शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

*कौन्सिलर, सेमिनार*

*कौन्सिलर, सेमिनार*
एका मित्राच्या मुलाचा मेसेज आला लिंक सकट. काका याला ऐक. मस्त आणि सोपं करून समजावतो सगळं.म्हटलं ओकेज, बघतो. मग त्या माणसाचा व्हिडीओ बघितला.खरोखरीच उत्तम वक्ता होता.आणि तो स्वतः आयुष्यात सफल होता.म्हणजे आपल्या पायावर मेहनतीने उभा राहिलेला माणूस.
    मग विचार आला आमच्या त्या पुतण्या न हे ऐकल उत्तम च झालं.पण त्याला हे का आवडलं?
तर विचार केल्यावर अस वाटलं कि ते त्याच्या बाजूच वाटलं असावं त्याला.तो वक्ता सांगत होता,तुम्ही तुमच्या मनाचा आवाज ऐका. कुठल्याही फिल्ड मध्ये यशस्वी होऊ शकता. तुम्ही वेगळी वाट निवडलीत तर तुम्हाला ते करू नको म्हणणारे मिळतील.ते का नको म्हणतात,हे त्यांना विचारा. मग तुम्हाला अस आढळेल कि ते नको म्हणतात कारण तुम्ही जे करू पाहत आहात ते त्यांना जमणं शक्य नाही.आणि ते करू शकत नाहीत तर तू काय करणार?त्या लोकांना त्या क्षेत्रातील काहीच माहिती नसते.तुम्ही विचलित न होता पुढं जात रहा.
अस एकूण सगळं होत.पण त्या माणसाने सांगितलेल्या इतर गोष्टी कडे त्या मुलाचं ध्यान गेलं नसणार .जेंव्हा तो माणूस सांगत होता कि, मलाही मी वेगळं क्षेत्र निवडलं तेंव्हा विरोध झाला पण मी यशस्वी झालो.हे इतकंच लक्ष्यात येत या पोरांच्या पण त्याने नंतर त्या करता जे डोकं लढवल,जे श्रम घेतले आणि भांडवल आपलं आपण उभारल त्या कड हि पोर लक्षच देत नाहीत.
त्या पोराला हे पटण्याचं कारण,बघ काका आमच्या कडे हे असंच असत.मी काही करायचं म्हटलं तर घरचे लगेच विरोध करतात.म्हणजे त्याच्या म्हणण्याला दुजोरा देणार फक्त त्यानं घेतलंय.
  आता त्याच्या घरच्यांना त्याची लायकी माहीत असते म्हणून विरोध होत असतो.त्या माणसाच्या आड लपू पाहत होता तो पोर.स्वतः ला ओळखणं त्याला अजूनही जमत नाही हे माझं निरीक्षण.
हे कौन्सिलर, व्यक्तीमत्व विकास शिबिर वग्रे अलीकडची उपज आहे.ते वाईट नव्हे.जर समाजाला त्याची गरज असेल तर ते हवंच.सुधारणा नकोत अस अजिबात नाही.पण काही दशकांपूर्वी हे असलं काही नव्हतं.जरी तेंव्हा इतक्या सुधारणा,नवी क्षेत्र नव्हती तरी त्या काळी जे अपडेट होत ते होतच ना!
तेंव्हा शेतकरी आत्महत्या जवळ जवळ नव्हत्याच.अपवाद म्हणून कुठं घडलं असलं तर.
प्रेम भंग आणि त्यातून घडणारे गुन्हे ही इतके नव्हतेच.मग आज हे का घडत?
तर हल्ली कमी वेळात जास्तीत जास्त फायदा आणि तो हि लायकी नसताना हवा असतो.खूप कमी वयात मोठी पॅकेज घेतात तरुण.मुबलक पैसा असणं मग सांभाळणे जमत नाही.ती  किंवा कुठलीही ताकद सांभाळून रहाणं हे जास्त कठीण आहे.उदाहरणार्थ,समजा तुम्ही एखाद पिस्तुल खरेदी केलंत.ते बरेच दिवस पडून आहे पण ते वापरता येत नाही.अश्या वेळी ते वापरून बघायची इच्छा प्रबळ होते.ती कंट्रोल मध्ये ठेवण हे ते शस्त्र विकत घेण्याहून कठीण आहे.किंवा जर कुणी मनाविरुद्ध वागल तर ते शस्त्र बिनदिक्कत वापरलं गेलंय प्रगत राष्ट्रात.शाळेत गोळीबार का केला?तर काही नाही होत पिस्तुल बघितलं वापरून,हे उत्तर मिळाले मुलाकडून अस वाचनात आलं होतं. तसच,लंडनच हिथ्रो विमानतळ कुणा शाळकरी पोरानं हॅक करून सरकार ला जेरीस आणलं.त्याला पकडल्यावर तो ही हेच म्हणल्याच आठवतंय.म्हणजे इथं शस्त्र बदललं पण ते सांभाळून ठेवण आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरणं हि ताकद कमी पडली.पुराणकालीन योद्धे हि त्यांची अस्त्रे उठसूट वापरत नव्हते.
जर आपण जबाबदारीने वागलो,स्वतः ची कुवत ओळखून वागलो,श्रम घेण्याची तयारी असली आणि पेशन्स असले तर कुणाच्या ही कौन्सिलिंग ची गरज नाही.गरज असते ती फक्त डोळसपणे जगण्याची.आयुष्य जे अनुभव देत असत ते दिलखुलास अंगावर घेऊन,त्यातून शिकून पुढं जाण्याची.हल्ली बरेचदा आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने मुलांना नाही ऐकायची,वाट बघायची सवय राहिली नाही.मग मालकी हक्काची जाणीव मात्र तीव्र झाली .मी मोठा झाला.यातून ती किंवा तो मला नाही म्हणतो/म्हणते,मला डीच करते म्हणजे काय?मग ज्या व्यक्ती वर प्रेम केलं म्हणतात तिच्यावर हल्ला होतो.
त्या माणसाने हे ही विशद करून सांगितलंय त्याच्या लेक्चर मध्ये.तुम्ही ब्रेकप झाल्यावर उदास का होता?
तुम्ही प्रेमात पडायच्या आधी सुखी होतात?तर होतात. पडून दुःखी झालात?झालात.मग आनंद साजरा करा न!अरे मी दुःखातून बाहेर आलो.हवं तर दुसर प्रेम करा.नाही जमलं म्हणून निराश व्हायची काय गरज आहे?तुम्ही असे वागता कारण इतर सर्व तसेच वागत असतात.इतरांकडे गर्ल फ्रेंड आहे,इतरांकडे गाडी आहे माझ्याकडं नाही.या रॅट रेस मधून बाहेत या.कारण ती न संपणारी यादी आहे.मला गाडीची आत्ता खरच गरज आहे का?का मित्रांना किंवा समाजाला स्वतःची लायकी किंवा स्टेटस दाखवून द्यायला गाडी घ्यायचीय?तस केलंत तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही.मग तुम्ही घेतलेली होंडा सिटी जी मिळवणं मध्यमवर्गीय लोकांना सहज शक्य नाही ती ही तुम्हाला सुख देणार नाही कारण तो वर तुम्हाला अस वाटेल अरे,bmw हवी.
एकूण पूर्वी हे सगळं घरचे किंवा इतर मोठी माणसं सांगत असत.आपल्या धर्मात हीच शिकवण आहे.कीर्तन आणि सो कॉलड बाबा लोक हेच सांगत असतात.खरंतर स्वतः ला वेळीच ओळखता आलं तर या लोकांची गरज च नसते.एकूण समाज मानसिक खचत चाललाय म्हणून बाबा लोकांची चलती सुरू आहे.कौन्सिलर बिझी होतायत.
मग अश्या समाजाला योग्य कौन्सिलर हवाच. फक्त त्याच म्हणणं नीट विचारपूर्वक ऐकून तस वागा हि.
हे सर्व त्या आमच्या पुतण्याला हि प्रत्यक्ष भेटलो तर सांगीनच.मग कदाचित तो म्हणेल,काका तू सुद्धा घरच्यासारखं च बोललास😀

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा