शुक्रवार, १८ जुलै, २०१४

-******- कलंदर कलाकार -*******-

                                                     -******-  कलंदर कलाकार  -*******-
   

              कलाकारांचे किस्से तुम्ही हि ऐकले असाल . काही मी ऐकलेले सांगतो .
           गुरु शिष्य नात किती घट्ट असत . पूर्ण विश्वासाच . एक विद्यार्थी गुरूगृही तबला शिकायला रहात होता . सगळ सुरळीत सुरु असताना गुरु काही कामानिमित्त काही महिने बाहेर गेले . मी शिकवलंय त्याचा रियाज करा अस सांगून . काही दिवसातच या शिष्याला उदास वाटू लागल . गुरूंच्या बायकोने विचारलं , कारे बाळ अस का ? गप्प ,उदास असतोस . हा म्हणाला काही नाही गुरुजी नाही आता शिकू कसा पुढच ? ती माउली  म्हणाली, हात्तीच्या एव्हढंच न मग मी शिकवते . हा चाट पडला . तुम्ही शिकवणार ? हो त्यात काय . माझे वडील तबलजी आहेत . त्यांनी माझ्या लग्नात तीनशे कायदे आणि तेव्हढ्याच गती , रेले अस तुझ्या गुरुजीना हुंडा म्हणून दिलाय . आणि त्या विद्यार्थ्याला गुरु पत्नीने पुढील शिक्षण दिले .
             होय जुन्या काळी कलाकार लोकं हुंडा म्हणून विद्या घेत . आणि जो देणारा माणूस जे हुंडा म्हणून दिलाय ते स्वतः कधीच वाजवत नसे . त्या गोष्टींवर कायम साठी पाणी सोडत असे . म्हणजे त्याच्या कडे किती ज्ञान असेल . आणि ज्या गोष्टी द्यायच्या त्या हमखास रंगणाऱ्या . निवडक अश्या .
             अश्या पाचशे गती लाहोरहून हिंदुस्थानात आल्या होत्या . त्या आजही झाकीर भाई आणि अन्य कलाकार वाजवतात . काही कलाकार अश्या चांगल्या मैफिलीत रंगणाऱ्या गोष्टी अडचणीच्या काळात सावकाराकडे गहाण ठेवत असत . आणि सावकारही ते मानून पैसे देत असत . अश्या गहाण गोष्टी कितीही फर्माईश लोकांनी केली तरी कलाकार गात वा वाजवत नसत . इतकी इमानदारी होती .
           आणि कले  विषयी अभिमान हि तसाच असे . तबल्याचे महान उस्ताद अहमद जान थिरकवा . शिकलेले नव्हते . त्यांचा एकदा रेडिओवर
कार्यक्रम रेकोर्ड झाला आणि चेक आला . त्यांनी अंगठा उमटवला . एक अतिशहाणा अधिकारी त्यांना कुस्कटपणे म्हणाला ,काय उस्तादजी तुम्हाला सही करता येत नाही ? यावर थिरकवा म्हणाले , आपके दुनियामे  लोग पढे लिख्हे है ? बहोत  है तो म्हणाला. मग उस्तादजी हसून म्हणाले , लेकिन थिरकवा कितने है . एक हि है . त्या अधिकार्याची बोलती बंद झाली .
          एकमेकान विषयी प्रेम हि तसेच असे . जात पात धर्म हे काही आड येत नसे . हेच थिरकवा बाल गंधर्व यांचे तबलजी होते . पण फक्त त्यांचीच गाणी वाजवत . पुढे गंधर्व कंपनी फुटली आणि काही लोकांनी तीच नाटक करायची ठरवल . ते थिरकवांकडे वाजवाल का आमच्या कडे अस विचारायला गेले . थिरकवां म्हणाले , बजा तो लूंगा  पर गंधर्व कहांसे लाओगे ? नाहीच वाजवल इतर कुणा बरोबर . मग गंधर्वांच्या उतरत्या काळात गंधर्व एका मंदिरात गात होते . थिरकवां तिथे आले . दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि उठून घट्ट मिठी मारली . दोघांच्या डोळ्यातून अश्रू घळघळा वहात होते . मग अर्थातच साथीला थिरकवा साहेब बसले . अस प्रेम आणि आदर एकमेकांच्या विषयी . याच थिरकवा साहेबांच्या वर  एक फिल्म तू नळीवर पाहिली होती . त्यात त्याचं घर राहणीमान पाहायला मिळत . पण मला विशेष वाटल कि त्याचं वय पंचाहत्तर किंवा जास्त असावं पण एका दृश्यात झोपेत हि टक्कल पडलेल्या डोक्यावर बोट तबलाच वाजवतायत .
           आणि एका गायकाची गोष्ट वाचली होती . या गवय्याच्या प्रेमात एक बाई पडली . लग्न झाल . सुरवातीचे दिवस छान गेले . मुलगीही झाली
पण या बाईला छान छौकीची सवय . त्यामुळे पैसा संपला . मग बाई एका धनिकाचा हात धरून निघून गेली . जाताना मुलीला घेऊन गेली .मुलीला भेटायचा प्रयत्न करू नका अस बजावून .  या गवय्याला खंत काय जास्त होती कि बच्ची को पूरी तालीम नाही दे पाया . काही वर्षांनी रेडीओ वर त्या मुलीच गाण लागल . हे ते गाणं कुणाच्या तरी घरातून ऐकू येणाऱ्या रेडीओ द्वारे ऐकत होते . गाण संपल आणि यांच्या डोळ्यात पाणी वाहू लागल . बरोबरच्या माणसाने विचारल क्या हुआ उस्तादजी बच्ची अच्छा गायी . तर म्हणे नही, वो ऐसा नही है . पर कसूर मेरा है . मै हि उसे पुरा निवाला नही दे सका . मग हे सरळ निघून शहरात आले . तसेच रेडीओ स्टेशन वर गेले . आधी कुणी ओळखलंच नाही साध्या वेषामुळे . बर्याच वेळाने यांचा चाहता असलेला माणूस आला . यांना पाहून धावत आला . पाया पडला . उस्तादजी आप आज आये ? हमने कितने खत लिख्खे  के आपका एक तो प्रोग्राम रेकोर्ड करे . पर आपने जवाब हि नाही दिया . उस्तादजी म्हणाले बेटे आज करले तू रेकोर्ड . जाने फिर मोका मिले न मिले . मग अधिकार्यांना विनंत्या करून रेकोर्डिंग झाल .
           उस्तादजीचं गाण प्रसारित झाल . खूप आवडल रसिकांना . मग काही दिवसांनी बातमी आली कि यांची मुलगी परत गाणारेय रेडीओ वर. त्या दिवशी हे परत त्या घराबाहेर उभे राहून आपल्या मुलीच गाण ऐकू लागले . तीही तेच गात होती जे यांनी गायला होत . बाप आपल्यासाठीच गायला हे तिला कळल होत . बापाच गाण ऐकून तिन आपल्या चुका सुधारून गायली . तिलाही हे माहित होत कि आपला बाप आपल गाण ऐकणार . गाण झाल आणि उस्तादजी म्हणाले अब तालीम पूरी हुवी . मैने पूरा निवाला खिलाया बच्ची को . आणि भिंतीला टेकत बसले ते शेवटच .
             असे किती तरी कलंदर कलाकार . त्या सर्वांच्या साधनेला प्रणाम .

बुधवार, २ जुलै, २०१४

नटवर्य

काही नमुने असे भेटले कि यांची किव करावी कि हसावं हे समजत नाही . एक नटवर्य होते . सौभद्र सारखी संगीत नाटक एकपात्री करत . उंची पेक्ष्या रुंदी जास्त . अर्थात तुंदिल तनू . डोक्याचा आकारही नक्की कसा ते सांगता येत नाहीय . केसही कुरळे विरळे . दात एकमेकात शर्यत लावल्या सारखे ओठाबाहेर पडू पाहतायत असे . एका जुन्या कलावंताची गायकी हुबेहूब आत्मसात केलेली . पण रेकोर्ड ऐकून केल त्यामुळे बरोबर तीन साडे तीन मिनिट रेकोर्ड प्रमाणे छान गात . पण आता अर्जुन करायचा तर व्यक्तिमत्व आकर्षक नको ? पण नाही अंगात अर्जुन गाण्यासहित संचारलेला. यांच्या बरोबर तबल्याची साथ काही कार्यक्रमात केलेली होती . तालाकडे पहातच नसत . बेताल होत असत अस नाही पण गाण्यातून जी तालाची चौकट जाणवते ती मिसिंग .
               एकदा यांच्या ७५व्या प्रयोगाला साथीला गेलो होतो . एका महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांचे मित्र आणि संगीताचे चाहते असल्याने त्यांनी त्यांच्या महाविद्यालयाचा हॉल प्रयोगाला दिला . श्रोते हक्काचे हवेत म्हणून त्यांच्या वसती गृहातल्या मुला  मुलींना आणून बसवलं . हे पाहून मला आधीच हसू आल . ती कार्टी आल्यापासून भंकस करत होती  आपापसात . पूर्ण प्रयोग न करता निवडक गाणी आधीच्या वाक्यान सकट म्हणायची अस होत . ठीक ठाक चालू होत सगळ . आणि स्टेज वर अर्जुन आला …… हुम्म्म्म करत खसखस सुरु झाली . पोर दबक्या आवाजात म्हणत होती बघ  रे अर्जुन असा होता . जाम हसत होती खाली मान करून . कारण सर खुर्ची घेऊन बसले होते बाजूला . मग पद सुरु केल अर्जूनान .'' मी कुमार …''आणि आत्ता पर्यंत दाबून ठेवलेली वाफ फास्स्स्कन उसळली . सगळी तरुण मंडळी या कुमाराला पाहून फुटली होती . मग कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला .
            यांचेच एक मित्र धैर्यधर करीत . एकदा मुंबईतील नामवंत मंडळींचं नाटक होत गावात . यांचा धैर्यधर फ़ेमस .  आता वय पंच्याहत्तर . पण एक प्रवेश तरी मी करतो अस म्हणाले . त्या नाटकवाल्यांनी चालेल म्हटल . पण या पंच्याहत्तरीच्या धैर्यधराला पाहून मुंबईची हिरवीण रंगमंच्यावर जी हसू लागली ती थांबेच ना . शेवट विंगेत जाऊन हसून घेतलन याचं गाण होईस्तोवर आणि पुढचा प्रवेश हि मुश्किलीने हसू दाबत केलान. 
         








घरटयात फ़डफ़डे गडद निळे आभाळ
फ़ांदीवर झुलते हिरवी पाऊल धूळ
कानावर आली अनंतातुनी हाक
विसरूनि पंख पाखरु उडाले एक


पश्चिमेस कलला निळ्या पुलाचा खांब
ओघळले त्यावर नक्षत्रांचे थेंब
त्या पुलाखालुनी गेले उदंड पाणी
अन वाहुनि गेली अज्ञानातील गाणी


माळावर इथेच उजाड विहिरीआड
वार्धक्य पांघरुन बसले वेडे झाड
एकदाच गेली सुगंधी वाट इथून
निष्पर्ण मनाला डोळे फ़ुटले आठ


हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ
या विदूषकाला नाही रडाया वेळ
लावून मुखवटे नवा खेळ चल लावू
ठेवून सावल्या पडद्यामागे जाऊ


भेटणार नाही, शपथ नको तू घालू
डोळ्यांत कोंडला श्वास, नको तू बोलू
जा घरी सांग लाजून जराशी नीट
जाताना चुकली पाणवठ्याची वाट


संपेल कधी ही शोधायची हाव
फ़ोडिले दगड दशलक्ष दिसेना देव
पसरतो शेवटी हात तुझ्या दारात
अश्रूत भिजावी विझताना ही ज्योत


आरशात पाहती कोण कुणाचे रुप
देहात दिसे का तुजला तुझे स्वरुप
बघ गेला पारा फ़ुटला आरसा जाड
दिसले रे दिसले, ’अरुप’ आरशाआड


दाटल्या गोठल्या विस्मरणाच्या नाड्या
धवती रुळावर त्याच त्याच त्या गाडया
ती शिटी, तो दिवा, सिग्नल पडतो तोच
जखम तीच, त्यावर माशा बसल्या त्याच


देणार काय मी सूर्य उद्या जर आला
मागेल मला दे पाणी आंघोळीला
कोरड्या किनारी फ़िरे कल्पना वेडी
मृगजळात रुतली तिची बिचारी होडी


हा ग्रंथ फ़ाटला उरले मधले पान
ते अपूर्ण होते की, उरले विस्मरण
ती दोनच पाने: पहिले अन शेवटचे
राहिले शेवटी तसेच वाचायचे


मी व्यास वाल्मिकी ज्ञानाई मी लिहीली
पाण्यात परंतु ओवी वाहुनि गेली
जरी काच तडकली वात जळे आतील
मी जाईन जेथे चंद्र-सूर्य येतील


मी शब्द परंतू मूर्तिमंत तू मौन
मी पंख परंतू क्षितिजशून्य तू गगन
काजळरेघेवर लिहिले गेले काही
(अन) मौनाची फुटली अधरावरती लाही


वाजली शिटी अन हलली दख्खन राणी
वाजली शिटी अन हलले काजळ पाणी
वाजली कंकणे, पदर जरासा हलला
ओठावर हिरवा तीळ जरा विरघळला


शहाण्या शब्दांनो हात जोडतो आता
कोषात जाउनी झोपा मारीत बाता
रस रुप गंध अन स्पर्श पाहुणे आले
घर माझे नाही, त्यांचे आता झाले



संपली वही मोडले टोक टाकाचे
लिहीशील किती रे स्पंदनक्षण श्वासांचे
घे हात उशाला खुशाल दे ताणून
देईल कोण तुज स्वप्न तुझे आणून


गेलीस समोरुन आडवी वाट करुन
गर्दीतुन बघशी पुन्हा पुन्हा का वळुन
ठेवून उरी पिचलेली हिरवी काच
भिरभिरली स्वप्ने सप्तपदीवर पाच


का सतार तुटता उठतो वाजवणारा
अन ओल खुणाही थेऊनि गेल्या गारा
बघ चाफ़ा सुकला मावळला तो गंध
दे सोडुनि वेड्या शोधायचा छंद


थकलास तुडवुनी निवडुंगाचे रान
का वळून बघशी असे तुझे का कोण
दे दगड उशाला पांघर काळी माती
ह्या जमल्या मुंग्या शोकगीत गाती


जळल्यावर उरते एक शेवटी राख
ती फ़ेक विडी तोंडातील काडी टाक
जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी
दिव्यता अमरता मायावी फ़सवी खोटी


ही जुनीच माती नवी बाहुली व्याली
अन जुनेच कुंपण, नवी मेंढरे आली
या जुन्या नव्यावर कुणी बांधला पूल
या जुन्याच  वाटा नवे उमटले पाऊल


ही भूक शिकविते मागायाला भीक
अन भीती म्हणते गळा काढुनि भुंक
भूक आणि भीती देवाची दैवाची
शिकविते ज्ञातही कोणी अज्ञाताची


या इथेच पडलो होतो काल पिऊन
या इथेच पडले एक विलक्षण स्वप्न
पाहून रिकामे मद्याचे ते पात्र
उतरून पायरया धावत आली रात्र


जे आहे येथे तेच खरे रे एक
जे नाही येथे नसे कुणा ठाऊक
स्मृति म्हणजे जगणे, विस्मृति म्हणजे मरणे
मी प्यालो म्हणुनि सुचले हे बडबडणे


मी कोण? कोठला? कुठे मला जायाचे?
का एकच गाणे हेच तुला गायाचे
ते जुने प्रश्न आणि जुनाच त्यांचा वाण
प्राचीन तिरडीला नव्या सुतळीचा ताण


मी मुक्त म्हणे हा वृक्षावरचा पक्षी
आभाळ एकटे आहे त्याला साक्षी
पण कुणी दिले हे आभाळाला पंख
शाश्वतास बसला अशाश्वताचा डंख


का प्रवास म्हणतो टप्पा हा शेवटचा
वर्तुळात फ़िरतो कोष मध्यबिंदूचा
प्रारंभ नसे ना शेवट या रेषेला
प्रश्नातच असते उत्तर ज्याचे त्याला


एकटा परंतु गर्दीतील मी एक
गर्दीत चिरडले गेले माझे दु:ख
एकटा आज मी निर्जन एकांतात
द्या परत मला हो, हवे मला ते दु:ख


विसरावे ऐसे जवळ असावे काही
मुक्त हस्त द्यावे असे असावे काही
गाळावे अश्रू दु:ख असावे खोल
कुणी देईल का मज त्या दु:खाची भूल


पाहिले परंतु ओळख पटली नाही
ऐकले परंतु अर्थ न कळला काही
चाललो कुठे पायांना माहित नव्हते
झोपलो परंतु स्वप्न न माझे होते


ऋण नक्षत्रांचे असते आकाशाला
ऋण फ़ळाफ़ुलांचे असते या धरतीला
ऋण फ़ेडायचे राहुन माझे गेले
ऋण फ़ेडायाला पुन: पाहिजे मेले


कोरुन शिळेवर जन्ममृत्यूची वार्ता
जा ठेवा पणती त्या जागेवर आता
वाचील कुणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा, कशास त्याचे स्मरण


ही युगायुगांची आहे अक्षर यात्रा
एकदाच भरते स्मशानातली यात्रा
खांद्यावर घेऊनि शव फ़िरतो जन्म
राखेंत अश्रुला फ़ोटला हिरवा कोंब


रॉय किणीकर

सोमवार, ३० जून, २०१४

घर आणि बेघर [[[ भाग २ ]]]

                                                                घर आणि बेघर [[[ भाग २ ]]]

                           घर असणार्यांच ठीक . पण जे अचानक बेघर झालेत त्याचं काय ? कस आणि कुठे राहायचं . गुगुल बाबाला विचारल . त्यान बरेच रिझल्ट दिले . आयला आपल्या डोक्यात जे येत ते आधीही कुणाच्या डोक्यात आलेलं असत. किंवा अस संकट किंवा परिस्थिती आलेले आणखी हि लोक असतात . म्हणून दुनिया गोल आहे म्हणतात कि काय ?
                    तर यावर मिळालेल्या टिप्स अश्या ,
        जर अशी वेळ आली तर गाडीत राहता येईल. कस त्याची माहिती घ्या नेटवर . आपले कपडे आणि आपला अवतार स्वच्छ ठेवा . या करता पाणी सार्वजनिक स्वच्छता गृह वापरा . अशी सोय सरकारी असतेच पण मॉल मध्ये हि असते . स्पंजीग हि परिणामकारक ठरत . म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणसां सारखे दिसाल . तुच्छ कटाक्ष टळतील . एक पाण्याची बाटली जवळ ठेवा . डीहायड्रेशन  होऊ देऊ नका . राहायला ओव्हर ब्रिज खाली सुरक्षित जागा मिळाली तर पहा . पण शक्यतो दिवसा एखाद्या सार्वजनिक बागेत झोप काढा . पोलीसांच सहसा लक्ष जाणार नाही या ठिकाणी . या मुळे रात्री सावध राहून काढता येतील . कारण इतर बेघर किंवा मवाली तुम्हाला लुटायची शक्यता असते . पोलीसही उठवायला येतील ते हि टाळता येईल व पळ काढता येईल . जर काही पैसे असतील तर एखाद्या अश्या हेल्थ क्लब ची मेम्बर्शिप घ्या ज्यांचा शाखा सर्वत्र असतील . म्हणजे तुम्हाला त्यांचे बाथरूम आणि लॉकर वापरता येतील. जिथे तुमच किमती सामान सुरक्षित राहील . खायला अन्न मिळायची सोय काही मॉल मध्ये अन्नाची तारीख बाह्य झालेली पाकीट
दुसर्या दिवशी गरजूंना वाटतात . अश्या ठिकाणी काही किरकोळ काम साफ सफाईची मिळाली तर काही पैसे हि मिळतील . काही वृद्ध लोक आपल्या कुत्रांना फिरायला नेऊ शकत नाही ते शोधा . त्यांना सांगा मी कुत्रे फिरवून आणेन . कदाचित काम मिळेल . अस काय काय होत .
              पण मग लक्ष्यात आल हे आपल्याकडे लागू होणार नाही . मग होमलेस झालात तर कस जगाल या सर्च मध्ये फक्त इन इंडिया टाकल तर फक्त
स्लम्स,धारावी असे रिझल्ट आले . बाकी काय कराल ते काही नाही . आयला कठीण आहे आपल्याकडे होमलेस होण . 

घर आणि बेघर [[[ भाग १ ]]]

                                                           घर आणि बेघर [[[  भाग १ ]]]


               '' अलोन इन विल्डर्नेस '' हि जुनी फिल्म पाहिली होती . एक म्हातारा जंगलात स्वतः घर बांधून राहतो . त्याच कसब बघत रहावस होत . सगळं घर स्वतः उभारतो . आसपास बटाटे वग्रे लागवड करतो . स्वयपाकाला लागणार्या मोठ्या डावा लहान चमचे हे सगळ लाकडापासून तयार करतो . घराच छप्पर करतो तेही पाहण्या सारख . पण हे तो स्वतः कारागीर होता आणि त्या देशात अस घडू शकत . त्याच लगेज विमानाने उतरल होत .
                आपल्याकडे घर घेण अफाट किंमतीं मुळे अवघड किंवा बर्याच लोकांना अशक्य होऊन बसलंय . काहींच अर्ध किंवा जास्त आयुष्य हे घराच कर्ज फेडण्यात जात . ते करताना घरात फक्त डोक टेकायला जायचं . घर रेस्ट रूम झाल्यासारखं . परदेशात फिरती घर असणारे ही लोक आहेत. पण तेही खर्चिक आणि आपल्याकडे निरुपयोगी आहे आज तरी .
                स्वस्त घर कस जमायचं याचा विचार करत होतो . गुगुल बाबा काहीतरी शोधून देतोच . तिथ केरळ का मद्रास लक्ष्यात नाही पण अशी पद्धत शोधलीय कि दोन तीन मजल्यांची वास्तू तीन महिन्यात उभी करता येते . जी भक्कम , भूकंप सहन करेल अशी आहे . अत्यंत उपयुक्त . पण अजून सर्वत्र वापरात नाहीये . मग एक दिवस सुचलं ,बांधकाम चालू असतात त्या साईटवर त्यांच ऑफिस लोखंडी केबिन मध्ये असत . जे इथल काम संपल कि दुसर्या साईट वर नेतात . सुरक्षा रक्षकांची केबिनही अशीच असते बरेचदा . हे मोठ केबिन घर म्हणून वापरायला काय हरकत आहे . एक चौथरा बांधला कि त्यावर आणून ठेवायचं . प्रश्न याच आयुष्य किती ?विज कनेक्शन ओपन झाल तर शॉक लागेल का ? दिवस उन्हात तापेल त्याच काय ? मग परत गुगुल बाबाला त्रास दिला . ह्या केबिन हव्या त्या साईझ मध्ये आणि टोईलेट बाथरूम च्या सोई सहित आहेत . तुमच्या काही कल्पना असतील तर तश्या हि करून मिळतात . आणखी शोधलं तर परदेशात शेतावर राहायला अशी केबिन ट्रक मधून आणून ठेवतात . या केबिनला भिंती इंशुलेट  केलेल्या असतात  . म्हणजे विजेचा करन्ट आणि उष्म्या पासून संरक्षण झाल . आपल्याकडे हि कल्पना माझ्या आधी एकाला सुचली आहे . तो कंटेनर घरात कुटुंबासहित राहतोय . म्हणजे जमिनीचा प्लॉट घेतला कि अस घर आणून बसवायचं .आपल बोरिंग करून घ्यायचं पाण्याकरता . सोलर उर्जा वापरता आली तर आणखी छान .  सीमेंटच घर बांधायचं खर्चिक वेळ खाऊ आहे . पर्याय म्हणून अस घर बांधल तर स्वस्तात होईल . डोक्यात आहे . कधी जमल तर नक्की करून पाहणारेय . साल स्वतः च घर कधी कधी एखाद्याला घर घर लावत पण नाही होत .

शुक्रवार, ३० मे, २०१४

अब्बाजींच्या क्लास मधले दिवस

आज आमच्या स्पावड्या ने झाकीर भाई आणी पंडित जसराज यांच्या कार्यक्रमाची तू नळी वरील लिंक टाकली. अब्बाजींच्या क्लास मधले दिवस आठवले . एके दिवशी झाकीर भाई आले . प्रश्नोत्तरे आणि प्रत्यक्ष वादनातून मार्ग दर्शन असा बेत ठरला होता .झाकीर भाई म्हणाले आज सोलो विषयी बोलू मग कधी तरी साथ संगतीवर . आम्ही सर्व कानात प्राण आणून ऐकायला बसलो . झाकीर भाई म्हणाले ,विचारा काही शंका किंवा प्रश्न असतील ते . कुणीतरी मस्त प्रश्न विचारला ,तुमचा पेशकार कसा वाजवता ?बढत कशी होते ? मग त्यांनी आम्हालाच एक प्रश्न विचारला ,'धा' मे क्या होता है ? आम्ही गप्प . मग आमचा देव सांगू लागला , धा तैय्यार होता है 'ना ' और 'गे' से . तो मेरे पास शुरुवात करने के लीये 'ना' है, 'गे' है और दोनो मिलाऊ तो 'धा' भी है . उसके बाद तबले मै आता है 'ती'.फिर 'तिरकीड ' ऐसे' धा 'से शुरू हुई मेरी फ्यामिली बढती जाती है . और अगर आप लोग पुछोगे के कौनसा ठेका बजाना अच्छा लागता है ? तो मेरा जवाब होगा तीन ताल . क्यूंकी उसमे चार चार मात्रा जाती है और मै लय भी कम रखता हुं . तो ईस वजह से मुझे खेलने के लिये दो मात्रा के बीच बहोत जगह होती है . और अगर इतनी जगह है तो फिर मै सिर्फ तिरकीड भी चला सकता हुं . अब इसमे और कोई बोल नही है . मगर फिर भी इसमे 'तीट' है और 'कीड' है या 'कत' है . मग त्यांनी फक्त तिरकीड पंधरा मिनिट ठाय लयीत चालवून दाखवल .
आणि पुढ म्हणाले, अच्छा इसके बाद आप लोग जो कर ते हो उसपे आते है .
ये चीज कल झाकीर भाई ने बजाई थी वो तो बजाउंगा या फिर अब्बाजी और झाकीर भाई बजाते है वो मै बजाउंगा. आज भले सम पे न आउ पर कोशिश जरूर करुंगा . ठीक है ,पर क्या वो चीज क्या ठीक से समझ मै आई है . याद रख्खो जो गलतिया करनी है रियाज मे . प्रोग्राम मे कोई गलती कभीभी ना होने पाये . और दुसरी बात आप सब लोग तेज बजाने के पीछे लगे रहेते हो . आप लोगोंको बतादू मै हमेशा बहोत तेज नही होता. मै हमेशा क्लियर
बजाता हुं. तो उसकी वजह से तेज लगता हुं . बोलों का निकास हमेशा साफ होना चाहिये . और इतनी जल्दीमे , दो मात्राओं के बीच क्या क्या है तुम देख हि नही पाते . ये तो ऐसे है के हवाई जहाज से निकल गये . जरा जमीन पे चलके देखो रास्तेमे बहोत खुबसुरत झरने ,पेड , पहाड, क्या क्या खूब सुरत चीजे होती है . और तुम लोग कायदे के सारे बल क्युं खोलते हो . कायदे से खेला करो . जैसे अपने कुत्ते के साथ खेळते हो . आप उसके साथ दौडते हो ,चलते हो , रोल करते हो .
मग पुन्हा त्यांनी सांगितल्या प्रमाणे कायदे ते कसे वाजवतात त्याचे प्रात्यक्षिक झाल मग आणखी हि बरच वाजवली आणि म्हणाले, अगली बार साथ संगत पे क्लास लेंगे . पण तो क्लास काही झाला नाही .
तेंव्हा पासून पेशकार काही वाजवावासा वाटत नाही . कारण आता एव्हढ नक्की समजलय कि पाठांतर आणि ते पाठ केलेलं तबल्यावर काढण म्हणजे तबला नाही . पण ज्यांना देव मानतो त्यांच्या कडे शिकायला मिळालं ,ते वाजवतात ते थोड्या प्रमाणात हातात चढवता आलं केव्हढ भाग्य . अब्बाजी आणि झाकीर भाई दोघानाही शिर साष्टांग नमस्कार .

काईट रनर









                                             
                                                                                                                                                         




         काल पाहिला . बरा आहे . पुस्तकावरून बेतलाय . पण भाषा कळत नाही म्हणून गोची झाली . विंग्रजी सब टायटल्स डाऊन लोडवली पण ती हि बेटी चालेनात . पण एक इच्छा पूर्ण झाली . पतंग उडवताना या पतंगाच्या मागून उडवणाऱ्या कडे पाहिलं तर कस दिसेल असा प्रश्न पडायचा. नेमक तसच दृश काय मस्त टिपलाय . त्या मुळे मज्जा आली.



                                          

मतदान २०१४

सकाळी सहा पन्नासला मतदान केंद्रावर हजर झालो . आत सर्व मांडा मांडी सुरु होती . सव्वासात ला त्यांच आटोपलं . आत गेलो . एकानं नाव विचारलं . यादीत नाव मिळाल . पुढे गेलो त्या बाईनी पालिकेनी दिलेली मतदार चिठ्ठी दिली . अंदाजा प्रमाणे बाई बोलल्याच , आय डी प्रुफ ? [ या पालिकेच्या मतदार चिठ्ठीत लिहील आहे . ,या चिठ्ठीचा ओळखीचा पुरावा म्हणून वापर करता येईल . माझ्या मामाला त्या वर विसंबून राहिल्याने परत मतदार ओळख पत्र आणावे लागले . ] हे विचारणार माहित असल्याने मी इतर पुरावे जवळ ठेवले होते ते दाखवले . मग पुढे दुसर्या बाईंकडे गेलो . अजून शाईची बाटली उघडली नव्हती . बाईनी बराच प्रयत्न केला काही जमल नाही . मग कुणी बुवा ती उघडायला घेऊन गेला तो पाच मिनिट आलाच नाही . मग बाईनी नवी बाटली काढली . ती हि उघडता येई ना . मरा म्हटल आता . इतक्यात तो बुवा बाटली उघडून आला . मी डावा हात न सांगता टेबलावर ठेवला . बाई शाईत काडी बुडवून मला म्हणाल्या डावा हात ठेवा . मी तसाच उभा . बाई परत अहो डावा हात ठेवा . मग म्हटल , माझ्याकडे दुसरा डावा हात नाही . मग उजेड पडला बाबा आणि बोटाला शाई लागली . मग मशीनच बटण दाबल . शिट्टी वाजली . मी जाऊ लागलो तर बाईनी परत हाक मारली, अहो बटण दाबल का ? तिथल्या दुसर्या माणसाने त्यांना सांगितल,बाई आवाज झाला कि झालं मतदान . अश्या तर्हेने आज मतदान करणारा पहिला मतदार झालो . अवांतर भाऊ म्हणाला मी बटण दाबल . लाईट लागला पण बीप नाही झाली . म्हटलं देवाला काळजी .

स्वप्न

कसली तरी धुसफूस ऐकू आली . आवाज स्वयपाक घरातून येत होता . आत गेलो तर सर्व पाकसिद्धी चे शिलेदार हमरी तुमरीवर आले होते . काय झाल काही कळत नव्हत . शेवटी आवाज चढवून दम देत म्हटलं , काय झाल ते एकेकानी सांगा . चमचा पटकन म्हणाला काही नाही सगळे जास्त काम कोण करतो या वर वाद घालताहेत . डाव म्हणाली हं फिरला लगेच चहाडी करायला . म्हटल काय चाललाय ? तुम्ही सगळे काम करता म्हणून चालत न सगळ ? काय तक्रार आहे ते एक एक जण सांगा .
चमचा --- मी आपला शांत लटकलेला असतो कुणीही येतो आणि आणि कशात हि बुडवतो . मग न धुता बेसिन मध्ये फेकून जातो . याला काय अर्थ आहे ?
तवा ---- मला तापव तापव तापवतात . काम झाल कि बाजूला ठेवतात . कधी एव्हढा गरम असतो तर लगेच नळाच्या धारे खाली धरून थंड करतात . अरे काही आमच्या तब्येतीची काळजी कराल कि नाही ? बर नीट पोळ्या करता येत नाहीत असे लोक्स करपलेलि कड स्वच्छ करत नाही . मग राब चढतो न अंगाला .
कुकर ---- मी शिट्ट्या मारून अंगातली सगळी गरम वाफ संपवतो पण तंद्रीत असतात सगळे . म टाकतो व्हाल्व उडवून . अरे माझा गळ पट्टा असलेली रिंग बदलत नाही वेळेवर . किती दिवस जुनीच चालवायची ? परत हल्ली नीट काम करत नाही ,बदलायला हवा .
भांडी --- आम्ही तर आदळ आपट करायलाच आहोत . पाणी,ताक ,औषध काहीही पितात आमच्यातून आणि नीट ठेवत नाहीत . आम्ही तोल सांभाळताना पडलो कि आमच्यावरच रागावणार . आम्ही भावंड वेगवेगळ्या उंचीची आणि घाटाची आहो हे लक्ष्यात घेऊन लावा कि आमची रांग ,मग बघा पडतो का?
चमचा समूह --- हो बरोबर . मागे भूकंप आला तेंव्हा आम्हाला फीज वर आमच्या stand ला नीट होतो ठेवलेले म्हणून भूकंप झाल्यावर थरथरून जाणीव करून दिली होती कि नाही . नीट ठेवल नीट वापरल कि असा दुसरा उपयोग होतो आमचा .
कप बशी ची जोडी --- बाकीच्यांचं ठीक आहे . ठराविक वेळेला काम असत . आम्हाला मात्र रात्र नाही दिवस नाही ,पहाट नाही संध्याकाळ नाही कि दुपार नाही . कधीही कामाला लावतात . अरे जीव किती आमचा काम किती वेळेला करून घेता .
ग्यास शेगडी ---- माझ काय वेगळ आहे . मला तर अग्निहोत्रच चालवाव लागत . वर उतू गेलेलं दुध,आमटी कायकाय अंगावर वागवायला लागत .
गाळण --- चैला माझ काम काय ? चहा कॉफी गाळण. पण साय असलेल ताक कधी कधी गाळता . आणि काम झाल कि धुतल्यावर आपटता का?
ताटे ---- आमच्यातल्या मोठ्या लोकांना तर काम देतच नाहीत हल्ली . आम्ही मध्यम आकारची असलो म्हणून जेवायला , मिसळ खायला ,उपमा खायला अस सगळीकडे ओव्हर टाईम का करायचा ? प्रत्येक गोष्टीला योग्य वस्तू वापरा आम्हाला डिश सारख वापरून मिजासच का घालवता .
लायटर --- आता मला तर काही इंधन म्हणून वीज वग्रे लागत नाही न ? म काम झाल कि जागी लटकवा . पाण्यात नाही तर आणि कशात बुडे पर्यंत कट्ट्यावर का ठेवता ?वेळेवर चाललो नाही कि मग आपटण्यात काय हशील ?
वाटी --- आम्हाला विसळल कि नीट पुसून नाही ठेवता येत ? पाण्याचे शिंतोडे वाळले कि डाग दिसतात न अंगावर . [ याला बर्याच मंडळीनी दुजोरा दिला ]
मी --- हुश्श …. झालं तुमच सगळ्याचं . आता माझ ऐका . बाबानो इथ आधी आई होती आता मी आहे . प्रत्येक घरात अस कुणी तरी म्हणजे जास्त करून आई,वाहिनी बायको असा महिला वर्ग .क्वचित एखादा माझ्यासारखा . अरे बाहेरची काम अर्थार्जनाची ,इतर सटर फटर काम ,आणि मुख्य म्हणजे जे भोजन भाऊ आहेत त्यांची आवड निवड ,मर्जी सांभाळत आम्ही तुमच्याच मदतीने त्यांना खुश करायचा प्रयत्न करत असतो . एव्हढी मेहेनत घेऊन तुम्ही आम्ही खपून केलेलं बाहेरच्या खोलीतील लोकांना पसंत पडल कि गंगेत घोड काय हत्ती न्हाला समजा . आता हि तारेवरची कसरत करताना तुमच्या कडे थोडे दुर्लक्ष ,हेळसांड होत असेल त्या बद्दल माफी मागतो . खर सांगू का ? कुकिंग किंवा घर सांभाळणे हा बर्याचदा थ्यांक लेस ज्यॉब असतो बरेचदा . तर सांभाळून घ्या रे भावानो . यावर समस्त किचनकर मंडळी डोळ्यांच्या ओल्याकडा पुसत म्हणली , रडवतो काय आता ? आमच काही म्हणण नाही .तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है . तुझ्यासाठी कायपण भावा . होऊ दे खर्च .
ए … उठ किती वाजले बघ ? रात्री जगायचं पिसी लाऊन आणि सकाळी कुंभकर्ण होऊन पडायचं . पाहतो त बाबा उठवत होते . पण मस्त स्वप्न होत. जर वेगळं

जीवदानीचे रहिवासी


जीवदानीला दर आठवड्याला जातो . हे एकच कुटुंब उरलंय आता . यांचा वावर अगदी खालच्या गणपती मंदिरा पासून ते डोंगर माथ्या पर्यंत असतो . छोटे साहेब लै खोडकर आहेत . वाटेत असणार्या कोंबड्याना घाबरवतो तर कधी त्या मागे लागल्या तर स्वतः घाबरून पळतो . कुठल्या तरी दुकानाजवळ चौथर्या वर गंभीर चेहेरा करून बसलेला असतो . कुणी काही खायला दिल तर स्टाईल मध्ये फक्त बघत राहील . पावसात छपरावरून धावत असतो . आणि हल्ली एक खारुताई ची जोडी दिसते . त्या हि सर्वत्र असतात . कातळावरून तर अश्या धावतात कि नजर ठरत नाही . त्यांचा फोटो काढण कठीण आहे . एक जागी बसतच नाहीत

जाणता राजा

जाणता राजा ------ एका अफाट माणसाची प्रतिक्रिया
या महाशयांना मी प्रयोगाला पहिल्या दिवशी गेलो तेंव्हा माझ्याकडे एक पास आहे अस सुचवून पाहिलं . यांची प्रतिक्रिया , फुकट आहे म्हणजे जमिनीवर बसायला लागणार . लोक कशी असतील काय म्हैत ? तिकीट काढून आलेल पब्लिक चांगल असत . पण तू जा . पाहायला पाहिजे . काल शेवटच्या दिवशी एका स्नेह्यांकडे vip पास आहे अस कळल . या महाशयांना विचारल , जाणार का ? vip त . तर लगेच हो म्हणले . मग यांना बाईकवर बसवून पास घेतला मित्रा कडून आणि प्रयोगाच्या जागी सोडून आलो . वर सांगितल कि येताना बस आहेत इथूनच . बर म्हणले .
आज सकाळी भेट घेतली . म्हटल काही तरी धासू प्रतिक्रिया मिळणार . तसच झाल . मला पाहताच बोलू लागले . अरे तुझ जाणता राजा चांगला आहे बर .प्रेक्षक हि चांगले . होते मी उडालो . काहीच विशेष टिप्पणी नाही ? तर बोललेच , पण…. - म्हटल सांगा कि . तर म्हणे , सगळ छान . काम आणि पाठांतर उत्तम सर्वांच . फक्त आग्र्याहून सुटका फार घाईत झाली . अजून चांगली हवी होती . बाजीप्रभू देश पांडे दाखवलाच नाही . पण एकूण मस्त . तो एक सीन तर काय मस्त झाला . मी विचारल , कुठला ? तर तो नाही का एक मुसलमान महाराजांचं कौतुक करतो . माझा दुश्मन पण कोण तर शिवाजी अस म्हणत राजांचे गुण गातो . कोण तो नाही आठवत आदिलशा कि कोण . मी - औरंगजेब का ? असेल असेल. तर तो सीन फर्मास झाला . पण काय रे संभाजी दिसलाच नाही कुठे ? म्हटल तुमच लक्ष गेल नसेल हो निट . तर ,-असेल तस . पण मग तेही दाखवल नाही . मी - काय ? संभाजीला शिक्षा केली त्यांचे डोळे फोडले हाल हाल केले . मी - अहो ते सगळं खूप नंतर महाराजांच्या पश्चात झाल . आणि ते औरंगजेबान केल . ते नै का फंद फितुरी शिर्के वग्रे ? अरे पण महाराजांनी हि त्यांना शिक्षा केली होती न ? मी - हो पण ते वेगळ . पन्हाळ्यावर नजर कैदेत ठेवल होत . अस का . असो पण छान झाला प्रयोग . काही गोष्टी अजून दाखवल्या असत्या तर अजून चांगल झाल असत . म्हटल काय आहे न राजांच्या आयुष्यातल्या एकेक प्रसंगावर एकेक सिनेमा होऊ शकतो . समग्र शिवाजी कमी वेळात सादर करण अशक्य आहे अस मला वाटत . आता शेवटची गुगली त्यांनी अशी टाकली कि मी मनातून शि . सा , न . केला . म्हणले -
हे तू बरोबर बोललास . आता माझा अभ्यास आहे, लहानपणा पासून शिवाजी पाहतोय म्हणून मला आवडीने पाहता आल . ज्यांनी काही अभ्यास केलाच नाही ते कंटाळणारच . मी - अभ्यास म्हणजे …. अरे अस काय करतोस . तूच म्हणालास तसे महाराजांच्या वर निघालेले सर्व सिनेमे मी पाह्यलेत ना . आणि एक सांगायचं राहिल. तू म्हणालास तशी बस ची सोय होती . पण उतरताना कंडक्टर आला हात पुढे करत . मी पास दाखवला तर म्हणाला बस च तिकीट नाही त्याच्यात एकवीस रुपये द्या . म दिले त्याला . तेंव्हा बसची सोय फुकट नव्हती हो .

M 80







एक धमाल आठवली . माझा मित्र सुनील . त्याचा चुलत भाऊ अनिल . सुन्या म्हणजे हुन्नरी माणूस . गाडी वग्रे चालवायला आमच्या आधी शिकला . अनिल तसा एककल्ली अबोल , थोडा रागीट . सरदारजीच . म्हणजे एखादी गोष्ट फीट बसली डोक्यात कि संपल . या अनिलन m ८० आणली . सुनीलन आणून दारी उभी करून दिली . हार गंध लावून गाडी ऐटीत उभी राहिली . आता सुन्या शिकवणार मग हा चालवणार . चार दिवसांनी सुन्या भेटला . म्हटल कारे ,अन्या गाडी शिकला का ? जो पोट धरून हसायला लागला सुन्या थांबेच ना . चेहेरा लाललाल झाला . म्हटल सांग न बाबा काय ते . जेमतेम हसू आवरत सांगू लागला . अरे अन्या म्हणजे कमाल आहे . त्याला सगळ समजावलं . मी चालवून दाखवली . मग मागे बसलो आणि त्याला शिकवलं .थोड थोड जमू लागल . काल परत एकदा शिकवणी चालू केली . . त्याला सांगितल , आता मी तिथे जाऊन बसतो . तू एक गोल राउंड मार आणि माझ्या जवळ गाडी आणून उभी कर . अन्या व्यवस्थित राउंड मारून आला आणि जवळ येउन थांबला नी पडला . काय झाल काही कळेच ना . तो उठला धडपडत . अरे पडलास कसा ?पाय का नाही टेकलेस ? पटकन रागात बोलला , तू सांगितलास तस करायला ? बाकी सगळ सांगितलस तस केल न बरोबर .
अरे पण तेंव्हा मी पाय टेकत होतो मागे बसून म्हणून गाडी पडली नाही . तुला एव्हढ समजत नाही . दोन चाकी गाडी थांबली कि पडणारच . पाय नको टेकायला ? हे ऐकल नि मी हसू लागलो .


शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

अब्बाजींच्या क्लास मधील आठवण

आज आमच्या स्पावड्या  ने झाकीर भाई आणी पंडित जसराज यांच्या कार्यक्रमाची तू नळी वरील लिंक टाकली. अब्बाजींच्या क्लास मधले दिवस आठवले . एके दिवशी झाकीर भाई आले .  प्रश्नोत्तरे आणि  प्रत्यक्ष वादनातून मार्ग दर्शन असा बेत ठरला होता .झाकीर भाई म्हणाले आज सोलो विषयी बोलू मग कधी तरी साथ संगतीवर . आम्ही सर्व कानात प्राण आणून ऐकायला बसलो . झाकीर भाई म्हणाले ,विचारा काही शंका किंवा प्रश्न असतील ते . कुणीतरी मस्त प्रश्न विचारला ,तुमचा पेशकार कसा वाजवता ?बढत कशी होते ?  मग त्यांनी आम्हालाच एक प्रश्न विचारला ,'धा' मे क्या होता है ? आम्ही गप्प . मग आमचा देव सांगू लागला , धा तैय्यार होता है 'ना ' और 'गे' से . तो मेरे पास शुरुवात करने  के लीये 'ना' है, 'गे' है और दोनो मिलाऊ तो 'धा' भी है . उसके बाद तबले मै आता है 'ती'.फिर 'तिरकीड ' ऐसे' धा 'से शुरू हुई मेरी फ्यामिली बढती जाती है . और अगर आप लोग पुछोगे के कौनसा ठेका बजाना अच्छा लागता है ? तो मेरा जवाब होगा तीन ताल . क्यूंकी उसमे चार चार मात्रा जाती है और मै लय भी कम रखता हुं . तो ईस वजह से मुझे खेलने के लिये दो मात्रा के बीच बहोत जगह होती है . और अगर इतनी जगह है तो फिर मै सिर्फ तिरकीड भी चला सकता  हुं . अब इसमे और कोई बोल नही है . मगर फिर भी इसमे 'तीट' है और 'कीड' है या 'कत' है . मग त्यांनी फक्त तिरकीड पंधरा मिनिट ठाय लयीत चालवून दाखवल .
      आणि पुढ म्हणाले, अच्छा इसके बाद आप लोग जो कर ते हो उसपे  आते है .
 ये चीज कल झाकीर भाई ने बजाई थी वो तो बजाउंगा या फिर अब्बाजी और झाकीर भाई बजाते है वो  मै बजाउंगा. आज भले सम पे न आउ पर कोशिश जरूर करुंगा  . ठीक है ,पर क्या वो चीज क्या ठीक से समझ  मै  आई है .   याद रख्खो जो गलतिया करनी है रियाज मे . प्रोग्राम मे कोई गलती कभीभी  ना होने पाये . और दुसरी बात  आप सब लोग तेज बजाने  के पीछे लगे रहेते हो . आप लोगोंको बतादू मै हमेशा बहोत तेज नही होता.  मै हमेशा क्लियर
बजाता हुं.  तो उसकी वजह से तेज लगता हुं . बोलों का निकास हमेशा साफ होना चाहिये . और इतनी जल्दीमे ,  दो मात्राओं के बीच क्या क्या है तुम देख हि नही पाते . ये तो ऐसे है के हवाई जहाज से निकल गये . जरा जमीन पे चलके देखो रास्तेमे बहोत खुबसुरत झरने ,पेड , पहाड, क्या क्या खूब सुरत चीजे होती है .  और तुम लोग कायदे के सारे बल क्युं खोलते हो . कायदे से खेला करो . जैसे अपने कुत्ते के साथ खेळते हो . आप उसके साथ दौडते हो ,चलते हो , रोल करते हो .
                              मग पुन्हा त्यांनी सांगितल्या प्रमाणे कायदे ते कसे वाजवतात त्याचे प्रात्यक्षिक झाल मग आणखी हि बरच वाजवली आणि म्हणाले, अगली बार साथ संगत पे क्लास लेंगे .  पण तो क्लास काही झाला नाही .
                           तेंव्हा पासून पेशकार काही वाजवावासा वाटत नाही . कारण आता एव्हढ नक्की समजलय कि पाठांतर आणि ते पाठ केलेलं तबल्यावर काढण म्हणजे तबला नाही . पण ज्यांना देव मानतो त्यांच्या कडे शिकायला मिळालं ,ते वाजवतात ते थोड्या प्रमाणात हातात चढवता आलं केव्हढ भाग्य . अब्बाजी आणि झाकीर भाई दोघानाही शिर साष्टांग नमस्कार