गुरुवार, १३ जुलै, २०१७

दोस्त


 दोस्त लोग हो तो टेन्शन यू गायब होता है.
तिगस्ता माझे बाबा गेले.माझे पोयनाड चे मित्र भेटायला दुसऱ्या च दिवशी आले.मला फोन आला ,सल्या कुठं यायच रे समजत नाही जरा खाली येऊन उभा रहा.मी नाक्यावर उभा.प्रत्येक रिक्षा चेकवतोय.थोड्या वेळाने फोन आला,कुठायस ? म्हटलं ये मी आहे नाक्यावर वाट बघत उभा आहे.तर रव्या म्हणला तूच वर ये आम्ही पोचलो घरी.
वर गेलो न विचारलं ,मला दिसले कसे नाहीत?
तर म्हणॆ,तुला बघितलं न तुझ्या मागून गपचूप आलो वर.
मग म्हणलो,हलकटा मला हाक का नाही दिलीस ,उगा माझा पुतळा केलात न.
मग हसण्यात टेन्शन गुल.
सो
दोस्तो दोस्ती के लिय शुक्रिया
जरी मान्य नसला तुम्हांस तरी

मंगळवार, ३० मे, २०१७

प्रवास


प्रवास करताना ट्रेन बरी का लक्झरी ? माझे बडोद्याचे भाऊ आहेत त्यांना ट्रेन च आवडते.का ? तर अतिशय सेफ.निसर्गाची हाक आलीच तर ओ द्यायला डब्यातच सोय असते जी कधीही वापरता येते.बस न त्यांना भीती वाटते.
मला स्लीपर कोच आवडतो.पार्टिशन सारखा दरवाजा लावून घेतला कि आपण आपल्या रूम मध्ये असल्या सारखे निवांत.हवं तर खिडकी उघडा नाहीतर नको.ac चा व्हेंट हवा तसा अडजेस्ट करा.बरं गाडी ठराविक ठिकाणी खानपान करायला थांबवतात.निसर्गाची हाक आलीच तर तिथं सोय असते किंवा रात्री वग्रे ड्रायव्हर ला सांगितलं तर गाडी थांबवतात.
इतकी मोठी गाडी पण सस्पेंशन चांगलं असेल तर धक्का न देता नेते.
कधी कधी जोरात हॉर्न वाजवत ओव्हरटेक होतो. गाडी 90 अंशाचा कोन साधत गररकन वळते तेंव्हा ,
घाटात हेअर पिन बेंड ड्रायव्हर लीलया घेतो तेंव्हा शरीरातील आंड्रेलीन क काय ते वाढवलं जाऊन रोमांचकारी अनुभव ही येतो ज्याच वेगळं भाडं लागत नाही.ऑफ सिझन तर बऱ्याच कमी भाड्यात प्रवास होऊ शकतो. याच ही बुकिंग ऑन लाईन होत त्या मुळे ती ही सोय आहे.
ट्रेन मध्ये दिवसा बरेच विक्रेते येत असतात.रेल्वे चे लोक ही चहा वग्रे घेऊन सारखे फिरत असतात.रात्री हे नसत.पण दिवसा कुणी वर झोपत नसल्यानं खाली च बसतात .मग आडवं होता येत नाही.गुज्जू पब्लिक असेल तर बडबड आणि खाण्याचा सोहोळा रंगत असतो.म्हणून ट्रेन प्रवास करताना लोअर साईड बर्थ बरा वाटतो.
मग स्वतः च व्हेईकल सर्वात मस्त.बाईक प्रवास सबके बस कि बात नही.निसर्गाशी थेट जवळीक असते.थंड उष्ण जे असेल ते वार सरळ येत असत अंगावर.पाऊस ही तसाच भिडतो. पावसाचे थेंब तर चक्क चिंकुटा च काढतात जबरदस्त.मध्ये किंवा मुक्कामी थांबलं कि आरश्यात बघून किंवा नुसते हात बघून समजत किती प्रदूषण होत रस्त्यावर.शरीरभर काळा तपकिरी स्प्रे झालेला असतो.
पण हे अस निसर्गाशी सरळ जुडल जाणच मला आवडत.बाईकने अजून तरी दगा दिला नाही पण जर बया रुसून बसली तर तिला ढकलून न्यावं लागत ते टाके ढिल करणार असत.आधी न नंतर ऑइल चेंज वग्रे करावं लागतं.
पण दुसरे फायदे,
कुठलाही टोल नाका आला तरी त्याच्या नाकावर टिच्चून फु कट जाता येत.भयंकर जॅम मध्ये ही बायकर्स कडकडन पसार होतात.
मग चार चाकी.
हे प्रशस्त वग्रे वाहन.मस्त ac लावा.मुजिक सिस्टम वर आवडत संगीत ऐका. गाडी क्रूझ मोड वर टाका, एवंच ऐश असते.मध्ये खण असतो त्यातून थंड वाटली जी ठेवली असाल तिचा आस्वाद घ्या.पण जास्त गर्दी करू नये नाहीतर st बरी म्हणावं लागेल.तोटा म्हणजे गाडी बघून रस्त्यावर असणारे विक्रेते जास्त च भाव घेतात. पेट्रोल खर्च जास्त. पण गाडी बाळगणारा याची पर्वा करणारा नसतोच.
St प्रवास हि वेगळी मजा आहे.तिकिटाच्या किमतीत पूर्ण शरीराचा आटूक म्याटिक मसाज समाविष्ट असतो. सह प्रवासी वेगवेगळे नमुने भेटतात.कधी कधी मस्त दोस्ती होते.वाहकाशी लांबच्या प्रवासात ओळख होतेच, मग तो आपण चढलो का नाही हे बघूनच डबल बेल देतो.ड्रायव्हर बदलतात त्या मूळ दोन ड्रायव्हर ची ड्रायव्हिंग अनुभवता येते.गाडी मधेच बंद पडली तर डेपोतून दुसरी यायची शक्यता असते.किंवा वाहक दुसऱ्या st त सोय करून देतो.घाटावर च्या गाड्यात खिडकीत जवळ बसताना नीट बघून बसावे.तिकडच्या लोकांना गाडी बरीच लागते अस निरीक्षण आहे.त्या मूळ खिडकीततून ऑक केलेलं असत बरेचदा.हे लाल मातींन मढलेलं वाहन बऱ्याच लोकांच्या मनात जवळीक करून आहे अजूनही. गावाकडं नेणारी st.
सायकल ही उत्तम .पण ग्रुप हवा.कमीत कमी सामान घेऊन जाण महत्वाचं.शारीरिक क्षमता ही हवी.
शेवट आपल्या टू बाय टू न जाणे ही मस्तच.पाठ जितकं वाहून नेऊ शकेल तितकं गाठूड घ्यावं न निघावं.
प्रवास करणे म्हणजे अनुभव संपन्न होणं.तो मात्र घाईघाईत करू नये.वाटेत भेटणारा निसर्ग आणि माणसं यांचा अनादर न करता भेटावं.हे सर्व पाय चालतायत तो वर जरूर करावं मग,
जिंदगानी तो रहेगी
नौ जवानी फिर कहा

गुरुवार, ११ मे, २०१७

मुकद्दर का सिकंदर

फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता. नंतर हि
 दोन तीन वेळा गेलो होतो बघायला .जॅम आवडला होता सिनेमा.अमिताभ च एकटेपण,त्यात ही आई सारखी माया करणारी आई नि बहीण मिळणं, बाल पणीच प्रेम,ती मोठेपणी परत भेटणं.जिवाभावाचा मित्र मिळणं. मग त्याच्या साठी त्याग वग्रे मसाला ठासून भरलेला.त्यात रेखा न अमजद,रणजित च कॅरेक्टर टाकलेलं.गीत सेठी ची योग्य प्रमाणात असलेली कॉमेडी.त्याचा न अमिताभ चा पिंटाक झाल्यावरचा झक्क जमलेला सीन.
तर अगदी cd संग्रही ठेवली होती.
पण नंतर बरेच वर्षांनी बघितला परत तर मात्र मत बदललं.त्या वेळी आयुष्याचा अनुभव नव्हता,आताही खूप आहे असं म्हणणं नाही.पण सोसलंय बरच ते ही जाणीव पूर्वक.
या सिनेमात त्याच प्रेम पात्र त्याचा आयुष्यात बालपणी आलंय. ती बिचारी सहानुभूतीने याच्याशी वागते त्याला हा प्रेम समजतो.
ते बालपणी ठिकय. साहेब मोठे झाले तरी तिला विसरू शकत नाही.हे ही ठीक.पण एक प्रसंगी ती याला स्पष्ट सांगतेय,कि बाबा झालं गेलं विसर.ते बालपणी घडलं.माझ्या मनात तुझ्या करता तस काही नाही.तेंव्हा दुसरी बघ न हो मोकळा. पण नाही,हे महाशय देवदास होऊन च बसलेत.
मग यांचा परम प्रिय मित्र आणि ती,यांचं जमत.आता मित्र म्हणतो तर सांग न त्याला खुल्लम खुला आधीच,कि बॉ मी या समोरच्या बंगलेवाली वर इतकुसा होतो तेंव्हा पडून टप्पे टाकून राह्यलोय. म्हणजे तो टप्पे टाकताच नाही.
मग येते जोहरा बाई. हे पात्र याच्या प्रेमात पडत.पण मित्र सांगून जातो सिकंदर च्या आयुष्यातून दूर हो तर ही हिरा चावून जीव देते.तीच एक ठीक .पण सिकंदर बंद दरवाजा ठोकत म्हणतो,
देख जोहरा दरवाजा खोल दे नही तो मैं दिल जला हूं दुनिया जलाकर राख कर दुंगा!!!!!!
क्यो भाई,दुनिया ने क्या बिगाडा तेरा इसमे , अगर जोहरा दरवाजा नही खोलती तो उस्को बोल खोलने को प्यार से.किंवा का उगा जीव आटवतो ,ती नाय म्हणते न म सम्पल न भौ. छोड दे.
त्या अमजद च कॅरेक्टर पण फुकट मरत.जोहरा सिकंदर पे मरती है बातमी बरोबर पण सिकंदर जोहरा को नही चाहता न भाय. वो बात समझ लेता तर शेवट,
या अल्ला ये आखरी वक्त मै भोत बडी गलती कर बैठा
म्हणावं लागलं नसत.
तर अस माझं मत बदललं नंतर.
तरीही सर्व कलाकारांचा अभिनय,स्क्रिप्ट न एकूण ट्रीटमेंट सिनेमा लक्ष्यात ठेवते.गाणी ही सर्व मस्त.रेखा चा कोठा तर मस्त उभा केला होता.मुजरा हा प्रकार करावा तर फक्त आणि फक्त रेखानेच.तिचा मुजरा यात आणि उमराव जान मध्ये बघताना सलाम करावा तिला.शृंगार रस किती खानदानी पद्धतीनं नृत्यविष्कारात उभा करते बाई कि वाह !कुठंही बटबटीत मादकता वग्रे नाही.शालीनता फक्त कुणा खानदानी घरातच नसते तर ती कोठ्यावर ही असते हे च ठासवते रेखा. अदबीने केलेला  आदाब म्हणजे काय तर रेखा चा बघावा.,
तर अस जाणवत जात आपल्याला आवडलेल्या सिनेमातील एकेक .त्या वेळी भयानक चांगला न त्रुटी हीन वाटलेला सिनेमा नंतर त्यातल्या चुका दिसू लागतात.तरीही तो मनात घर करून रहातोच.

रविवार, ७ मे, २०१७

शिवाजी मंदिर


शिवाजी मंदिर!!!!
तिथं जाण हा मनोरंजन नव्हे तर संस्कृतीचा भाग होता. सण असल्यासारखं वाटायचं.त्या बाबतीत माझं भूत झालंय. म्हणजे त्या काळात अडकून पडलोय.
बाबा आवर्जून सर्वांच बुकिंग करीत असत.आधी स्वतः पण लवकरच ती जबाबदारी माझ्यावर आली. दरवेळी बाबा निक्षून सांगत.मिळेल तेव्हड पुढचं न गॅंग वे जवळच बुक कर.तीच सवय मलाही लागली होती.मग प्रयोगाच्या दिवशी मस्त कपडे घालून निघायचं.बाबांना अत्तराचा षोक होता.ते अत्तर आम्हाला ही लावत.मग आईला मध्ये ठेऊन आजूबाजूला आपण बसायचं हे सांगणे होई.तिथं गेलं कि जाहिराती बघायच्या.आगामी आकर्षण कुठलंय,आपण पाहिलंय का? मग काका तपकीर वाले होते तिथं बाबा तपकीर ही घेत.जिन्यात लावलेला मोठा आरसा लक्ष वेधून घेई.पब्लिक ,विशेषतः स्त्री वर्ग तिथून रेंगाळत च चाले.थिएटर मध्ये शिरलं कि सुखद गारवा स्वागत करायचा. डोअर किपर सीट दाखवायला असेच.सर्व मराठी माणस लग्नाला आल्यासारखी आलेली असायची.अत्तर,गजरे याचा मंद सुगन्ध दरवळू लागे. तरी गोंगाट नसे.स्थानापन्न झालं कि समोर शिवकालीन महाला समोर बसल्या सारख वाटे.सज्जा ,खिडक्या अस दृश्य.वर मखमली पडदा.त्यावर हार.दोन्ही कोपऱ्यात ढाल तलवारी मोठ्या साईझ च्या.हळू हळू दिवे मंद होत तिसरी घंटा होई.सर्व जण कान अन डोळ्यात प्राण आणून स्टेज कड पाहू लागत.मग आकाशवाणी झाल्या सारखी उदघोषणा होई,
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
चंद्रलेखा सादर करीत आहे तीन अंकी नाट्य प्रयोग
गारंबीचा बापू,,,
मग सर्व माहिती झाली कि,
आणि dr काशीनाथ घाणेकर,,,
मग टाळ्यांचा प्रचंड कडकडाट.
पडदा हळुवार वर जाई एकेक घडी आवरत.समोर साकारलेल नेपथ्य परत टाळी घेई अन रंग देवता प्रसन्न होई.
मध्यनतरात बाहेर वडा आईस्क्रीम वाट बघत असे.नाटक सम्पल कि तृप मनाने परतत असता कुणी कलाकार अवचित दिसे,मग त्याच्या भोवती गराडा होई.येताना बाबा हॉटेलात नेत ती वेगळी मेजवानी.आईला परत गेलं कि जेवण करायला नको म्हणून.
दादरला रहात असल्याने नातेवाईक,ओळखीचे,त्यांच्या ओळखीचे खरेदी किंवा शिवाजी ला नाटक पाहायला येत ते आमच्या कडेच उतरत.यायच्या आधी निरोप येई,मामा सल्याला पाठवून बुकिंग कर अमुक नाटक अमुक दिवशी आहे ते पहायला येतोय. मग मी बुकिंग करायचो.कधी कधी मला ही सोबत म्हणून नेत. मग त्यांची तान्ही बाळ संभाळायला आई कड ठेवीत.कधी रडू लागली तर त्यांना फिरवून आणायचं काम ही करावं लागे. पण त्यात हि आनंद होता.
मग आमचा बब्या नावाचा मित्र तिथं डोअर किपर म्हणून लागला.मग ऑर्केस्ट्रा वग्रे असला कि तो सांगे,या भाई आज.म पव्या ,मी गेलेलो आठवतंय.
प्रदीप,प्रशांत दामले शिवाजी च्या कट्ट्यावर बसलेले दिसत.दामल्या तर मस्त पैकी मळी काढताना पाह्यलाय. मग कलाकारांच्या विषयी बऱ्या वाईट खबरा हि बब्या मुळ कानी पडत.घाणेकर युग सम्पत आलं होतं. दामले,विजय चव्हाण,प्रदीप ,लक्ष्या अन मग भरत जाधव यांचं वादळ आलं.नंतर दादर शी सम्पर्क तुटला.
आता त्या नाट्य संस्था ही नाहीत,ते कलाकार,ते लेखक ही नाहीत.जरा वेगळं वाटत.हल्ली तर जावसच वाटत नाही.त्या वेळी कलाकार कोण या बरोबर लेखक ही जबरदस्त होते.कानिटकर,दळवी सारखे.
आता हि आहेत नवे जुने लोक पण ती मजा येत नाही.तेंव्हा कोवळ्या मनावर कोरल गेलेलं अजून पुसलं जात नाही इतकंच.
तर शिवाजी मंदिर ला साभार दंडवत.अन त्या सर्व लोकांनाही ज्यांनी अश्या आठवणी चा खजिना आमच्या हवाली कायमचा करून दिला.🙏🏻🌹

रविवार, ३० एप्रिल, २०१७

रोमांच

काय झालं होतं रे ?
पित्ता मुळे रॅश आला होता,थोडा ताप अस सुरू होत.उन्हा मुळ झालं.
पण असं कसं? एकदम!
म्हटलं,
त्याच काय आहे,आयुष्यात रोमांच उभे राहावेत असा प्रसंग कधी आला नाही.बाहेर पडलोच सकाळी लवकर तर सूर्या कड पहात गायत्री मंत्र मनात म्हणतो कधी कधी.
त्या दिवशी ट्युशन ला 8ला बाहेर पडलो.सूर्य दिसला,नमस्कार केला.हेल्मेट मधून त्याला मनातनच विचारलं,
काय हो देवा हे रोमांच वग्रे लोक्स म्हणतात ते काय प्रकरण आहे.
तुला अजून अनुभव नाही?
नाय बॉ.
थांब माझ्या परीने तुला समजावून सांगतो,नव्हे प्रत्यक्ष अनुभव देववितो.
मी खुश.2 किमी.झाले तरी काही अनुभव नाही.
काय देवा चेष्टा केली का राव तुम्ही आमची.
तो गालात हसत म्हणला,
वत्सा,आज माझी ड्युटी समाप्त होण्या आधी तुला प्रत्यय येईल धीर धर.
मग काय संध्याकाळी पित्त वाढून पुळ्या आल्या.महाराज ड्युटी सम्पवून जात होते.त्यांना म्हणलो,
हे काय देवा! असा असतो होय रोमांच!चैला ब्र होत नव्हता अनुभव तर.
बालका,तस नसत ते.पण तू माझ्या कडे मागणी केलीस.तुझ्या वरच्या प्रितीने मी माझ्या पद्धतीनं तुझी मदत केली न अनुभव दिला.😅
तर असं झालं होतं आजाराचं कारण.
@सलील जोशी.

शनिवार, २९ एप्रिल, २०१७

मोबल्या घेताना

मोबल्या घेताना,
गेले महिनाभर मोबाईल बिघडला म्हणून नवा घेताना कुठला घ्यावा,याचा शोध घेताना काही माहिती जमा झाली.तुमच्या शी शेअर करतोय.उपयोग झाला तर बघा.
आखूड शिंगी बहु दुधी असच आपण शोधत असतो.हल्ली मार्केट मध्ये चायनीज कम्पन्यांचं वर्चस्व आहे.मोटोरोला हि लिनॉव्हो न घेतलीय.
फोन मध्ये काय हवं?आपला उपयोग काय ? यावर फोन कुठला घ्यावा हे ठरवावं.
जर तुम्ही टेक्नो सॅव्ही नाहीत,गेम वग्रे खेळत नाहीत.फोन जास्त करून दुसऱ्याशी बोलायला,मेसेज करायला आणि कॅलक्युलेटर सारखं ऍप वापरता,कधी नेट वर थोडं सर्च करता तर खूप लो बजेट फोन 4 हजार च्या आसपास मिळतील.
पण नेट वर असणार आहात, कॅमेरा वापरणार आहात, हाय एन्ड गेम खेळणारे आहात, मॅप भटकंतीत वापरता तर मात्र त्यात काही गोष्टी बघाव्या लागतील.
सर्व प्रथम मेमरी किती आहे,कॅमेरा कसा न किती mp आहे,os म्हणजे कार्य प्रणाली कुठली आहे ,सर्विस सेंटर जवळ आहे का? कम्पनी च आजवरचे रेप्युटेशन कस आहे,हे पहावं.
मोबाईल मध्ये असलेली app नीट चालायला त्याला उपयुक्त सेन्सर्स लागतात.
त्यातले काही बहुतेक सर्व फोन मध्ये असतात.
प्रोक्सीमेटी सेन्सर सारखे.म्हणचे फोन बोलायला गाला जवळ नेला कि स्क्रीन आपोआप बंद होतो,तो सेन्सर.
बाहेर किती प्रकाश आहे त्या नुसार तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून स्क्रीन कमी जास्त प्रमाणात प्रखर करणं हे काम करणारा सेन्सर.लाइट सेन्सर.
मॅग्नेटिक सेन्सर असतो ज्या मूळ होका यंत्र असणार app चालत.जर हा सेन्सर नसेल तर दिशा दर्शक app चालणार नाही.
जायरो स्कोप सेन्सर
तू नळी वर हल्ली 360 डिग्री व्हिडीओ आलेत ते बघायचे असतील किंवा गुगुल चा किंवा अन्य कँपन्यांचा vr बॉक्स काम करणार नाही.फोन फिरवला गेलाय याच ज्ञान सिस्टीम ला हा सेन्सर करून देतो.
एक हॉल सेन्सर हि येतो जो चुंबकीय क्षेत्र वग्रे मोजतो.
ब्यारो मीटर मला वाटत समुद्र सपाटी पासून किती उंचावर आहोत ते दाखवतो.
हिट सेन्सर तपमान दाखवतो.
तर आपल्याला काय वापरायचं आहे त्या नुसार सेन्सर फोन मध्ये आहेत का ? हे बघावं.सेन्सर मदर बोर्ड वर असतात.जे डाऊन लोड करता येत नाहीत.
दुसरं प्रोसेसर कुठला आहे,त्याला किती कोअर आहेत,त्याचा स्पीड किती आहे आणि सध्या कुठला प्रोसेसर नवा आलाय याची माहिती आंजावर घ्यावी.
Ram म्हणजे मेमरी किती आहे ते बघावं.ram जास्त असेल तर काम पटकन करतो फोन.
स्क्रीन साईझ किती आहे,त्यावर गोरिला ग्लास सारखं प्रोटेक्शन दिलंय का आपल्याला घ्यावं लागेल ते हि पहावं.
जो फोन निवडाल त्याच्या बद्दल वापर केलेल्या लोकांचं काय मत आहे ते जालावर शोधावं.
चायनीज कम्पन्या च आपल्या कडे न सर्वत्र जास्त आहेत.शाओ मी , कुल पॅड हे फोन मोदींच्या मेक इन इंडिया कॅम्पेन नुसार भारतात अनुक्रमे आंध्र आणि औरंगाबाद येथ तयार होतात.म्हणजे आपल्या देशात तयार होणारा फोन ज्या मूळ आपल्या बऱ्याच लोकांना रोजगार मिळतोय.सो आपली देश भक्ती,प्रेम अबाधित राहायला हि हरकत नाही.
आता सॅमसंग सारखी जुनी कम्पनी आहे जिचं नेटवर्क खूप आहे.सर्विस सेंटर खूप आहेत.
पण ते लोक उगा वेगळी मॉडेल आणून हे हवं ते न देता जास्त किमतीत देतात असं जाणवलं.त्यांचे फोन लवकर हँग होऊ लागतात असा सूर जालावर जाणवला.
ओपो व्हीव्हो सारख्या कम्पन्या चीन च्या असल्या तरी त्या जास्त किमतीत फोन विकतायत. त्या नुसार हवं ते फोन मध्ये नसत.हे लोक डीलर ला जास्त कमिशन देऊन धंदा वाढवतात असं वाटलं.
शाओ मी,कुल पॅड या कम्पन्या ऑन लाईन विक्री जास्त करतात.त्या मूळ डीलर च कमिशन व इतर खर्च कमी होऊन हे ग्राहकाला जास्त सुविधा देत आहेत.ज्या मुळ जालावर फ्लॅश सेल मध्ये हि कधी कधी मिळत नाहीत.
शाओ मी च्या साईट वर डायरेक्ट जाऊन प्री ऑर्डर करता येते.
कुल पॅड फोन खूप चांगला आहे पण माझा मदर बोर्ड निकामी झाला दीड वर्ष्यात .तो रिपेअर करायचा तर 3 हजार खर्च आणि 20 दिवस वेटिंग सांगितलं म्हणून शाओ मी घेतला.खूप चांगला वाटतोय आज तरी.काही ओळखीच्या लोकांकडे 4 वर्ष विना तक्रार चालू आहे म्हणून घेतलाय.शेवट हि उपकरण चालणं न चालणं यात नशिबाचा भाग हि आहेच.
आणि सांगायचं राह्यलं ते म्हणचे बॅटरी किती पॉवर ची आहे? हल्ली बऱ्याच फोन ची बॅटरी नॉन रीमुव्हेंबल असते.ते हि चेक करावं.हायब्रीड स्लॉट असतो ज्या मूळ 2 सिम किंवा एक सिम एक मेमरी कार्ड असच चालू शकत नव्या फोन मध्ये.
अजून एक गोष्ट फोन आवडला तरी तो कधो लॉन्च झालाय ते बघावं.कारण जुना असेल तर जिओ किंवा 4g त्यात चालणार नाही जर वापरणार असाल तर.
इतकं केलं कि पसंतीचा फोन जालावर तुलना करण्यास टाकावा म्हणजे जास्त कळेल.बरेच फोरम आहेत ते वाचावे.तू नळीवर प्रत्येक फोन चे रिव्ह्यू आहेत ते पाहावे.
मग फोन घेतला कि देवाचं नाव घेऊन वापरणं सुरु करावं.
लवकर बिघडला तर
सर्व अशाश्वत असत हे तत्वज्ञान आठवावे
समजा नीट चालला दोन तीन वर्षे तर खुशाल म्हणावं
म!घामाचा पैसा आहे अन नीट बघून घेतला होता😃
सो हैप्पी फोनिंग
सलील जोशी

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

कुणी तरी आहे घरात

परत यायला उशीर करू नको.आणि येताना त्या पडक्या धर्म शाळेत डोकवायला जाऊ नको.
अश्या सूचना गावी मिळत असत.रिकाम्या ,पडक्या वास्तूत भूत असत म्हणे. त्या ठिकाणी कसलेसे आवाज येतात.कुणी तरी कपडे धुतय असा आवाज येतो.काही वाटल्या सारख पाटावरवंट्याचा आवाज येतो.
            आता तस काही राहील नाही.पण नीट निरीक्षण केलं तर आजही हे होत असत.अद्ययावत साधनांनी युक्त घर आहेत.पण घरात राहायला कुटुंबियांना वेळ नाही.मग ही साधन घराचा ताबा घेतात.
       गृहिणी मशीन ला प्रोग्रॅम सेट करून बाहेर पडलेली असते.ते मशीन मग 10 वाजता प्रोग्रॅम सुरू करून तासाभरात कपडे ड्राय करून तश्रीफ हलवत उभं रहात.
       क्लास ला गेलेली तरुण कम्पनी सेट टॉप बॉक्स ला अमुक कार्यक्रम रेकॉर्ड कर म्हणून सूनवून गेलेली असतात.तो ही दिली वेळ सुरू होऊन कार्यक्रम रेकॉर्ड करून स्टॅन्ड बाय रहातो आपल्या फुल hd रेडी दोस्ता सकट.
         रात्र पाळी करून आले कि गरम मिळावा नाष्टा मालकांना म्हणून टैमर लावलेला मावे मालक यायच्या जरा आधी आपलं काम बजावून वाट बघत असतो.
       चिरंजीवानी विषाणू शोधून नष्ट कर न मग बंद हो रिपोर्ट ठेऊन सांगितलेला संगणक आपलं काम सम्पवून सिस्टीम बंद करून घेत असतो.
      काही फ्रीज तर आपले आपण पोटातले जिन्नस सम्पले कि मॉल ला ऑर्डर देतात ,पाठवा ही लिस्ट.
     Cctv डोळे न मिटता सर्व क्षण चित्र टिपून घरावर लक्ष ठेऊन असतात. मालकाला जीवन्त प्रक्षेपण ही उपलब्ध करून देत असतात.
     एखादं वेळी दिवे लागणी ला आपोआप सुरू होऊन सूर्य किरण आली कि  सैतान गायब होतो तशी बंद होणारी यंत्रणा ही आपलं काम चोख करीत असते.
        आणि ज्यांच्या साठी घर आहे ती जीवन्त माणसं मात्र काहीच तास इथं वास्तव्याला असतात. बरेचदा ती ही एकत्र एक वेळी नव्हे तर पाळी असेल तशी.
  तेंव्हा जुन्या काळी पडके वाडे हुडे भूत बंगले असतं, आता राहती घर ही तशीच होत चाललीत हळू हळू असं वाटत.