मंगळवार, ९ जून, २०२०

मालक

-----: *घराचा मालक*:-----
माझं निरीक्षण या बाबतीत सांगतो बघा तुम्हाला पटत का.
मालकाच्या नावाची पाटी दारा बाहेर, घरावर आणि सरकारी कागदोपत्री नोंद राखून असते.
पण त्या वास्तू चा खरा मालक तो असतो का?
माझ्या मते बरेचदा नाही.का?तर मी माझं मत सांगतो.
एखाद्या घरी आपण गेलं तर त्या वास्तू च आणि घरात रहाणाऱ्या लोकांचं नीट निरीक्षण करा.
घरात जास्त वस्तू,सामान कुणाच आहे?एक कुणीतरी जे बोलतो ते इतर मुकाट ऐकतात.तो एक कुणी जनरली बोलताना त्याचा अधिकार बोलण्यातून दर्शवत असतो.त्याची हालचाल देखील बेपर्वा असते.तो हजर नसला तरी त्याची दहशत तिथल्या लोकांचं मन व्यापून असते.हे नको उचलू त्याला आवडणार नाही.तो नाहीये तोवर करून घे.त्याच्या येण्याची चाहूल सारखी घेतली जाते.हळू बोल तो/ती झोपलाय न.
आत्ता फोनवर बोलत बसू नको यायची वेळ झालीय.ते उचलून ठेव त्यानं बघितलन तर पंचाईत होईल.
एकूण तो,हजर असला किंवा नसला तरी इतर लोक त्याच्या दहशतीत असतात.जरा नीट बघितलं तर यातली कुठली तरी गोष्ट आपल्याला जाणवते.
मग इथं तो,मालक हा घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री असू शकतेच पण काही घरात बिघडलेली कन्या किंवा पुत्र रत्न असू शकतात.
आणि काही ठिकाणी त्या मालकाच्या स्थानी घरात नवीन जन्माला आलेल मूल असू शकत.म्हणून मग ,तो आताच झोपलाय उठेल हं तो हळू बोल.
त्याची खेळणी जागेवर ठेव नाही मिळालं तर घर डोक्यावर घेईल रडून.नुकतच विसरत जातोय तर त्याच्या हाती परत मोबाईल नको देऊ.
पहिल्या प्रकारात मालकाची दहशत आणि एकाधिकार शाही दिसते.
दुसऱ्या प्रकारात त्याच मालकत्व आनंदाने स्वीकारलेलं असत.
मग असत कि नाही मी म्हणलो तस.दारावर पाटी कुणाची आहे हे बघून मालक तोच असेल अस आपण धरून चालतो.पण ती पाटी इतकंच सांगते सरकार दरबारी या वास्तूची नोंद कुणाच्या नावे आहे.मग पाटी पुरुषाच्या नावे असली तरी आत सत्ता मुलाची किंवा बायकोची च चालते.पाटी बायकोच्या नावाची असली तरी घरात दरारा नवऱ्याचाच असतो.आणि नवा संसार असलेले दोघांच्या नावाने पाटी लावतात अगदी रोमन अँटिक पद्धतीत हिंदी फ्लिम स्टाईल,घर अमर मानसी का,,,,वग्रे.पण नव्याने आगमन झालेलं चिमुकल बाळ त्या दोघांवर हुकूमत गाजवून असत.अर्थात हि हुकमत प्रेमाने स्वीकारलेली असते.पालक म्हणून.
बरेच ठिकाणी खऱ्या मालकांबद्दल आदरयुक्त भीती असते.जी उत्तम.
आणि ते काहीही असलं तरी मालकाने कधीही त्या दारावरील आपल्या नावाच्या पाटीचा अहंकार करूच नये.तो सोडला तर ती वास्तू सर्वांची होते.अन्यथा त्या मालकाचा तो कैद खाना होतो.आणि तिथं रहाणारे वेळ येताच त्या कैदेतून आपली सुटका करून घेण्याचे प्रयत्न करतात.काही त्यात यशस्वी हि होतात.मग उरतात त्या फक्त चार भिंती आणि छप्पर आणि त्यात तो सो कॉलड मालक.
त्यानं हे नक्की मनावर ठसवून घ्यावं कि उगा छाती फुगवण्यात अर्थ नाही. किती मी मी म्हटलं तरी जे काही नावावर आहे अस वाटतं ते हुकूम होता क्षणी जिथं आहे जस आहे तसेच सोडून त्याच बोट धरून निघून जायचय.
मग तोवर त्या वास्तूत मालक होऊन तिचा कैद खाना करण्या पेक्ष्या घर का करू नये???
आणि अशी खऱ्या अर्थाने घराला घरपण देणारी मालक आणि इतर सदस्य मंडळी मी खूप बघितली आहेत.त्या करता dsk लागत नाहीत.
पण काही घर ती सुद्धा बऱ्याच प्रमाणात मी वर म्हटल्या प्रमाणे जो कुणी असेल मालक त्याचा कैद खाना असलेली हि बघितलीयत.
आता कुठं गेलात तर किंवा आत्ता वाचलीत पोस्ट कि नेहमी बघण्यात असलेली घर आठवा आणि ठरवा किती घर घरपण राखून आहेत.
काही घरात दहशत इतकी असते कि तो मालक आणि त्याचे कैदी वास्तू ची वस्तुस्थिती बेमालूम लपवून मालक गिरी आणि गुलाम गिरी बाळगून असतात.अशी घर पूर्णपणे काल बाह्य होवोत अशीच शुभेच्छा.
एक वेगळा विचार मनात आला तो मांडला.🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा