*यू ट्युबर*
जर तुमच्या पाल्यांनी म्हटलं कि, मॉम,डॅड मी यू ट्युबर होणार.
तर दचकू नका.हे नवीन रोजगाराचे साधन निर्माण झालेल आहे.जर त्याच्याकडं कम्युनिकेशन स्किल आहे,ज्या विषयाचा vlog तो तयार करणार म्हणतोय त्या विषयात त्याला नुसता इंटरेस्ट नसून बऱ्यापैकी ज्ञान आणि अनुभव असेल तर प्रयत्न करून बघ म्हणायला हरकत नाही.
आधी blog होते जिथं तुम्ही लिहू शकत होता. ते आहेत अजूनही ,पण आता हे दृक्श्राव्य माध्यम आलं आहे.काय असत हे ?ज्यांना माहीत नसेल त्यांच्याकरता माहिती देतो.तू नळीवर तुम्ही आपलं चॅनल फुकट उघडू शकता.तिथं तुम्ही तुमचे व्हिडीओ अपलोड करू शकता. यात ते अपलोड होताना कुठल्या सर्च लोकांनी मागितला तर चॅनल च नाव यावं हा पर्याय असतो तो फीलअप करावा.म्हणजे समजा मी तबला अपलोड करतोय तर मला,तबला,तबला लेसन, इंडियन क्लासिकल म्युजिक वग्रे शब्द तिथं भरेन. म्हणजे या शब्दाचा शोध कुणी घेतला कि माझा व्हिडीओ दिसेल सर्च मध्ये.दुसरा मुद्दा असा कायदेशीर आहे कि, तुमचा व्हिडीओ हा तुम्हीच तयार केलेला असावा.म्हणजे रेकॉर्डिंग झालेली गाणी,सिनेमे किंवा त्याची क्लिपिंग त्यात नसावी जेणे करून संमधीत लोक त्यावर आक्षेप घेणार नाहीत.युट्युब हे इतकं कसोशीने पाळत कि समजा तुम्ही ट्रिप ला गेलात तो व्हिडीओ टाकलाय पण त्यात कुठंतरी फिल्म च गाणं वाजतंय कुणीतरी लावलेल्या स्पीकरवर तर तुम्हाला नोटीस मेसेज येतो कॉपी राईट भंग होतोय या मूळ.एकतर ते काढून टाका,अख्खा व्हिडीओ डिलीट करा.किंवा कंपन्या लक्ष ठेऊन असाव्यात.कारण मी नाट्य संगीताचा व्हिडीओ टाकला तेंव्हा मेसेज आला होता पण त्यात हे ही आलं कि कम्पनीला काही ऑब्जेक्शन नाही ठेऊ शकता.
चॅनल च नाव तुम्ही ठेऊ शकता.असे व्हिडीओ काही दिवस निरीक्षण केले जातात.युट्युब मग जर कुणी ऑब्जेक्शन घेत नाही तुमच्यावर याची खात्री झाली कि तुम्हाला जास्त लेंथ चे व्हिडीओ टाकण्यास परवानगी देत.मग तुमचे व्हिडीओ लोक जास्त संख्येने पाहू लागले तर तुम्हाला एक पर्याय उपलब्ध होतो.त्यात जाहिराती टाकल्या तर चालेल का ? हो म्हणालेत तर त्या येऊ लागतात व्हिडीओ च्या मध्ये.मग त्या व्हिडीओ ला अमुक एक हिट्स मिळाल्या तर त्याचे पैसे तुमच्याकडे जमा होतात कालांतराने.पण यात ही प्रकार आहेत.त्या जाहिराती संपूर्ण बघितल्या का स्कीप केल्या गेल्या त्या नुसार पेमेंट होत.अर्थात हे इतकं सोपं नसत.परत त्यात गुगुल चा ही हिस्सा असतो.उरलेलं काही टक्के तुम्हाला मिळतात.आणि एक महत्वाचा घटक म्हणजे तुमचे सबस्क्रायबर किती आहेत ?म्हणजे नुसते बघून जाणारे वेगळे.ते तुमच्या हिट्स वाढवतात.आणि काही जण चॅनल आवडला तर तुम्ही पुढं कधी काही पोस्ट केलंत तर लगेच कळावे म्हणून ते सबस्क्रायबर बटन दाबतात आणि तुमचे ग्राहक होतात म्हणा पैसे न देता😊
मग जास्त सबस्क्रायबर तर जास्त उत्पन्न तुमचं.
आता हे सगळं वाढीस लागायला तुमच स्किल,नॉलेज आणि सादरीकरण महत्वाचं ठरत.या करता यातील यशस्वी लोक स्वतः चा प्रोफेशनल सेटप ठेऊन असतात.व्हिडीओ करता नवा विषय घेणं,तो प्रोफेशनली रेकॉर्ड आणि एडिट करून प्रेझेंट करणं या करता हे गरजेचे आहे.म्हणजेच हा फुल टाईम बिझनेस आहे बऱ्याच लोकांचा.मग लोक कमेंट मध्ये आपली मतं मांडतात जी बरी वाईट दोन्ही असतात.इतर युट्युबर तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करायची शक्यता असते.हे सर्व सहन करून मार्ग काढत राहावं लागतं.
समजा तुम्ही ग्याजेट विषयी चॅनल चालवताय तर काही कम्पन्या तुम्हाला त्यांची प्रोडक्ट पाठवून रिव्ह्यू द्यायला सांगतात.यात प्रलोभन ही दिली जातात.काही मोबाईल कम्पन्या चॅनल वाल्याना गिफ्ट देतात किंवा चक्क परदेशवारी घडवून आणून मोबाईल विषयी रिव्ह्यू अनुकूल करून घेतात.पण लोक चाणाक्ष असतात हल्ली बरेचदा.असे पेड रिव्ह्यू त्यांच्या लक्षात येऊन तुमचे फॉलोअर्स कमी होऊ शकतात.
काहीजण आपलं दैनंदिन जीवनच टाकत असतात.मी उठल्यावर काय केलं,घरात कशी मस्ती चालते,माझा कुत्रा कसा आहे,माझी मॉम नवी गाडी घेउम आलीय अस दाखवत असतात आणि प्रचंड चाहता वर्ग असतो त्यांचा.अशा लोकांना मग युट्युब बक्षीस म्हणून लोगो असलेल्या बटणाची प्रतिकृती भेट करत.त्यात ही सोन्याचं,प्लॅटिनम च अस असत.
हे युट्युबर ग्राहक वाढवायला गिव्ह अवे करतात.म्हणजे चाहत्यांना बक्षीस देतात.
आपल्या चॅनल च गेट टू गेदर ठेवतात.तिथं त्यांचे चाहते त्यांना भेटायला येतात.गिफ्ट ही आणतात.आणि काय असाव चॅनल वर याची चर्चा होते.
सो एकदम सिरीयस बिझनेस न भौ.
काही कलाकार वेब सिरीज करतात.आपलं टॅलेंट आपण दाखवतात.
काही महिला पाकसिद्धी, रांगोळी,हस्तकला चे चॅनल चालवतात.त्यांच उत्पन्न भरघोस आहे.
काही निगेटिव्ह पब्लिसिटी करतात.धिंच्याक पूजा हे उत्तम उदाहरण. गाणं तिचं बेकार असलं तरी प्रसिद्धी,पैसे आणि काही चॅनल वर उपस्थिती मिळाली न तिला.
नवीन पर्याय आहे.करून बघायला हरकत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा