रोहिडा बघायचा होता पण जमत नव्हतं.काल अचानक जावंस वाटलं रात्री आठ च्या सुमारास निघालो परळ डेपोत दहा ला पोचल्यावर समजलं सव्वाअकरा न सव्वा बारा अश्या गाडया आहेत. मग १तास वाट बघत सव्वा अकराची गाडीपकडली.पाचला भोरला उतरलो.दोन पेपर वाले पेपर लावताना दिसले स्टॅन्ड बाहेर. त्यांना विचारलं बाजारवाडी गाडी कधी आहे. एक म्हणला ,मी नवीन आहे इथं मला माहित नाही. दुसरा म्हणला आठ ला येईल गाडी. परत स्टॅन्ड मध्ये गेलो .. मी आणि दोन म्हातारे गृहस्थ स्टॅन्ड मध्ये होतो .
भटकंती करताना अपरिचित लोकांची भेट होत होत असते . कधी चांगले कधी वाईट अनुभव मिळतात . पण मला जास्त चांगलेच लोक भेटलेत आजवर . सुरुवात या दोघांपासून झाली आजची . बाजारवाडी बस कधी विचारलं तर म्हणले सांगतो कि आली कि . गप्पा सुरु झाल्यावर तुम्ही कुठले वग्रे झालं. तेंव्हा समजलं हे दोघेही बोरिवली च्या सरकारी ऍन गोदामात हमाली करतात. आधी १०० किलो ची गोण असायची हो,आता आल्यात ४०न २५किलो च्या. मग तुम्हाला पाठदुखी लागली असेल.
तर काय हो ,हे गुढघे आता चालून देत नाहीत. इतक्यात एक गाडी लागली. चालक आणि महिला वाहक कुणी प्रवासी नाही म्हणून जाऊ लागले तर त्या काकांनी थांबवून मला हाक दिली,चला जा हि गाडी जाते बाजारवाडीहून . त्यांचे आभार मानून गाडीत बसलो. दहा मिनिटात बाजारवाडीत उतरलो. गाव शांत. अजून नीट उजाडलं हि नव्हतं . गड मात्र दिसत होता त्याच्या रोखाने पुढं निघालो. एक बाई शेणाची टोपली जमिनीवर रिकामी करत होत्या त्यांना विचारलं,
गडाची वाट हीच का ?
कुठून आला दादा ?
विरार .
मंजे आताच उतरला न ?
हो भोर वरून आलो ती गाडी गेली तिने.
मग चहा नाश्ता काही केलंच नसेल ?
नाही.
जरा थांब,या इतक्या लावतो मग माझ्या घरी ये चहा घे मग निघ गडावर.हे इतकं लावून झालं का निघू. हे काय हाय माहितीय का ?
हो,शेणी थापताय न.न.मग हसली न म्हणली, हा रे . हल्ली लोकांना माहित नसत म्हणून म्हणलो. तिच्या शेणी लावून झाल्यावर तिच्या सोबत निघालो. समोरच छोटं घर होत. नवरा बाहेर अंघोळ करत बसला होता दारातच त्याला म्हणली,अवो बगा गडावर निघालेत त्यांना घेऊन अली. चहा घेऊन निघा म्हणलो. तो हि पटकन म्हणला , या आत बसा जाऊन. जेमतेम बारा फुटी घर. दारा नंतर अगदी छोटी पडवी तिच्यात म्हैस बांधलेली. पूढं बाजेवर बस म्हणली तिथं बसलो. बाई चहा करायला लागल्या. काल तर गडावर जत्राच होती माणसांची. शाळेच्या ट्रिपा , बाकी हि लोक. खालपासून वर पर्यंत रंग लागली होती .आम्ही हि देतो करून कुणी म्हणलं तर नाश्ता,जेवण . नवरा शर्ट चढवून आला. म्हैस आता ओरडू लागली न जागीच पुढं माग होऊ लागली. तिचं खाण्याचं टाइम झालं का ?हा ,धार काढायची आहे तिची. तिला वर मंदिरा जवळ बांधली तर रहात नाही, आम्ही जवळ लागतो. इतक्यात चहा घेऊन बाई आल्या . स्टील चा ग्लास होता. तुम्हाला बशी लागलं का ? हो हे खूप गरम झालंय . मग त्यांनी बशी दिली. चहा पिऊन निघताना म्हटलं,पैसे किती द्यायचे?हट , पैसे कसले? चहा नाश्ता न करताच गडावर निघाला म्हणून बोलावलं ,पैसे नको. तरी मी ठेवले पैसे म्हटलं,अहो सकाळी सकाळी असच कसा घेऊ ?पुन्हा येईन तो कालवून येईन मग जाताना नाश्ता आणि जेवण तुमच्याकडे करीन . फोन नंबर देऊन ठेवा. त्यांनी दिला. मग बाई परत मला वाट दाखवायला आल्या. या पाण्याच्या टाकी खालून जो रस्ता गेला न तो सोडायचा नाही. काही काळजीच कारण नाही वाट अगदी सरळ आहे. मग सुरुवात इतकी प्रेमळ माणसं भेटून झाली म्हणल्यावर आनंदानं निघालो. गड दिसत होता पण वाट अजिबात नाही. जस जसा पुढं गेलो तशी वाट उलगडत गेली. एक गुराखी पोरगा भेटला त्याला म्हणलो, नीट चाललोय ना रे गडावर ? तो हि म्हणला , हि वाट सोडूच नका. पायवाट च आहे . बांधीव पायऱ्यांची ऐश नाही. चालायची सवय सुटल्याने दमछाक होत होती. पण ऊन चढलं नव्हतं न वातावरण हि गार असल्यानं मस्त वाटत होत. मध्ये विश्रांतीला बाके हि ठेवलेली आढळली त्यांचा उपयोग केला . शेवटी दरवाजा दिसला पण तो हि आपल्याला सन्मुख नाही. राजांच्या गडाचं वैशिष्ट्य. दरवाजा दिसतच नाही समोरून. तीन दरवाजे पार करून गडावर पोचलो. बऱ्या पैकी विस्तीर्ण आहे गड . थोडाही तटबंदी आणि मला वाटत ७ बुरुज अजूनही उभे आहेत. पाण्याची टाकीही आहे मुबलक ज्यात पाणी आहे. एक तर पाहल्या दरवाजात आहे . रोहिडेश्वर मंदिर बंद होत. त्या समोर काही फुलझाडं लावलेली दिसली. जे कुणी हि बाग फुलवतायत त्याचं कौतुक वाटलं . काही वाड्याचे अवशेष आहेत बाजूस त्या मध्ये गडावर सापडलेले जात्याचे,, मातीच्या मडक्याचे वगैरे तुकडे लोखण्डी टेबल वर मांडून ठेवले आहेत. जे कुणी घेऊन न जाताट तिथंच राहू दिलेत हे बघून बर वाटलं. गवत गड भर वाढलं होत. आणि अख्ख्या गडावर मी एकटाच होतो. हँड पाहायला तासभर लागतो . बाकी गड इथून दिसतात म्हण पण धुक्यामुळं दिसत नव्हतं. बाजी प्रभूंची आणि राजांची भेट इथंच झाली. मग खाली निघालो . गडाचा दरवाजा काम करतोय हे जाणवलं. उतरताना रस्त्यात तिघे वयस्क लोक गप्पा मारत होते त्यांना रामराम केला. मग त्यानी चौकशी केली माझी.
कुठून आले दादा ?
विरार. तुम्ही इथलेच दिसता ?आज गडावर निघाले का ?
अहो रोज जातोय कि,फुलझाडं लावलीयत त्यांना पाणी घालायला.
बघितली तो उत्तम काम करताय . धन्यवाद तुम्हाला राजांचा गाद आज हि असा राखताय .
तुम्ही वस्तीला होता का /
नाही आज लवकर आलो न आलो गडावर जाऊन .
पण तुम्ही सर्व गड बघितला का नीट ?
हो तर . तुमची बाग बघितली,सर्व बुरुज आणि पाण्याची टाकी बघितलं .
हा , मग ठीकाय, पण अंघोळ केली का न्हाय ?
नाही हो.
बर बर . पुढल्या खेपी रहायला या. पाणी पाणी हाय अंघुळी ला ,राहायची बी सोय हाय.
नक्की नक्की म्हणून त्यांचा निरोप घेऊन उतरू लागलो. एक वळणावर आलो त्या वाटेतून दुसरी वाट दिसली म्हटलं जावं बघून . पण ती बरीच निसरडी होती. बसूनच उतरावं लागलं सर्कस करत . हा माझा प्रयत्न एक माणूस खालून बघत होता. त्याच्या जवळ पोचल्या वर म्हणला ,
गेले त्या वाटंनंच उतरायचं हुत कि , तिकडन का आलात.
काही नाही उगा म्हटलं बघू जाऊन. मग त्यानं चौकशी केली कुठून आलात वगैरे. त्याचा निरोप घेऊन गाडी पकडायला चौकात आलो . भाड्याच्या गाड्या लागल्या होत्या त्यानी बघताच विचारलं,सर भोर ला जाणार का ? हो तुम्ही कधी निघणार ? हे काय माणसं जमली का निघालो.मग जरावेळ वाट बघावी लागली. काही बाया न म्हातारे आले. आधी मी, एक आजोबा न ड्रायव्हर असे पुढं होतो. इतक्यात एक शाळेचा मुलगा हि येऊन बसला. तो उतरला थोडं पुढं गेल्यावर पण अजून एक आजोबा येऊन बसले . आता हा गाडी कशी चालविल?हा विचार आला मनात . बसलेले दोन्ही बाजूचे म्हातारे हि ऍडजेस्ट करत बसले, त्यांच्या पायाखाली हात घालून तो गियर बदलत होता . भोर येस्तोवर माझ्या उसण भरते तस झालेलं. त्या ड्रायव्हरला म्हटलं कमल आहे बॉ तुंचीकाशी चालवू शकता गाडी तुम्ही इतक्या अडचणीत .
अहो सर सवय आहे आम्हाला आणि पासिंजर लोकांना हि. तुम्ही होते आज म्हणून एक सीट कमीच भरली मी. बापरे म्हणजे पुढं पाच लोक घेऊन जातात हे .
मग त्याला रायरी गड किती लांब विचारलं.
तिकडं सर आज जाऊ नका तुम्ही जर परतायचं असेल लगेच आज तुम्हाला तर. कारण रस्त्याची काम सुरु आहेत म्हणून st कमी आहेत. आमचे गाडीवाले हि तिकडं कमी असतात. तिथं जायला तास दीड तास ,वर जाऊन यायला तीन तास परत उतरायला तासभर . म्हणजे खाली आल्यावर गाडी मिळालं नाय मिळेल . पुढं भोर ला हि गाडी पुण्याची नाही मिळाली तर मुक्काम करावा लागेल . त्या पेक्ष्या परत या जमलं तस. आपल्या कड तस कुणी बाइकवाला जात असलं त्याला म्हणला का मला सोड बाबा तर सोडतात हा लोक पण नाहीच मिळाला कुणी तर तुमची पंचाईत व्हायची.
मग राहूदे, तुमचे किती झाले .
दहा रुपये सर. मी वीस देऊ केले तर निग्रहाने घेतले नाहीत. पण म्हणला राजवाडा बघून जा तो जवळ आहे भोर स्टॅन्ड पासून . मग एक पासिंजर ला म्हणला सरांना वाट दाखवून जा रे . त्या माणसाने दाखवलेल्या वाटेने जाऊन राजवाडा बघितला. आत कन्नड फिल्म च शूटिंग सुरु होत मग परत आलो. मिसळ ला तब्ब्ल पन्नास रुपये मोजावे लागले हाटेलात . पुणा गाडी न पुण्याला उतरलो न बाजूला सोपारा गाडी लागलीच होती ती पकडली नि घरी सडे आठला पोचलो . गड बघून झालाच पण इतकी चांगली माणसे भेटली याचा आनंद जास्त झाला .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा