपत दिसे. आम्ही उतरल्याच बघून तोंडातली विडी टाकून तो कासरे गाडीला बांधून पुढ येई सामान घ्यायला.आलावं म्हणत पुढ होऊन थांबे.गाडीत पेंढ्यावर स्वच्छ पोती टाकलेली असत बसायला.मग आम्ही चढलो कि बॅग्स ठेऊन तो बैलाच्या पाठीवर थाप मारून त्याला बाजूला करून कासरे हातात घेई.मी त्याच्या बाजूला सरकून बसे.त्याच्या विडी चा वास मजेशीर वाटे.   घरी  पोचताना दिवे लागण होई .लांबूनच घराच्या कौलातून मीणमीणता प्रकाश पाझरलेला दिसला कि आज्जी स्वयंपाक घरात आहे समजायच.जरा पुढ आलं कि ओटी वरची झोपाळ्या ची कुरकुर तात्या तिथ बसलेत सांगत असे.

गाडी खालच्या अंगणात गोठ्या समोर उभी राहिली कि आधी घरात पळत जायच.मग तात्या किंवा आजी,आधी मागील दारी जाऊन पाय धुवून ये म्हणत.आजी न चुलीवर चहाच आधण तयारच ठेवलेलं असे.मग हळूहळू ख्याली खुशाली विचारून सांगून बॅग उघडली जायची.

मगचे दिवस मोकाट असत.आढीचे आंबे,पडी चे आंबे,रानात जाऊन करवंद् खायची.जांभळ,जांभ अस कायकाय.पेंढा जनावरांना घालण.त्या उडवी वर बसणं.मग खाज येण. आणलेला पाटणकर काढा नको म्हणत पिण. एखाद दिवस डोळ्या ची साथ येते या दिवसात, म्हणत डोळ्यात कांद्या चा रस रडत रडत घालून घेणं.

ठेच लागली तर खोटेवर बिब्बा घालून वर राखुंडी लावणं.सकाळी पाण्याच्या चुलीवर पाणी तापवण.ते उरकलं कि त्या चुलीच्या उरलेल्या निखाऱ्यात बटाटे,रताळी,काजू बी टाकून दुपारी उकरून खाण. संध्याकाळी गुर घेऊन तळ्यावर् जाण.तिथ त्यांना चोळण हाती घेऊन चोळून अंघोळ घालण.

पहाटे उठून आई आज्जी फेण्या करत.त्या उतरल्या उतरल्या खाऊन फस्त करण.मग दुपारी फेण्या,चिकवड्या,पापड वाळत घातलेल असे त्याची राखण करत बसणं.एक आरसा तिथ ठेऊन आजी म्हणे,तुमची नको राखण.पाखर राहतील दूर आणि वाळवण होईल लंपास. अंगण्यात पाणी मारलं कि येणारा सुगंध म्हणजे,,,

पडवी ला बाबांनी पूर्ण पडदे लावलेले त्यावर पाणी शिंपडणं स्प्रे बॉटल न.मग जरा गारवा येई.अंगणातून गरम हाळ मारे.पंख्या ची हवा देखील गरम येई.घर आमच्या सरस्वतीने गोलाकार नक्षी काढत सारवलं आणि भिंती देखील सारवल्या म्हणजे जरा थंड वाटे.सारवलेल्या माजघरात दुपारी उघड्या अंगाने पालथ पडलं कि सुख वाटे.

रात्री अंगणात झोपायला गाद्या घालायच्या. उशाशी पाण्याचे तांबे,बॅटर्या, काठी ठेवायच.वर मांडव असे.आजीला गोष्ट सांग म्हणून पिडायचं.अजून एक करत बसल कि मग ती कापूस कोंड्या ची गोष्ट काढून बदला घेई.रात्री कसले पान पडल्याचे,काडी पडल्या चे आवाज आले कि भीती वाटे.पण तात्या रामरक्षा म्हणत शत पावली करत ते ऐकून धीर येऊन झोप लागे.

दिवस भर मित्र जमवून विटी दांडू,काठी उडवी,गोट्या,बॅडमिंटन मग क्रिकेट दम लागे तोवर खेळून समाधान  होत नसे.कधी आमच्या कधी मित्राच्या शेतावर बैल गाडीतून जायचं.तिथली मजा वेगळी.शेजारच्या मित्रांना दुपारी रात्री दगड उंच उडवून  रस्त्यावर टाकत आंबा पडला वाटायला लावून फसवायचं.पहाटे आमच्या विशाल बकुळीची अंगण भर चादरी सारखी पसरलेली फुल गोळा करायला हाती पेटत टमरेल घेऊन कोण कोण यायच्या आणि ओचा भर फुल घेऊन जायच्या. मग ती आणि आवाडातली गोकरणं,बिट्टी,चाफ्याची फुल वेचून परडी भरून तात्यांना पूजेस ठेवायची नेऊन.

मग एक दिवस परतायचा उजडे.पाय जड होत.आज गणपत कामावर येऊच नये वाटे.पण तो अचूक वेळी पहाटेच् येई आणि गाडी तयार करून ठेवायचा.इतक्या मोठ्या आवारात मनसोक्त हुंदडल्यावर परत मुंबईत टिचभर जागेत जाऊ नये वाटे.पण निघावं लागे.आजी जवळ घेऊन प्रेमान मेतकूट,भाजणी,लोणच,पापड अस काय काय देई.

ते सगळं देखील गेल आता.पुन्हा परत न येण्या करता.

सुख यातच मानतो,निदान हे सगळं काही काळ का होऊन अनुभवण्या इतक नशीब जोरावर होत.

शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

लिमलेट!

 व्यायाम शाळेच्या पथकात प्रार्थना आटोपली आणि सर्व जण जायला निघणार इतक्यात सरांनी शिट्टी वाजवली.

लक्ष द्या रे.आपल्या दोन्ही शाखांची सहल रविवारी आयोजित केली आहे.त्याविषयी माहितीचा कागद सर्वांनी घेऊन जा.आणि जे येणार असतील त्यांनी त्यांची वर्गणी आपापल्या शाखेत जमा करायची आहे.हे माहिती पत्रक प्रत्येकाने घेऊन जा.

एकच कल्ला झाला.सगळे आनंदाने चर्चा करू लागले.काय न्यायचं,कुणी कुठं भेटायचं,सोबत आणायच्या वस्तूंच्या यादितल काय आपल्या कडे नाही या विषयी.

सम्या खुश ना?तू विशेष आनंदात असणार.त्या शाखेतून ती पण येणार.

हा मग.पण नाही आली तर?

अस कस होईल .

चंद्या ते हाय फाय शाळेत जातात.अभ्यास बुडेल म्हणून नाही आली तर?

छ्ट,ती टीम येणारच.बातमी लागली मला आधी.प्राजक्ता कालच म्हणाली मला.

ती कुठं भेटली तुला.

अरे ऑफिस मधे आली होती.त्यांच्या सरांनी काही कागदपत्र नेऊन दे म्हणून सांगितल होत.ते द्यायला आली होती अण्णांच्या कडे आमच्या.

मग.

मग काय.तीच म्हणाली,येणार न ट्रीप ला?आमचा अख्खा ग्रुप येणारे.आता पटली खात्री.

येस्स..

रविवारी आईने बॅग भरून देताना काय काय दिलेले आहे सोबत ते दोनदा सांगितल.लिंबू,मीठ,साखर मागे खणात आहे.लहान चाकू पण तिथच ठेवलाय.नीट बघून घे नाहीतर असून मिळायचा नाही .आणि सर्व गोष्टी नीट परत आणायच्या.

समीर च लक्ष नव्हत त्या बोलण्या कडे तरी हो हो करत होता.चला पळा आता नाहीतर उशीर होईल अस आईने म्हणताच  पळत सुटलो.धापा टाकत मैदान गाठल.

बस आलेलीच होती.माझा ग्रुप उभाच होता माझी वाट बघत. चंद्या पुढं आला .चल जागा पकडू आपण. आत शिरताच कुठं बसायचं प्रश्न पडला कारण त्या शाखेचा तो ग्रुप कुठं बसेल याची कल्पना नव्हती.चंदू सरळ मागे जाऊन बसला आणि ये इकडे म्हणाला.जाऊन बसलो.

इथ का?किती मागे आहे.ते लोक बहुतेक पुढं बसतील अस वाटतंय मला.

तू डोक नको लावू.तुझ्याच फायद्या करता इथ येऊन बसलोय.

म्हणजे?

अबे माहिती काढलीय मी.आपल्या शाखेच्या मुलांना पुढं त्या शाखेची मुल मागे बसतील.सीट मोजून बसलोय.आपल्या मागच्या सीट त्या शाखेच्या असतील.

ग्रेट आहेस तू.मी खिडकीत बसतो.

नाही .तू साईडलाच बस.

का?

मी सांगतो म्हणून.

तुला खिडकी हवीय सांग न सरळ.

तू न भोट च राहणार.तुझ्याच भल्या करता सांगतोय.

कस भल होईल माझं ते पण सांग.

अरे,,,आता तू आत बसलास आणि तिचा ग्रुप मागे बसला तर तुला ती दिसेल का चम्या?ये बस खिडकीत मी तिकड बसतो.

आयला,भारी डोक तुझं. थँक्यू मित्रा.

म,समजत नाही तुला.

इतक्यात तिच्या मैत्रिणी मागे येऊन बसल्या पण ती नाही आली.

चंद्या बघ ती येणार नाही बहुतेक.

गप रे.नीट वळून बघ. मागची अखंड आडवी सीट अर्धीच भरलीय तिच्या ग्रुप नी.आपल्या पलीकडील रांगेत जी खिडकी आहे मागे तिथं ती येऊन बसेल.ती बघ ती येत्येय.

मी पटकन बाजूच्या रांगेतील खिडकीतून बघितल तर ती दोन मैत्रिणी सोबत येत होती.

वेगळीच दिसत होती आज. ट्रॅक सूट घातला होता.त्या आल्या आणि चंदू म्हणाला त्या प्रमाणे सरळ मागे गेल्या आणि ती खिडकीत च बसली.

मी डोळे विस्फारून चंदू कडे बघितल .साल्या इतका खरा अंदाज कसा बांधला तू?

आपल असच आहे बॉ.तुला कळत नाही माझी हुशारी.

त्याला टाळी देत म्हटल,आज मानला तुला गड्या.

एकदा हजेरी घेऊन बस सुटली.

लक्ष सारखं मागेच जात होत.त्यांचं आपसात हसण खिदळण सुरू झालं होत.मधेच नजर मिळत होती.पण..

तोच मागून त्यांच्या ग्रुप मधून कुणीतरी ओरडून म्हणाली,अरे काय यार ट्रीप ला आलेत तरी सगळे वर्गात असल्या सारखे गप्पच का?ट्रीप साँग म्हणा.मुख्य शाखेतली टीम अगदीच थंड आहे बुआ. ए चल आपणच सुरु करुया .

ती इतकं म्हणली आणि त्या ग्रुप ने इंग्रजीत सुरू केलं मोठ्यानं,इन मॉर्निंग बाय द सी,,,,

चायला हे गाणं प्रथमच ऐकतोय रे.

हा ना,या मोठ्या शाळेतल्या ना मग इंग्रजी च गाणी म्हणणार .

त्यांची दोन झाल्यावर मात्र पुढं पक्याची सटकली.

अरे आपण काय गप्पच रहायचं का?

आपला पण हिसका दाखवू न.

होऊन जाऊ दे..

मग पक्याने मराठी गाणी सुरू केली

दिपवू साऱ्या चाळीतल्या बायका

थांब होऊ दे सकाळ...

मागून आवाज आला, ए हे काय ट्रीप साँग आहे का?

आमचं असच असत.

मी गप्प होतो .पक्या ओरडलाच,सम्या तू का गप्प?अस नाय चालायचं तू आपल्या शाखेचा असून गप्प का?

नाही रे जरा घसा बसला होता काल म्हणून.

पक्या मागे वाकून बोलला,मला कारण माहितीये तुझ्या गप्प बसण्याच,,त्याला पुढं बोलू न देता त्याच तोंड बंद केलं आणि,

माहितीये न? म चूप बस.

अरे पण त्या आपल्याला चिडवतात.

ते तू बघ.

सम्या हे बरोबर नाय.पण जाऊदे दोस्ती खात्यात तुला सोडलं.पण मी आपली गाणी बोलणार.मग आमच्या ग्रुपच्या आवाजात त्यांचा आवाज बंद झाला.

मुक्कामी पोचल्यावर दोन्ही शाखेचे चार तंबू लागले होते.त्यात दोन मुलांचे दोन मुलींचे.त्यात सगळे स्थानापन्न झालो .आता पाणी आणणे,स्वयंपाक करणे आम्हालाच करायचं होत.

सरांनी पाणी कुठून आणायचं ते दाखवून दिलं.मुलींनी स्वयंपाक करायचा पोळी भाजी सकट .

मुलांनी पाणी भरायच लागेल तितकं.भाज्या करायला ऐच्छिक होत .

अजून तिच्याशी बोलण झालच नव्हत.

तू काय घरी पोचलो ट्रीप झाल्यावर तेंव्हा बोलणार का तिच्याशी?

चंदू चांस च मिळत नाही.सतत ती 

 ढापणी तरी असते तिच्या सोबत किंवा प्राजक्ता तरी.

संधी मिळवायची मग मिळत नसेल तर.आज नाही तर कधी?बघ तूच.

तशी हळूच बघते रे.

वा वा,मग त्यातच खुश असशील तर जा पाणी भरायला.

इतक्यात तीच समोर बालदी घेऊन आली रिकामी.

ए जा पाणी आणून द्या.नुसते उभे काय राहिलात.आम्हीच काम करायची का?

आणतो की,पण काय करणार जेवायला?

ते गिळायला बसलात की कळेलच.

तुला काय करता येत?

म्हटल न बसलास की कळेल.आणि मला काय येत तुला काय करायचय.


अस कस,मलाच खायचेय ना.

म होईल तस मुकाट्याने खायचं.

पाणी आणा आधी.

जातो न,म्हणून मी निघालो तिच्या हातून बालदी घेऊन.चंदू पण आला मागून.

शाब्बास काहीतरी बोललास.

चायला पण ती धड बोलतच नाही.

चलता है रे.असू दे.

दुपारी पंगत बसली.सगळ मुलींनीच केलं होत.आमटी,बटाट्याची भाजी,चटणी,भात आणि पुरी.सरांनी श्रीखंड आणल होत ते देखील होत.एकेक जणी वाढायला येत होत्या.पुढं जात होत्या.स्वयंपाक बरा झाला होता पण पुऱ्या कडक आणि न फुगलेल्या होत्या.सरांच लक्ष होत म्हणून मान खाली घालून पुरी तोडायचा प्रयत्न करत होतो तर आणखी पुऱ्या धरलेला हात पानात दिसला एकदम.पटकन म्हणून गेलो,नको पुरी मला जाम कडक झाल्यात.पाणी पुरी ची पुरी पण कडक असली तरी खुसखुशीत असते.

आम्हाला काय सवय आहे रोज पुऱ्या करायची .किती मेहनत लागते माहिती आहे का?नुसत बोलायला काय जातंय.

चमकून वर बघितल तर ती!

 फणकाऱ्यात पुरी ची टोपली घेऊन पुढं झाली सुधा होती.

ए मला वाढ अजून पुरी.इती चंदू.

कशी रे झालीय?

अरे मस्त मला आवडते तशी.

बघ तुला आवडली ना!काहीजण उगाच नाव ठेवण्यात पटाईत.

असा राग आला चंदू चा.

तुला आयत कारण मिळालं ना इम्प्रेशन मारायला.

तू नाही ना मारलस मग मी मारल त्यात काय?

तू ये बाहेर मग सांगतो.

तो हसत पुरी दोन हातानी तोडत 

श्रीखंडात टोचत खाऊ लागला.

जेवून झालं आणि बाहेर हात धुतले.

प्राजक्ता वाटच बघत असल्या सारखी पळत आली जवळ.

ए बावळट काय बोललास ?ती रडत बसलेय.

बोमला.अरे मी काय बोललो?

पुऱ्या कडक झाल्या त्या कुणाच्या घश्या खाली उतरल्या नाहीत मग?

माझ्याच.पण सवय नाही न ग.आईची प्रत्येक पुरी फुगते.

तीन कपाळावर हात मारला.

अरे ती आई आहे.आम्ही कधी केलं नाही इतकं काम.आणि तिने कणीक मळण्या पासून सगळ केलं बराच वेळ. तळायला पण हट्टाने बसली.का?तर मला हेच जमेल म्हणून.बाकी मुलींना येत होत भाजी वगैरे करण थोडंसं.

तीच तुला माहितीये न,किती बक्षीस मिळलियत आणि त्या करता किती मेहनत घेते ते.पटकन बोलून मोकळा झालास.

अरे पण तीन इतकं मनाला का लावून घेतल.अपमान करायचा हेतू होता का माझा?

 नाही न,पण चटणी छान झालीय म्हणून बोललास की नाही.

हो बोललो.खाल्ल की चव सांगायची सवय आहे आमच्या घरी.नाही बोललो तर आई म्हणते,आज मनास आलेलं दिसत नाही काही. म त्यात काय झालं?

चटणी अनु ने केली होती.

बर मग.

शी बाबा.जा तू.तुलां काही कळतच नाही.

म्हणून प्राजक्ता निघून गेली.

कळेच ना काय झालं.

दुपारी थोड्या विश्रांती नंतर खेळ सुरू होते कुणाचे कुणी गप्पा मारत होते.

ती तंबूत च होती.दिसलीच नाही.

संध्याकाळी जवळच्या धरणावर फिरायला नेलं आम्हाला.तिथंही ती तिच्या ग्रुप मधेच होती.बघायला तयार नाही.

रात्री  कॅम्प फायर ला पण गप्प.चायला मुडच लागेना.त्यात एक त्या शाखेतला कुणी दिवटा स्केच करत होता. सरांचं झालं आणि कुणा कुणाचं झालं मग ती तंबू जवळ उभी होती तीच पण काढल.चंदू म्हणाला ,अरे चांगल काढतो रे.

बर बर .

तू का नाही बघितल?

तिन काढू का दिलं?

तिलाच विचार ना,मी कस सांगू.

एक दगड उचलला चंदू ला मारायला तर तो पळून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काही गलबला ऐकला म्हणून गेलो तर त्यांचा ग्रुप मीसिंग होता.सर आणि काही मुल शोधायला धावली होती.मी पण जायला निघालो तर शिट्टी वाजली म्हणून थांबलो.छोटू सर ओरडले,तुम्ही आणि कुठं निघताय ?नाहीतर तुम्हाला शोधायला जावं लागेल.मागे ये.

तंबूत चंदू ला म्हटल काय झालं रे?

अरे सकाळी त्या मॉर्निंग वॉक ला म्हणून धरणावर गेल्या आणि वाट चुकल्या .

थोड्या वेळाने सर आणि तिचा ग्रुप आला.वाट चुकल्या मग सरांनी खूप शोध घेतला तेंव्हा मिळाल्या.

धावत पुढं गेलो त्यांच्या तंबू जवळ.ती रडतच जात होती. ए थांब ना,काय झालं?

जग जाहीर झाल आणि तुला माहित नाही.

चिडू नको ना.काळजी वाटते म्हणून बोलतोय न.त्या तुझ्या सरांचा राग आलाय.अश्या वेळी ओरडत काय बसतात तुम्हाला.

तिच्या डोळ्यात अजून पाण्याची धार आली आणि ती तंबूत दिसेनाशी झाली.

सगळे चूप होते.शिट्टी वाजली म्हणून सगळे गोळा झाले.सर म्हणाले,आज खरतर आपण अजून काही वेळाने निघणार होतो पण नुकतच जे झालं त्यामुळे आपण लगेच निघत आहोत.उशीर झाला तर तुमच्या पालकांचे फोन येऊ लागतील तिकडे ऑफिस मध्ये.तर चला निघुया.

मग सगळी आवरा आवर करुन बस कडे निघालो.ती दिसली.तिच्या जवळ जाऊन म्हटल,अरे यार खरच सिरीयसली घेऊ नकोस सरांचं आणि माझंही.नकळत पुरी कडक झाली म्हणलो.पण पुरी अशीही छान लागते हे प्रथमच कळलं.

ऐकून तीन मान वर करून सरळ नजर भिडवून फक्त पहात राह्यली आणि झटकन पुढं गेली.

आम्हीही सीट पकडल्या.

ती त्याच खिडकीत बसली होती.अजूनही चेहेरा रडवेला होता.

तीन माझ्याकडे बघताच खूण करून रडू नको म्हटल.तिची मान परत खाली.

बस सुरू झाली . चंदूने बाही खेचली.

राहू दे मूड नाही तिचा.

मग मी पुढं बघत सीट वर डोक टेकल.

बस जाताना एकदम शांत होती.

अचानक मागून डोक्यावरून खाकी पुडी चेहेर्यावर आली.वळून बघितलं तर प्राजक्ता.

घे.

लिमलेट ची ऑरेंज गोळी होती मोठी.

पुडी भरलेली होती .

नको मला thanks.

घे.तिने तुला द्यायला सांगितली म्हणून देतेय.

चमकून मागे बघितल.प्राजक्ता म्हणली,अजून रडवणार तिला?

नाही.दोन दे.चंदू पण आहे बाजूला.

तीन दे त्याला.

मागून तिचा आवाज आला.

बघितल तर फक्त मंद हसली.खिडकीतून वारा आला आणि तिचे केस भुरभुर उडू लागले.बघतच राहिलो .ती परत खिडकीतून बाहेर बघू लागली .

चंदू घे.

एकच दे.दोन तुलाच द्यायला सांगितल्यायत.

दोन लीमलेट एकदम तोंडात टाकल्या.

इतकी वर्ष झाली .ती भेटली नाही मग.

पण लिमलेटची चव अजून रेंगाळून आहे जिभेवर.



बुधवार, १२ जानेवारी, २०२२

तू अस का करत नाहीस.

 तू अस का करत नाहीस?

इतकी वर्षे झाली तरी रोज रियाज का हवाय?

फक्त एक दगडावर पाय नाही ठेवायचा.तू दुसरं काही कर न.आमच्या ओळखीची ती आहे न,ती टपर वेअर विकते.बक्कळ कमावते.तुझ्या स्टुडंन्ट्स ना विकता येईल.


तू आधीच वेगळं व्हायला हवं होतंस.


अरे तबल्यावर आयुष्य निघत का? तो झाकीर स्टार आहे. 


वर्षभर करून बघायच मग दुसरी लाईन पकडायची.


तू झी वर सारेगमप त का जात नाही?


तू ऑर्केस्ट्रा त का जॉईन होत नाही?


इतकी फि कोण देणार?


इतकी कमी फि ठेऊन परवडेल कसं?


दर महीना 20 टक्के बचत खात्यात टाकत रहायचे.


गणपती ची किंमत कशी ठरवता?प्रत्येक मूर्तीला माती ते रंग आणि इतर प्री आणि पोस्ट प्रोडक्शन ला किती खर्च येतो ते एकदा काढून ठरवायची किंमत.तुम्ही अस करून बघा.


काही नाही तर वडापाव ची गाडी टक.


इथं काही जमत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन नशीब अजमावून बघ.


मुंबईत आहे तस इन्कम इतरत्र मिळणार  नाही.


तू लग्न का नाही करत?


तू झब्बे च घालत जा मस्त पैकी.


अरे प्रोग्रामला ठिकय पण रोज झब्बा काय घालतो?


तू न कमी बोलतो.


असे बरेच प्रश्न आणि ते तसे विचारणारे लोक भेटतच असतात.


म उवयोग काय?

मग मी मनात म्हणतो,


बाकी काही नाही तरी तुमच्या सारख्या लोकांना तरी होतो माझा उपयोग.

दुसऱ्याला उपदेश करून कल्याण मार्ग  दाखवल्याच,बघ मी कस केलं यश संपादन!अस म्हणायची जागा तर मिळवून दिली तुम्हाला.

😂

असो!एक गंमत सांगतो.

कोणे एकेकाळी अलिगढ हे ठिकाण कुलूप तयार करण्यात प्रसिद्ध होत.

आता मात्र प्रगती झाली.प्रत्येक राज्यात आणि परिणामी देश भर कुलुपं बनू लागली.जनतेला देखील ती घ्यावीच लागली.आधी फक्त ठोक मोठी कुलुपं तयार होत.मग त्यात वैविध्य म्हणून छोटी कुलूप पण आता होऊ लागलीयत.भारत भूमी कुलूपबंद झाली एकूण एक.

कधी मोठस🔒 घ्या कधी छोटस घ्या🔐 पण घ्या.नाही घेतलत तर....

💉💉💉💉💊💊💊💊

नवीन बातमी.नवा शत्रू शोधायला खास देश हितार्थ नवीन🔭 खरेदी करण्यात आलाय.

बदल


बाई पेटना माझी चूल नको नको हे चौथ मूल, अशी खट्याळ बायको मिळाली,माझी गंगू गावाकडं राह्यली,हि ऐका सत्य नारायणाची कथा, तूच सुख कर्ता, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस ते कामगार सभेच आणि वनिता मंडळ ची सिग्नेचर ट्यून अजून रेंगाळत असते.

या या या गंमत जम्मत, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत, रात्री पुन्हा प्रपंच टेकाडे भाऊजी न मिने मिने मिने ,ति

कडं विविध भारती वर मधु मालती,जयमाला आणि सिलोन ची सुपर हिट बिनाका गीत माला.

दादरला नाक्यावरच्या पान वाल्याकडे रेडियम सारखा हिरवा लाईट फाईन ट्यून स्टेशन लागलं कि आडवा पसरणारा रेडिओ होता त्यावर ऐकायला मजा येत असे. तेंव्हा हल्लीच्या मुलांचे आजोबा बसत असावे.उंच,गोरा माणूस.पांढरा झब्बा न धोतर नेसून असे मांडी घालून बसलेला.स्वतः तोंड पान खाऊन गच्च मिटून तबीयत मध्ये पान लावत बसलेला असे.

आता कट टू आज संध्याकाळी भावाच्या मुलांना घेऊन बागेत गेलो होतो.पोर इतकी उधळली कि बागभर धावली.घसरगुंडी ,सी सॉ, झोक्यावर भरपूर मुलं आपसात न भांडता भान हरपून खेळत होती.बाग मस्त हिरवळ,झाड,फुल आणि इतर साधनांनी भरलेली होती.मुलांचे पालक सुध्दा एकमेकांच्या मुलांना मदत करत होते झोका,घासरगुंडी वर.मन प्रसन्न झालं.

आत्ता मनात आलं,

बाग म्हटलं कि 

अजून त्या झुडुपाच्या मागे शेवंती लजवंती होते अशीही ओळख बागेची एका वयात होते. लहानपणी वर म्हटलं तस मनसोक्त हुंदडायची,वारा पीत धावायची जागा.

आयुष्याच्या संध्याकाळी कान  टोपी मफलर घालून आजी आजोबा बाकावर  बसायची जागा.मग त्या बाकावर जगलेल्या आयुष्याचे आणि घरातील सद्य परिस्थितीचे हिशोब एकमेकांना सांगायचे.

पण आज असे आजी आजोबा दिसलेच नाहीत.काही होते ते चालत होते हिरवळीवर किंवा नातवंडा सोबत त्यांना खेळायला प्रोत्साहन देत होते.

एक तरुण योगा आणि वॉरमप एक्सरसाईज करत होता.त्याला बघून आमचे पुतणे त्याला जॉईन झाले.


पोस्टमध्ये जुन्या आठवणी रेडिओच्या निघाल्या आणि वाटलं आपण म्हातारे झालो क काय चैला.


पण मग असंही वाटलं.

नक्कीच नाही.कारण,अजूनही दोन शिशु वर्गातली मुलं आपण हँडल करू शकतो त्यांच्या वयाचे होऊन.दॅट मिन्स अजून फिट आहे.

अरे नको त्या घसरगुंडी न झोक्यावर जाऊ मला जमणार नाही हं तुम्हाला सावरायला, अस मनातही आलं नाही.


मग हौ बौट बाग? एकेकाळी पार्कात क्रिकेट आणि हिरवळ बघायला रोज जायचो.आता हे सगळं मनात आलं म्हणजे ?


म्हातारे नाही झालो तर अनुभव संपन्न झालो.

मन तरुणच रहात नेहमी शरीराचं वय काहीही का असेना. आणि बागेच मोकळं ,निसर्ग सुंदर वातावरण मरगळ घालवत.सोबत बागेचे वयानुसार समजत गेलेलं अर्थ आणि उपयोग आता लक्ष्यात येतात.

आधी तुम्ही खेळत होतात तेंव्हा मोठी माणसं तुम्हाला सांभाळत होती.मग तुमच्या मुलांना तुम्ही संभाळत बागेत रमवलत.शेवट मात्र निसर्ग,मोकळी हवा आणि आजूबाजूची चिल्ली पिली हुंडताना बघून खूष होता येत.

आणि एक जण बागेतच भेटला.त्याची पोर देखील खेळत होती.आम्ही गप्पा मारू लागलो.तो म्हणला,मुझे अब कुछ साल हुए गुजरात आकर मगर अभीतक गुजराती ठिकसे नही आती.आप कैसे बोल लेते हो?

म्हटलं,उसमे क्या है?मराठी,हिंदी ,गुजराती आसपास एक जैसीही तो है.

मग तुम्ही काय करता?तर तो इन्कम टॅक्स मध्ये कामाला आहे.सुरत हुन बदली होऊन इकडं आलाय.मी तबला शिकवतो म्हटलं आणि त्यानं हातच मिळवला.अरे इतना अच्छा लगा आपसे मिलकर अब तो के पुछो मत.मै भी ढोलक बजाता हूं. मेरा एक दोस्त भी है जो जलदीही ट्रान्सफर होकर इधर आयेगा तो वॊ भी खूष होगा आपसे मिलकर.वॊ भी गाता बजाता है.

म्हटलं,सेम हिअर.आज जवळजवळ दीड वर्ष मी इथं आहे पण कुणीच स्वधर्मी भेटला नव्हता आज तुम्हाला भेटून आनंद झाला मलाही.मग अब तो आप नंबर दो मै रिंग देता हूं आप मेरा भी नंबर रखलो. फिर जरूर मिलुंगा आपसे तब पहचान रखीये.मग माझ्या युट्यूब चॅनल ची लिंक घेतलीन. घरी आलो तर व्हाट्सप वर त्याच तेच वाक्य परत आलं होतं,बहुत खुशी हुई आपसे मिलकर.

सेम हिअर लिहिलं.

मग आणखी कळलं.बागेतील मोकळ्या ,प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरणात मन मोकळे माणसंही भेटतात.आणि अनोळखी असून आपणही लहान मुलांसारखे लगेच ओळखीचे होतो रकमेकांच्या.

आठवणींचा खजिन्यात अजून भर पडते.वय वाढत पण आपण म्हातारे नव्हे तर अनुभव संपन्न होत जातं असतो.

हे होणं जेंव्हा थांबून फक्त आमचा जमाना कसा होता हेच उरेल तेंव्हा मात्र आपलं वय झालं समजावं.

आदरणीय गुरुवर्य, श्री अशोक गोडबोले.

 मी सकाळी लिहिलं त्या प्रमाणे आज खरंच पुन्हा एकदा पितृशोक झाला.

एक आपला जनक असतो जो जन्म देऊन वाढवतो.आणि दुसरा गुरू जो आपल्याला नुसतं साक्षर करत नाही तर अक्षर न अक्षर समजावून सांगतो.

जोवर पितृ छत्र असत तोवर आपण कितीही मोठे झालो तरी अडीअडचणी त त्यांचा आधार असतो. आपल्याला सावरायला ते असतात.आता कसं करू?हे हक्कानं विचारायला जागा असते.अरे काळजी करू नकोस होईल सगळं ठिक, अस त्यांच्याकडून ऐकलं कि हलकं वाटत.

कलेच्या बाबतीत पण सेम तसच असत.म्हणूनच घराणी आहेत संगीतात.गुरू हा पित्या समान असतो.

कितीही शिकलं तरी कुठंतरी गाडअडलं तर त्यांच मार्गदर्शन असत.बाहेर वावरताना त्यांच्या आधाराची,मायेची ऊब सोबत असते.

समोर ते बसलेले असताना वाजवताना ,  

बालपण तसच रहात आपलं.त्यामुळं कितीही वाढलेलं असलं तरी आपलं वय वाढत नाही.रियाज झालेला नसताना त्यांच्या समोर बसायला संकोच वाटतो होम वर्क न केलेल्या विद्यार्थ्यां सारखा.

ते गेल्यावर मात्र मानेवर जोखडाच वजन जाणवू लागतं. आता या दुनियेत आपल्यालाच आपला मार्ग काढायचाय हे कळत. गुरुपौर्णिमेस सरांकडे गेलो कि मस्त वाटायचं ,बरेच दिवसांनी घरी आल्यावर वाटत तस.

रीत म्हणून माझे विद्यार्थी पाया पडतात.ते मी परमेश्वर,आई वडील आणि गुरूंच्या चरणीच रुजू करतो मनातून.कारण त्यांचीच कृपा असते ती.

म्हणून आईवडील आणि गुरू जाण या सारख दुर्भाग्य नाही.आपल्याला पाया पडायला जागाच उरत नाही मग.


तरीही सर,

तुम्ही आई बाबांसारखेच मनात असता.आणि चरणी वंदन नेहमीच राहील.तुम्ही लोक असाल तिथून आशीर्वाद नक्कीच देत रहाल याची खात्री आहे.

बादवे सर,बरेच दिवस रियाज बंद आहे.पण आज तुम्हाला श्रद्धांजली म्हणून तबला घेऊन बसलो होतो.

आई बाबा आणि तुम्ही यांचं ऋण फिटणार नाही आणि ते फेडायची माझी क्षमता नाही ,इच्छाही नाही.

सदैव तुमचा ऋणी,🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

बुधवार, ८ जुलै, २०२०

अदृश्य राक्षस.

सगळीकडे कोलाहल माजलेला. नगरजन त्रस्त झालेले. एकेकाळी नव्हे ,तर अगदी काल परवा पर्यंत सुरळीत सुरू असलेलं जन जीवन आज पूर्ण विस्कळीत झालं होत.
नगरीचे रस्ते सुनसान पडलेले.जे अहोरात्र चैतन्य राखून होते ते मार्ग,महामार्ग आज ओस पडलेले दिसत होते.शहर वाढल्याने संकुचित झालेल्या वनश्री मधली वन्य श्वापदे आता आपल्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाचा बदला घेण्यास बाहेर पडून निश्चिन्त मनाने शहर भर फिरत होती.आधीच भेदरून घरात लपून बसलेले नगरजन, त्या प्राण्यांना तस फिरताना आपापल्या गवाक्ष्यातून चिंतीत नजरेने बघत बंद असलेली दारे अजून घट्ट बंद करायचा प्रयत्न करत होती.सर्वत्र त्राहीमाम माजलेत होत.घरात बसून साठवलेली अन्न धान्य रसद आता तळ गाठू लागली होती. अन्न आणायला धन उरले नाही.ते मिळवायचे तर उद्योग करायला बाहेर पडायला हवं.पण या समयी सर्व ठप्प झालेलं.आता घरी राहू तर उपाशी मरू.बाहेर पडू तर ती श्वापदे खातील.त्यातून वाचलो तर तो अदृश्य राक्षस आपला घास घेईल हे नक्कीच झालं होतं.
होय.या संपन्न भारत देशावर आलेलं ते अदृश्य संकट होत.एक अचानक प्रगटलेला पण न दिसणारा दैत्य या देशावर यम होऊन घाला घालायला आला होता.
राजसत्तेचे सर्व सेनाधिकारी,निष्णात वैद्य राज या अदृश्य राक्षसाच्या नायनाट करायला अनेक उपाय योजित होते. पण यशवंती प्रसन्न होतंच नव्हती.आठवडे गेले.महिने गेले तरी तो राक्षस मागे हटत नव्हता कि दिसत नव्हता.पण बळी मात्र नित्यनेमाने घेत होता.
तिकडं या शहरी भागातून दूर एकांतवासी असा एक औघड दुरून हे सगळं न्याहाळत होता.
कुणीतरी लायक नरश्रेष्ठ पुढं येऊन या विपदेतून सर्वांस बाहेर काढील अशी त्याला आशा होती.तो आपल्या साधनेत मग्न होत होता.
परंतु आज एका गिद्धा च्या समूहास त्याने नगरच्या दिशेने उडताना बघितले.नदीत उभा राहून तो सूर्यास अर्घ्य अर्पण करत होता. ते झाल्यावर तो काही काळ सूर्य बिंबाकडे एकटक बघत नेत्र त्राटक करत असे.पण आज ते करणं राहील बाजूला.कारण जसे त्याचे नेत्र सूर्याकडे रोखले गेले नेमका तेंव्हाच तो गिद्ध समूह नगराच्या दिशेने आकाश कापत जाताना त्याच्या दृष्टीस पडला.
त्याला ते ठिक वाटलं नाही.काही अघटित घडतंय याची जाणिव त्याला झाली.दिनमान मोजून बघितले तर लक्षात आलं त्याच्या कि काही मास गुजरलेत मध्ये.आपण साधनेत मग्न होतो त्या मूळ इकडं लक्ष गेलं नाही.
मग तो त्याच त्राटक तसच सोडून नदीच्या पात्रातून बाहेर निघाला.
पर्णकुटी जवळ असलेल्या कुंडात त्यानं पुन्हा एकदा हातपाय धुतले.आत जाऊन त्याच्या व्याघ्र चर्मा वर बसला.समोरच्या धुनीत बाजूस ठेवलेल्या हवन द्रव्यातून धूप दाणा उचलून धुनीत अर्पण केला.सर्वत्र धुम्र वलय पसरत गेलं आणि त्याची पर्णकुटी व्यापून राहील.आता त्यानं कमंडलू तून पाणी घेऊन हाती घेतल.या अरिष्टया मागे कारण काय?ते जाणून घ्यायचा संकल्प सोडला.क्षणात त्याची समाधी लागली.शरीर हलकं भासू लागलं आणि एक तेजाकृती त्याच्या अंतर्मनास दिसू लागली.त्यांन त्या तेजास प्रथम नमन केलं.खूप आतून ,खोल पोकळीतून आल्या सारखा तो परिचित आवाज त्याला ऐकू आला,बोल साधका!काय पृच्छा आहे तुझी?
हे नियंत्या हे नगरात सध्या काय सुरू आहे?का सुरू आहे?या वर उपाय नाही का?
परत तो गूढ पण आश्वासक आवाज आणखी धीर गंभीर होत म्हणाला,
साधका,तू हे निस्वार्थपण आणि लोक कल्याणा करता विचारत आहेस म्हणून तुला सांगतो ते नीट ऐक. यात काही पाप पुण्याचे हिशोब होत आहेत,काही निसर्ग देव समतोल साधत आहे.योग्य वेळ येताच सर्व काही ठिक होईलच.पण या बाबत एक गोष्ट तुला सांगतो.ती श्रवण कर म्हणजे तुझं शंका निरसन पूर्ण होईल. एक गोष्ट अजून जाणून घे.जर तू माझ्याकडून ती गोष्ट ऐकलीस तर तुझ्या साधनेच फळ जे तुला  मिळायला आलं होतं ते नष्ट होईल.बोल,चालेल?
प्रभू, मला कसला पाश उरला नाही.तेंव्हा संचय करावं असं कधी मनी येत नाही.तेंव्हा आपण ती गोष्ट कथन करावी.निदान माझ्या देश बांधवास हा त्रास का होत आहे हे तरी मला कळेल.
साधका, तुझी हि साधू वृत्ती बघून मी प्रसन्न झालो आहे.तुला ती गोष्ट तर सांगतोच पण तुझी साधना वाया जाणार नाही असा वर हि देतो.परंतु त्या वराचा वापर तू त्या राक्षसी ताकदीशी लढायला वापरू शकणार नाहीस.कारण ते विधीलिखित आहे.
आता ऐक ती गोष्ट,
हे तुमच कलियुग सुरू होताना कली महाराज देवास म्हणाले, एकूण माझ्या सत्ता काळी दुराचार माजणार अस आहे.मग तो बकासुर ,हिडीम्ब या सारखे राक्षस माझ्या युगी का नसावेत?
तेंव्हा प्रभू त्यास म्हणलेत,तथास्तु.
असे राक्षस तुझ्या काळात भरपूर असतील.कलियुगी शके 1942 मध्ये एक अदृश्य राक्षस हाहाकार माजविल. त्यास रोखणे कुणास शक्य होणार नाही. काही लहान मोठी पिशाचे त्यास साहाय्य करत राहतील. काही बलवन्त मंडळी गोरगरीब जनतेच्या हक्काचे अन्न धान्य गिळंकृत करतील.
तुझ्या काळच्या महिमे मूळ अस काही ठराविक कालावधीत होतच राहील.पण पापाचे घडे उशीरा का होईना भरतीलच.त्या राक्षसांचा देखील उचित वेळी प्रायश्चित्त समय येईलच.मग कली महाराज समाधान पावले.
तेंव्हा हे साधका अस असल्याने हि सगळी उलथापालथ तुझ्याच देशात नव्हे तर सर्व विश्वात सुरू आहे.त्यानं तू आता अधिक कष्टी होऊ नकोस.
मग साधक म्हणला,हे प्रभू एक मागणे अजून आहे.
बोल.
माझ्या साधनेच फळ मला नको आहे.पण ते जर का जमा झाल असेल आपल्या चरणी,तर या संकटात असलेल्या निष्पाप जीवांस काहीतरी प्रमाणात विभागून आपणच देऊ करा.म्हणजे जनसामान्य टिकून राहतील आणि त्यांचा आपल्या वरील विश्वास देखील तसाच राहील.
वा,साधका ! तुला खरच साधना जमली आहे म्हणायची.मी या मूळ संतोष पावून तुला आश्वस्त करतो , तुझ्या मना सारखे होईल.
हळूहळू मनःपटलावरील ती आकृती धूसर होत गेली तरी तिचा आशीर्वाद देत असलेला हात त्याला जाणवत राहिला.तो सुद्धा समाधी अवस्थेतून समाधानाने बाहेर आला.एक दिर्घ निश्वास सोडून तो आसन सोडून फलाहार आणण्यास जंगलात जायला निघाला.

सोमवार, ६ जुलै, २०२०

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा ???

काल गुरू पौर्णिमा झाली.
अलीकडं त्या बाबतीत एक गोष्ट खटकते मला.माझे विद्यार्थी जे येऊ शकत नाहीत ते आणि ओळीतले लोक देखील ''गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा'' असा संदेश किंवा मेसेज पाठवतात.भावना चांगलीच असते सगळ्यांची.
पण,
हे नातं गुरू शिष्याचं अस असत.आणि हा दिवस शिष्या ने गुरुची भेट घेऊन त्याचे आशीर्वाद घ्यायचे या करता आहे.आजवर हेच रूढ होत.शुभेच्छा वाढ दिवशी किंवा अन्य सणवार किंवा काही आनंदाची गोष्ट घडली तर देतात.मग जर कुणी गुरू कडे जाऊ शकत नसेल तर त्याने फोन करून किंवा मेसेज मधून अस लिहावे कि, सर प्रत्यक्ष येऊ शकत नाही.पण आशीर्वाद असू दे.आजचा दिवस महत्वाचा आहे म्हणून मेसेज किंवा फोन वरून आशीर्वाद मागतोय. यथावकाश प्रत्यक्ष भेट घेईनच. जे शिष्य शिकत आहेत ते देखील गुरू स न भेटता मेसेज वर काम भागवतात.
वेळ नसतो कुणाला हे खरं आहे.पण हा दिवस आपल्या संस्कृतीत गुरू भेट घेऊन त्याचे ऋण मानून ,जमेल तशी गुरू दक्षिणा देऊन गुरू चे आशीर्वाद घ्यायला राखून ठेवला आहे.शिक्षण पूर्ण होतच नाही कधी.तरीही जे शिकून गेलेत त्यांनी या दिवशी गुरुची आठवण ठेऊन त्यांना भेटणे महत्वाचे असते.
मदर डे, फादर डे, फ्रेंड शिप डे हे साजरे करावे लागतात !शुभेच्छा देऊन? ती नाती देखील गुरू च्या तोडीची महत्वाची आहेत.
त्या बद्दल राहू दे पण गुरू गृही जाऊन त्याची भेट घेऊन,वंदन करून आशीर्वाद घेणे हे महत्वाचे आहे. बरेच वर्ष हे खटकत आलाय म्हणून लिहिलं.
आणि हे माझ्या बाबतीत लागू होत नाही हे देखील प्रांजळपणे नमूद करतो.मी तबला शिकवतो पण स्वतः ला गुरू अजिबात समजत नाही.ते पद खूप खूप उंच आहे.मी तिथवर पोचू शकणार नाहीये.त्या मूळ माझ्या शिष्यानी (शिकतात माझ्याकडे म्हणून शिष्य म्हटलं.नाहीतर मी त्यांना माझे सह अध्यायी समजतो.जे माझ्या नंतर शिकायचा प्रयत्न करू लागलेत. आणि दोन अक्षर त्यांच्या आधी शिकून मी आहे म्हणून त्यांना मार्गदर्शन करतो)
माझ्या पाया पडावं हि देखील अपेक्षा नाही.
पण या दिवशी गुरुगृही जाऊन त्यांचे आशीर्वाद घेणं याला महत्व आहे हे लक्षात ठेवा.नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी जा. वर्षातून एकदा गुरू भेट घ्यावीच.
त्या मूळ माझ्याकडे शिकतायत त्याना आणि जे मित्र यादीत आहेत त्यांना प्रेमाने विनंती करीन कि,
गुरू पौर्णिमा शुभेच्छा म्हणू नका.आपापल्या गुरुची भेट घ्या त्या दिवशी.ती देखील मनाला वाटलं तर.कारण आपल्या कडे गुरुस मोठा दर्जा,स्थान दिलेलं असलं तरी हे देखील म्हटलं जातं,गुरू सुद्धा पारखून करावा.
आणि तसा जर तो तुम्ही केला असेल तर त्याचे आशीर्वाद मागा. त्याला शुभेच्छा नका देऊ.
जे मला योग्य वाटत नाही.
मनात बरीच वर्षे येत होतं ते मांडल.आवडलं नाही तर सोडून द्या.
या वर्षी प्रथमच माझी गुरू भेट कोरोना मूळ राहिली.त्याची रुख रुख आहे.पण काल सरांना फोन करून आशीर्वाद मागितले आणि त्यांनी ते फोनवरून भरभरून दिलेही.माझी गुरू पौर्णिमा साजरी झाली.
सदैव सर्व गुरुजनांच्या ऋणात असलेला
आपला,सलील जोशी🙏🏻🌹

रविवार, ५ जुलै, २०२०

जांभूळ.

जांभुळा चा रस.!!!
झक्कास लागतो.आज सायंफेरीस गेलो तेंव्हा जांभळ मिळाली.धुवून गरम पाण्यात एक उकळी काढली.मग थंड झाल्यावर बी पट्कनी निघते.उरलेला गर थोडी साखर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतला.मजा आली.
पोयनाडचे दिवस आठवले.खाली चादर धरून कुणीतरी वर चढून फांदी हलवायाचा.अलगद जांभळं चादरीत टपकत.त्या जांभळीवरून दरवर्षी दोन चार जण तरी निसटून पडत.झाड कुणाच्या मालकीच नव्हतं.शेजारी डोंगरी होती ती जांभळी ची डोंगरी म्हणूनच होती.पण आमच्या वयी ला लागून असलेली जांभूळच आम्हाला आवडायची.त्या जांभळी खाली एक दिवस तिन्ही सांजेस एक कातकरीण बाळंत झालेली लांबूनच आमच्या आवाडातून बघितली.तिची सासू सोबत होती.तिन तीच सगळं केलं उघड्यावरच.मी बघत होतो झाडा आड काय करतायत दोघी.मग आजी म्हणली,अरे तिला बाळ होतंय बहुतेक.इतक्यात तिने बाळाला जन्म दिलाच. मग आजी न चार कपडे आमच्याकडचे आणि भाकऱ्या,थोडं दूध मला तिला नेऊन द्यायला सांगितल होत.तिला म्हणावं उद्या येऊन जा काही लागलं तर सांग.ती म्हातारी मला मला हात जोडून म्हणली,हो रे बाबा.आजी बाईला नमस्कार सांग.परत येऊन आजीला विचारलं कोण ग ती?कधी बघितली नाही आपल्या कडे.तिकडं वाड्यावर असते का आपल्या?आजी म्हणली,नाही रे.असेल शिरगावची वगैरे.
अस रस्त्यावरच आटोपलेलं बाळंत पण दुरून बघितलं.मला वाटलं ती तिचा जुना मळका पंचा धरून उभी आहे जांभळं झेलायलाआणि झाडावर तर कुणी बाप्या चढून नाही.म्हणून बघत बसलो होतो.
जुनी आठवण आली.संध्याकाळ मस्त झाली.

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

गोल्डन वर्ड ऑफ झाकिर हुसेन.

तू स्टेज वर का वाजवत नाहीस?
तू ऑर्केस्ट्रात का वाजवत नाहीस?
तू tv वर प्रयत्न करा न!
असे मला म्हणणारे बरेच सुहृद आहेत.नक्की ते माझ्या वरच्या प्रेमान म्हणतात.त्यांना माझ्या परीने सांगत असतो माझ्या साठी तबला काय आहे?
थोडक्यात सांगायचं तर मला तबला शिकताना आनंद मिळतो म्हणून मी तबला वाजवतो.
आता त्यातून अर्थार्जन जे काही होत त्यात अजून तरी ठिक सुरुय.खूप नाही पण पोटापुरतच का होईना जे मिळत ते तबल्या मूळ.
लॉक डाऊन मध्ये सगळ्यांची परिस्थिती बिकट आहे झालेली.
काही लोक प्रेमापोटी न काळजीनं म्हणतात,अरे दिवस वाईट आलेत दुसर काही कर मिळेल ते.
ओके. करेक्ट म्हणतात ते.त्या माग हेतू चांगला आहे पण,
आमच्या सारखे लोक आयुष्यभर हेच करत आलेत त्यांना दुसर काही आता जमेल का?वेळ आली तर शेवटी करीनही जे करावं लागेल ते.पण हे कुणी लक्ष्यात घेत नाही आमचं लक्ष दुसऱ्या कशात लागत नाही.
आणि जे करतोय ते अस नाही कि करू नये ते करतोय.
तर हि माझ्या सारख्या लोकांची व्यथा सांगणे कठीण आहे.
सांगायचं कारण ,झाकीर भाईंचा एक  शेअर करतोय.त्यात ते जे म्हणलेत ते ऐकलेत तर मी काय म्हणतोय हे कळेलच पण,
या कोरोना आणि त्या मूळ तयार झालेल्या परिस्थितीत सगळे टेन्शन मध्ये आहेत.त्यांना नीट अर्थ बघितला ते म्हणलेत त्याचा तर रोजच आयुष्य जगताना फायदा होईल.कलाकार असाल तर कलेकडे आणि सादरीकरणाकडे बघायचा एक प्रगल्भ विचार मिळेल.
बघा आवडतंय का.🙏🏻
सोबत लिंक देतोय https://youtu.be/QyrUXQ5VVzI