माझा आवडता प्राणी.इमानदार शब्दाची मूर्तिमंत आणि जिवन्त व्याख्या. आवड आहे म्हणून त्या विषयी माहिती घेत असतो.नेटवर अचानक एक स्टिंग ऑपरेशन समोर आलं एका चॅनल च.पाकिस्तानी आहे अँकर पण समाजातील अनेक भ्रष्टाचार उघड करत असतो.ARY नाव चॅनल च.त्यांनी शोधलेला हा नवा फ्रॉड बघून चाट पडलो.
पाकिस्तानी सिंध ,पंजाब प्रांतात एक धंदा खूप जोरात आहे.माग काढणारे कुत्रे पैसे घेऊन मागविण्यात येतात. अश्या एजन्सीज खूप आहेत.कार्ड वर सैन्य दल किंवा पोलीस दलाचा लोगो असतो आणि एखादा मेजर हि उच्च पदावर आहे असं लिहिलेलं असत.
तिकडं गावात समजा म्हैस,बकरी किंवा अन्य वस्तूंची चोरी झाली तर या कुत्रे वाल्याना बोलावलं जात.ते 25 ते 50 हजार घेतात. मग आले कि पोलिसां सारखी चवकशी करतात.मग कुत्रा सोडला जातो.कुत्रा गावभर हुंगत एखादया घरात घुसतो आणि खाटेवर जाऊन बसतो.याचा अर्थ चोर त्या घरातून आला होता.मग त्या घरच्यांना गावाबाहेर हाकलून देतात.घर जाळून टाकलं जात.मग दोन्ही कुटुंबात पिढ्यान पिढ्यांच वैर सुरू होत शेकडो खून पडलेत.कारण काय ?तर कुत्रा जाऊन बसला म्हणजे खर आहे.
हे अस कैक वर्ष सुरू होत.अचानक एक माणूस चॅनल वाल्यांकड आला.तो म्हणला हे सगळं खोटं असत.निव्वळ फसवणूक होते आहे.मी ट्रेनर होतो. पण एक निष्पाप कुटुंब बळी पडल आणि मला पश्चाताप होतोय.तुम्ही हे दाखवा म्हणजे थांबेल सगळं थोतांड.
मग त्यांना त्या ट्रेनर न हे कसं केलं जातं ते सांगितलं.त्या चॅनलच्या माणसांनी एका गावातील लोकांना विश्वासात घेतले आणि सापळा रचला.कुत्रेवाले आले.पैसे घेतले.कुणावर संशय आहे विचारलं.नेमका त्या घरात कुत्रा जाऊन बसला.मग तो ट्रेनर पुढं आला आणि त्यानं तो कुत्रा परत हवा तसा चालवून दाखवला.तेंव्हा सगळं पितळ उघडे पडले.त्या लोकांनी गुन्हा कबूल केला.
आता होत काय होत नेमकं?तर,
कुत्रा सोडला कि ट्रेनर ओरडे, चल चल कि कुत्रा पळतो समोर.मग डावी कडे वळायला हवा असेल तर ट्रेनर म्हणतो शाबास शाबास,उजवी कडे ही असाच शब्द ठरलेला असतो.हवा त्या घरात घुसला कि कमांड असते,चल काम कर ,मग कुत्रा जागी च किंवा खाटेवर बसतो.म्हणजे ते घर चोराच ठरत आणि उध्वस्त होत.
अशी कैक घर उध्वस्त झालीत नि शेकडो खून पडून पिढीजात वैर निर्माण झालीत.
यात आणखी वाईट म्हणजे
कुत्रा बिचारा उगाच बदनाम झाला.🐶
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा