एक धमाल आठवली . माझा मित्र सुनील . त्याचा चुलत भाऊ अनिल . सुन्या म्हणजे हुन्नरी माणूस . गाडी वग्रे चालवायला आमच्या आधी शिकला . अनिल तसा एककल्ली अबोल , थोडा रागीट . सरदारजीच . म्हणजे एखादी गोष्ट फीट बसली डोक्यात कि संपल . या अनिलन m ८० आणली . सुनीलन आणून दारी उभी करून दिली . हार गंध लावून गाडी ऐटीत उभी राहिली . आता सुन्या शिकवणार मग हा चालवणार . चार दिवसांनी सुन्या भेटला . म्हटल कारे ,अन्या गाडी शिकला का ? जो पोट धरून हसायला लागला सुन्या थांबेच ना . चेहेरा लाललाल झाला . म्हटल सांग न बाबा काय ते . जेमतेम हसू आवरत सांगू लागला . अरे अन्या म्हणजे कमाल आहे . त्याला सगळ समजावलं . मी चालवून दाखवली . मग मागे बसलो आणि त्याला शिकवलं .थोड थोड जमू लागल . काल परत एकदा शिकवणी चालू केली . . त्याला सांगितल , आता मी तिथे जाऊन बसतो . तू एक गोल राउंड मार आणि माझ्या जवळ गाडी आणून उभी कर . अन्या व्यवस्थित राउंड मारून आला आणि जवळ येउन थांबला नी पडला . काय झाल काही कळेच ना . तो उठला धडपडत . अरे पडलास कसा ?पाय का नाही टेकलेस ? पटकन रागात बोलला , तू सांगितलास तस करायला ? बाकी सगळ सांगितलस तस केल न बरोबर .
अरे पण तेंव्हा मी पाय टेकत होतो मागे बसून म्हणून गाडी पडली नाही . तुला एव्हढ समजत नाही . दोन चाकी गाडी थांबली कि पडणारच . पाय नको टेकायला ? हे ऐकल नि मी हसू लागलो .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा