सकाळी
सहा पन्नासला मतदान केंद्रावर हजर झालो . आत सर्व मांडा मांडी सुरु होती .
सव्वासात ला त्यांच आटोपलं . आत गेलो . एकानं नाव विचारलं . यादीत नाव
मिळाल . पुढे गेलो त्या बाईनी पालिकेनी दिलेली मतदार चिठ्ठी दिली . अंदाजा
प्रमाणे बाई बोलल्याच , आय डी प्रुफ ? [ या पालिकेच्या मतदार चिठ्ठीत लिहील
आहे . ,या चिठ्ठीचा ओळखीचा पुरावा म्हणून वापर करता येईल . माझ्या मामाला
त्या वर विसंबून राहिल्याने परत मतदार ओळख
पत्र आणावे लागले . ] हे विचारणार माहित असल्याने मी इतर पुरावे जवळ ठेवले
होते ते दाखवले . मग पुढे दुसर्या बाईंकडे गेलो . अजून शाईची बाटली उघडली
नव्हती . बाईनी बराच प्रयत्न केला काही जमल नाही . मग कुणी बुवा ती उघडायला
घेऊन गेला तो पाच मिनिट आलाच नाही . मग बाईनी नवी बाटली काढली . ती हि
उघडता येई ना . मरा म्हटल आता . इतक्यात तो बुवा बाटली उघडून आला . मी डावा
हात न सांगता टेबलावर ठेवला . बाई शाईत काडी बुडवून मला म्हणाल्या डावा
हात ठेवा . मी तसाच उभा . बाई परत अहो डावा हात ठेवा . मग म्हटल ,
माझ्याकडे दुसरा डावा हात नाही . मग उजेड पडला बाबा आणि बोटाला शाई लागली .
मग मशीनच बटण दाबल . शिट्टी वाजली . मी जाऊ लागलो तर बाईनी परत हाक मारली,
अहो बटण दाबल का ? तिथल्या दुसर्या माणसाने त्यांना सांगितल,बाई आवाज झाला
कि झालं मतदान . अश्या तर्हेने आज मतदान करणारा पहिला मतदार झालो . अवांतर
भाऊ म्हणाला मी बटण दाबल . लाईट लागला पण बीप नाही झाली . म्हटलं देवाला
काळजी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा