फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता. नंतर हि
दोन तीन वेळा गेलो होतो बघायला .जॅम आवडला होता सिनेमा.अमिताभ च एकटेपण,त्यात ही आई सारखी माया करणारी आई नि बहीण मिळणं, बाल पणीच प्रेम,ती मोठेपणी परत भेटणं.जिवाभावाचा मित्र मिळणं. मग त्याच्या साठी त्याग वग्रे मसाला ठासून भरलेला.त्यात रेखा न अमजद,रणजित च कॅरेक्टर टाकलेलं.गीत सेठी ची योग्य प्रमाणात असलेली कॉमेडी.त्याचा न अमिताभ चा पिंटाक झाल्यावरचा झक्क जमलेला सीन.
तर अगदी cd संग्रही ठेवली होती.
पण नंतर बरेच वर्षांनी बघितला परत तर मात्र मत बदललं.त्या वेळी आयुष्याचा अनुभव नव्हता,आताही खूप आहे असं म्हणणं नाही.पण सोसलंय बरच ते ही जाणीव पूर्वक.
या सिनेमात त्याच प्रेम पात्र त्याचा आयुष्यात बालपणी आलंय. ती बिचारी सहानुभूतीने याच्याशी वागते त्याला हा प्रेम समजतो.
ते बालपणी ठिकय. साहेब मोठे झाले तरी तिला विसरू शकत नाही.हे ही ठीक.पण एक प्रसंगी ती याला स्पष्ट सांगतेय,कि बाबा झालं गेलं विसर.ते बालपणी घडलं.माझ्या मनात तुझ्या करता तस काही नाही.तेंव्हा दुसरी बघ न हो मोकळा. पण नाही,हे महाशय देवदास होऊन च बसलेत.
मग यांचा परम प्रिय मित्र आणि ती,यांचं जमत.आता मित्र म्हणतो तर सांग न त्याला खुल्लम खुला आधीच,कि बॉ मी या समोरच्या बंगलेवाली वर इतकुसा होतो तेंव्हा पडून टप्पे टाकून राह्यलोय. म्हणजे तो टप्पे टाकताच नाही.
मग येते जोहरा बाई. हे पात्र याच्या प्रेमात पडत.पण मित्र सांगून जातो सिकंदर च्या आयुष्यातून दूर हो तर ही हिरा चावून जीव देते.तीच एक ठीक .पण सिकंदर बंद दरवाजा ठोकत म्हणतो,
देख जोहरा दरवाजा खोल दे नही तो मैं दिल जला हूं दुनिया जलाकर राख कर दुंगा!!!!!!
क्यो भाई,दुनिया ने क्या बिगाडा तेरा इसमे , अगर जोहरा दरवाजा नही खोलती तो उस्को बोल खोलने को प्यार से.किंवा का उगा जीव आटवतो ,ती नाय म्हणते न म सम्पल न भौ. छोड दे.
त्या अमजद च कॅरेक्टर पण फुकट मरत.जोहरा सिकंदर पे मरती है बातमी बरोबर पण सिकंदर जोहरा को नही चाहता न भाय. वो बात समझ लेता तर शेवट,
या अल्ला ये आखरी वक्त मै भोत बडी गलती कर बैठा
म्हणावं लागलं नसत.
तर अस माझं मत बदललं नंतर.
तरीही सर्व कलाकारांचा अभिनय,स्क्रिप्ट न एकूण ट्रीटमेंट सिनेमा लक्ष्यात ठेवते.गाणी ही सर्व मस्त.रेखा चा कोठा तर मस्त उभा केला होता.मुजरा हा प्रकार करावा तर फक्त आणि फक्त रेखानेच.तिचा मुजरा यात आणि उमराव जान मध्ये बघताना सलाम करावा तिला.शृंगार रस किती खानदानी पद्धतीनं नृत्यविष्कारात उभा करते बाई कि वाह !कुठंही बटबटीत मादकता वग्रे नाही.शालीनता फक्त कुणा खानदानी घरातच नसते तर ती कोठ्यावर ही असते हे च ठासवते रेखा. अदबीने केलेला आदाब म्हणजे काय तर रेखा चा बघावा.,
तर अस जाणवत जात आपल्याला आवडलेल्या सिनेमातील एकेक .त्या वेळी भयानक चांगला न त्रुटी हीन वाटलेला सिनेमा नंतर त्यातल्या चुका दिसू लागतात.तरीही तो मनात घर करून रहातोच.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा