काही नमुने असे भेटले कि यांची किव करावी कि हसावं हे समजत नाही . एक नटवर्य होते . सौभद्र सारखी संगीत नाटक एकपात्री करत . उंची पेक्ष्या रुंदी जास्त . अर्थात तुंदिल तनू . डोक्याचा आकारही नक्की कसा ते सांगता येत नाहीय . केसही कुरळे विरळे . दात एकमेकात शर्यत लावल्या सारखे ओठाबाहेर पडू पाहतायत असे . एका जुन्या कलावंताची गायकी हुबेहूब आत्मसात केलेली . पण रेकोर्ड ऐकून केल त्यामुळे बरोबर तीन साडे तीन मिनिट रेकोर्ड प्रमाणे छान गात . पण आता अर्जुन करायचा तर व्यक्तिमत्व आकर्षक नको ? पण नाही अंगात अर्जुन गाण्यासहित संचारलेला. यांच्या बरोबर तबल्याची साथ काही कार्यक्रमात केलेली होती . तालाकडे पहातच नसत . बेताल होत असत अस नाही पण गाण्यातून जी तालाची चौकट जाणवते ती मिसिंग .
एकदा यांच्या ७५व्या प्रयोगाला साथीला गेलो होतो . एका महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांचे मित्र आणि संगीताचे चाहते असल्याने त्यांनी त्यांच्या महाविद्यालयाचा हॉल प्रयोगाला दिला . श्रोते हक्काचे हवेत म्हणून त्यांच्या वसती गृहातल्या मुला मुलींना आणून बसवलं . हे पाहून मला आधीच हसू आल . ती कार्टी आल्यापासून भंकस करत होती आपापसात . पूर्ण प्रयोग न करता निवडक गाणी आधीच्या वाक्यान सकट म्हणायची अस होत . ठीक ठाक चालू होत सगळ . आणि स्टेज वर अर्जुन आला …… हुम्म्म्म करत खसखस सुरु झाली . पोर दबक्या आवाजात म्हणत होती बघ रे अर्जुन असा होता . जाम हसत होती खाली मान करून . कारण सर खुर्ची घेऊन बसले होते बाजूला . मग पद सुरु केल अर्जूनान .'' मी कुमार …''आणि आत्ता पर्यंत दाबून ठेवलेली वाफ फास्स्स्कन उसळली . सगळी तरुण मंडळी या कुमाराला पाहून फुटली होती . मग कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला .
यांचेच एक मित्र धैर्यधर करीत . एकदा मुंबईतील नामवंत मंडळींचं नाटक होत गावात . यांचा धैर्यधर फ़ेमस . आता वय पंच्याहत्तर . पण एक प्रवेश तरी मी करतो अस म्हणाले . त्या नाटकवाल्यांनी चालेल म्हटल . पण या पंच्याहत्तरीच्या धैर्यधराला पाहून मुंबईची हिरवीण रंगमंच्यावर जी हसू लागली ती थांबेच ना . शेवट विंगेत जाऊन हसून घेतलन याचं गाण होईस्तोवर आणि पुढचा प्रवेश हि मुश्किलीने हसू दाबत केलान.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा