खूप
वर्ष्या पूर्वी रायगडला सायकली घेऊन जायचं ठरलं. माझा रवि म्हणून मित्र
आहे. त्याने माझी सायकल अशी काही तयार केली कि नंतर कुठल्याही
सायकलवाल्याला जमल नाही. मड गार्ड काढली होती. टायर, ट्यूब,आणि डायनामा सगळ
नव खरेदी करून लावल होत. आम्ही दोघ आणि दोन जण तयार झाले. राजा आणि संजय .
पोयनाड ते रायगड. डायनामा माझ्या आणि संजूच्या सायकल ला होता. तो पुढे आणि
मी मागे राहायचं अस ठरल. कारण पहाटे निघून उन चढायच्या आत प्रवास करायचा
बेत होता. महाडला रव्याची मावशी राहत होती तिथे पोचलो दहा वाजता. जेवण करून
जरा आराम केला आणि उन उतरल्यावर मजेत पाचाडला पोचलो. काळोख पडला होता.
कुणी जाणारे येणारे हि नव्हते. सायकली खाली हॉटेल जवळ ठेऊन चढायला सुरुवात
केली. दमल्याने चाल अगदी सावकाश होती . च्यैला असे उजडेल पोचे पर्यंत काही
जवळची वाट असती तर बर झाल असत अस मी म्हणालो. तेव्हड्यात कुणी तरी धोतर
वाला येताना दिसला. त्याला थांबवल आणि वाट
आहे का दुसरी विचारल. तो म्हणाला यामागून मी वरच चाललोय दुध घेऊन. आणि
आम्ही चालू पडलो त्याच्या मागे. अगदि वीस मिनिटात गडावर आलो. चला बर का
तुम्ही मी जातो म्हणून तो गेला. मग रूम घेऊन राहिलो गड पाहिला आणि येताना
पायर्या उतरू लागलो. सहज मी म्हटल ,कुंच्या लक्ष्यात येतंय कारे काल कुठून
चढलो त्या माणसा बरोबर? कुणालाच काही कळेना. म्हटल थकव्या मुळ जाणवल नसेल
काही. संध्याकाळ झाली होती पाचाड हून सायकली घेतल्या आणि रात्री प्रवास
करून सकाळी पोयनाड गाठायचं ठरल होत. सायकली ,डायनाम्या सकट मस्त सुरु
होत्या. महाडला नदी काठाने रस्ता आहे तिथे पोचलो. उतारावरसंजयचा डायनामा
बंद झाला. माझाही बंद. माझा तर नवा मग काय झाल?तरी सायकली दामटत होतो. मग
मस्त धुपाचा वास भरपूर आला. रव्या इथे दर्गा आहे कारे ?मी विचारल. तो म्हणे
काय माहित नाही. मग मोगरा ,पारिजात असे सुवास बदलत राहिले. मग मात्र सगळे
जरा घाबरलो. पण संजा ओरडला कुणी थांबायचं नाही प्याडल मारत राहा. तो हे
बोलतोय तो त्याची चेन पडली. कशीबशी बसवली आणि सुसाट निघालो. पुढे एक टेम्पो
उभा होता तिथे जाऊन थांबलो. सगळे धापा टाकत होते. तो टेम्पो पेपरचा होता.
त्याने विचारल ,कायरे काय झाल ?कुठे निघालात. मग झाला प्रकार सांगितला. तो
म्हणाला जाऊदे आता घाबरू नका. नदीजवळ झाल न? तिथे असे सुवास येतात अलीकडे.
नाटकवाल्यांची बस नदीत पडली तेंव्हापासून. कधी मधी मी हि अनुभव घेतलाय. ते
ऐकून पोटात गार वाटल. मग टपरी उघडली तिथे चहा घेतला आणि निघालो. आता पाहिलं
तर दोघांचे डायनामे व्यवस्थित सुरु होते. घरी पोहोचलो सकाळी दहा साडे
दहाला तो पर्यंत कुणाचीच चीन पडली नाही. आता बाईकवर रात्री जाऊन आलो गडावर
पण तो अनुभव काही परत आला नाही. तो भेटलेला माणूस,त्याने कुठून नेल अनिते
सुवास आणि डायनामा बंद पडण ,चेन पडण हे कधीच विसरणार नाही. वेगळा अनुभव
होता हे नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा