*आबा*
त्याच नाव अर्जुन जाधव होत.पावणे सहा फूट उंच.भक्कम शरीर.माझी त्याची ओळख त्याच्या म्हातारपणी झाली.75 चा तरी असावा.
आमच्या आजोबांचा तांदळाचा व्यापार होता.शेती ,नाटकाचे थिएटर होत.त्या कारणाने बरीच भ्रमंती वेळी अवेळी होत असे.हा अर्जुन जाधव तेंव्हा तरुण होता.दिवसभर कुठं तरी काम करायचा न संध्याकाळी दारू पिऊन असायचा. मारामाऱ्या ही करायचा कुणी काही वावग म्हणल तर.आजोबांकडे काम मागायला आला.त्यांनी हट्टाकट्टा गडी म त्याला बॉडी गार्ड म्हणून त्यांनी ठेऊन घेतला.तेंव्हा पासून जवळपास तो मरे पर्यंत आमच्याकडे च होता.त्याला का कुणास ठाऊक पण सर्व धोंड्या म्हणून हाक मारत.दारू पिणे सोडलं तर बाकी सज्जन माणूस.कामाला वाघ आणि इमानी.त्याला शरीर रक्षक म्हणून ठेवला पण आमच्याकड आल्या पासून मार खाऊन येऊ लागला.अस का रे ? विचारलं आजोबांनी तर म्हणला,अण्णा तुमच्या कडे आलो न डाळ भात खाऊन न तुमच्या संगती न क काय कळना पण हात उचलत च नाही मारामारी करायला.आजोबांची सावली च होता.ते गेले तेंव्हा घरातल्या माणसाहून अधिक तोच धाय मोकलून रडला अस माझे बाबा म्हणत.मग शेती वग्रे उरली नाही तशी त्याला काम च उरलं नाही.
खूप वर्षांनी आम्ही तिथं रहायला गेलो तेंव्हा हा सत्तरीच्या आसपास असावा.अचानक येऊन ओटीवर बसला.बाबांना म्हणला,बाळ आता तू अलायस बायका पोर घेऊन हिथ तर आता मी तुझ्या कडच रहाणार.
अरे पण आता शेती नाही आपली मग काम काय करशील.
आवडात खपीन. पडेल करीन.बाईंना पोरांना सोबत होईल माझी.बाहेर शेती ची काम असतील तर तिकडं जाईन पण आता आपल्या पायरीवर च राहीन.
मग तो आमच्याकडे राह्यला.माझ्यावर खूप जीव होता.सकाळी आई ऊठ ऊठ म्हणून रागवायची तर तिला हा म्हणत असे,असू दे तुम्ही नका तरास देऊ त्याला.
अरे त्याची अंघोळ व्हायचीय पाणी आटून जातंय न बाहेर चुलीवर.
ते मी बघतो तुम्ही जावा तो उठेल जराश्यान.
मी ही त्याला धोंड्या म्हणून एकदा हाक मारली तर बाबा ओरडले.तू त्याला आबा च म्हणायचं आमची गोष्ट वेगळी आहे.तुझ्या आजोबाच्या वयाचा आहे तो.
मग त्याची माझी गट्टी जमली.थोडी शेती होती तिकडं गाडी जोडून नेत असे.मे महिन्यात आमच्या सागर गडावर न्यायचा.जाळीतली करवंद,जांभळं,अळीव खाऊ घालायचा.आई कडून माझ्या करता गूळ पोहे बांधून घ्यायचा.
बाबांना एकदा म्हणला,बाळ मला देतोस ते पैसे तुझ्या कड जमा करून ठेव.फक्त 2रु तेव्हढे देत जा रात्री ग्लास करता.बाबांनी विचारलं,का साठवतायस पैसे.
तर,सलीन शेट न अण्णांची छकडी बघितली नाय.एकदा तरी त्याला घोड्या च्या छकडी त फ़िरवून आणीन मग हवं तर विकून टाकू.
असा प्रेम करणारा माझ्यावर आणि आमच्या घरावर.
बाबा शनिवारी यायचे.हा रात्री पिऊन मागच्या अंगणात झोपायचा.पण आम्ही tv लावला कि याची बडबड सुरू.
अरे ती काय काचेवर निर्जीव माणसं बघतोस.तुझ्या आज्याच थिएटर होत. खरी खुरी माणस काम करीत.मोठं मोठे लोक इकडं राहून न काम करून गेलेत.थिएटर ला मी तिकीट विक्री केलीय.नाटक झालं कि थेटर झाडताना आमची गडी माणसात भांडण होत कोण झाडणार या वरून.कारण चवली पावली पडलेली मिळायचीच.न तुम्ही हे त्या tv काय बघून राह्यलेत.
मग आई एकदाच दम द्यायची.आबा sss मी जागी आहे अजून.बडबड बंद कर पाहू झोपायचं मला.
मग हो हो बाई तुम्ही झोपा मी गप रहातो.म्हणून हा बकुळी खाली हांतरूण घेऊन जात असे.
शेवटी एकदा शेती च्या सिझन ला एका जवळच्या गावात कामाला गेला तो बरेच दिवस आलाच नाही.मला चैन पडना. चवकशी केली तर आबा आजारी आहे असं कळलं.मग त्या गावात प्रथमच गेलो सायकल घेऊन.आबा कुणाकडे कामाला आहे असं दिसेल त्याला विचारत गेलो.एक दोघे पटकन म्हणले,तू सलीन शेट काय ? सदू भडजींचा नातू! म्हटलं ,हो.
अरे तुझी आठवण काढत असतो म्हातारा सारखी.चल तिकडं त्या घरी आहे.ताप भरलाय त्याला.
त्या घरी गेलो त्यांनी ही कधी मला बघितलं नव्हतं पण आबा च्या बडबडी मूळ ओळखलं.म्हणले तापात पण तुझं नाव घेत असतो. सलीन शेट चला अंगुली धुवा.
हा माग गोठ्यात हांतरुणावर पहुडलेला.
आबा ,कसा आहेस रे ?
आवाज ऐकलन न म्हातारा उठून बसला.
या बया !बघ कस डुकली काढून बसलं ते.अरे बोलतच नव्हता काही.तू हाक दिलीस न बघ उठला.
ते माझं तस नकळत वय असलं तरी डोळ्यात पाणी आलं.
तुझीच वाट बघत होतो रे पोरा.
मला शोधत आलास, तुज्या पायरीवर जन्म काढला त्याच सार्थक झालं.त्याच्या ही डोळ्यात पाणी होत.हात लावून बघितलं तर अंग ऊन ऊन होत पण जास्त ताप वाटला नाही.
तू नको काळजी करू.आता बर वाटतय मला.दोन चार रोजात ठीक झालो कि यिन घरी सांग बाईंना न आत्या बाईला. या लोकांची पण शेतीची काम करायची आहेत.तू निघ अंधारू लागलंय बाई काळजी करतील.
मी माझ्या खिशात दहा रु होते ते त्याच्या भक्कम मुठीत कोंबले न निघालो.मग आणखी काही दिवसांनी बातमी आली ती घरून,तुझा आबा गेला रे.
अजून एक जोडी आमच्याकडे आयुष्यभर होती.गणपत आणि त्याची बायको सरस्वती.
तिला काही वर्ष्या पूर्वी तिकडं गेलो तेंव्हा भेटलो जाऊन.तिची नात घरी होती.डॉक्टरकी शिकतेय म्हणली.आजी आता पटकन कुणाला ओळखत नाही पण तुमच्या घराची आठवण सारखी काढत असते तुम्हाला ओळखेल बघा.आत गेलो तर सरस्वती बसलेली कोचावर.डोळ्यात फक्त पाणी न पांढर फुल.ओळखलं स का गो
म्हणलो न तिच्या पुढ्यात खाली बसलो.चेहेऱ्यावर हात फिरवलन न म्हणली, बाळा तू आलास मला भेटायला .तुझ्या पायरीवर जन्म काढला त्याच सार्थक केलंस रे.तुम्हाला भेटायची इच्छा राह्यली होती.आता दिसत नाही न चालवत नाही.
ही सुद्धा थेट आबा सारखच म्हणली.
तीही आता नसेल.
त्या काळची माणस वेगळी च होती.
न ती आम्हाला विसरली न आम्ही त्यांना.कुटुंबाचे च सदस्य होते.
अश्या लोकांना 🙏🏻🌹

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा