आमचे कृष्णाप्पा आठवले.70च वय.वरच्या बांधण वरून येत .म्हणजे चांगलं चार पाच किमी चालून.जुन्या फॅशन चा सदरा. धोतर.हातात काठी.डोईवर गांधी टोपी.तांबूस होत पोहोचे पर्यंत.गोरे होते न.काठी शिवाय हाती दोन शिसे भरलेले असत.आणि त्यांना सुतळीने गाठ मारून हातात धरायची सोय केलेली असे.शिसे बुचाने बंद केलेले असत.खनन आवाज करत ते दोन्ही शिसे झोपाळ्यावर बसताना जमिनीवर ठेवत.हुश्श असा आवाज करून टोपी काढून मांडीवर ठेवत.
एकदा मी त्यांना येताना बघून आधीच आत जाऊन पाणी आणून दिलं. अप्पा फुलपात्रात पाणी ओतून ते परत झोपाळ्यावर ठेवत मला म्हणले,हं.काय तुझं नाव ते,पाणी न मागता आणलंस ते चांगलय. पण सोबत गुळाची वाटी द्यायची शिकवलन नाही का तुझ्या आयशीन.
मी पळत स्वयंपाक घरात गेलो.आजीने गूळ वाटीत टाकून तयार ठेवला होता.गधड्या मला म्हणायच होतंस अप्पा आलेत म्हणून.ते जुन्या वळणाचे आहेत.गूळ पाणी देतात पाहुण्याला आधी.जा नेऊन दे वाटी.मग त्यांना वाटी नेऊन दिली.
हं,आता कसं. अरे मुंबईकरा हि रीत आहे आपली.लक्ष्यात ठेव.अस बाहेरून आलं कि पाणी उभ्या उभ्या प्यायचं नाही.आधी नीट बसावं.मग गुळाचा खडा तोंडात धरावा.मग पाणी घोट घोट प्यावं. आता हे शिसे आत नेऊन दे.आणि जपून ठेवायला सांग.मला परत लागतील ते.मागील खेपी तुझ्या आत्या बाईन एक फोडलन होतन.
ते ज्याला शिसा म्हणत ती काचेची बाटली मी नीट बघितली.हिरव्या रंगांची वर बूच बसवलेली आणि आत ओवा अर्क.
असे आमचे कृष्णाप्पा. दरवर्षी न चुकता तो ओवा अर्क घेऊन येत.तात्या पैसे देत.मग जरा गप्पा मारून परत जात.मितभाषी माणूस.ते रहात ते ठिकाण न घर खूप लांब होत गावापासून वेगळं अस.
मग त्यांच्या घरी आईला हळद कुंकूवास बोलवण आलं म्हणून सोबत गेलो होतो.मोठं आवारात घर होत.प्रशस्त अंगणी. गोठा. चाऱ्याचा साठा ठेवायला जागा बघून मस्त वाटलं.घरा मागे ओढा होता तो मे पर्यंत वहात असे.पण आजूबाजूला वस्ती नव्हती.दोन नोकर वस्तीस असत.झक्क बाजणारी आंब्याची झाड होती.आधी कातकरी आधी आंबे,फणस आणि बांबू चोरायला येत.पण कृष्णाप्पा खमके होते.हाती काठी न विजेरी घेऊन रात्री त्यांचा पाठलाग दूरवर करीत.सोबत त्यांचा गावठी कुत्रा हि असे.मग कातोडी समजले. बामण ऐकत नाय.मग चोऱ्या थांबल्या.कृष्णाप्पा चा मुलगा त्यांच्या सारखाच धीट.नोकरीत देखील होता कुठंतरी.एक दिवस सुट्टीत आलेला असता जनावर निघालं म्हटल्यावर खोचेरा घेऊन निघाला.जनावर चपळ निघालं.त्याला डसून पळू लागलं. मला डसून जाशील तसाच?म्हणत तो त्याही अवस्थेत त्याच्या मागे गवतात घुसला.जनावर मारलन न परत घरी आला.पण तोवर विष भिनल आणि गेला.
मग अप्पा आणि सुनबाई ,नातवंड राहिली फक्त.आधीच अबोल असलेला म्हातारा आणखी अबोल झाला.
एकदा मी असताना ते आले. मागची आठवण ठेऊन त्यांना गूळ पाणी नेऊन दिलं.तेंव्हा मात्र,आयुष्यमान भव. बाळ चा थोरला न रे तू?
हो.
रित बरी लावलीन आहे आईन .घे ते शिसे नेऊन दे घरात न सांडता.आणि म्हणावं पुढील वर्षी काही अर्क मिळणार नाही.अजून हवे असतील तर उदईक घरी येऊन घेऊन जा.
न राहवून मी म्हणलो,
अस का म्हणता अप्पा. तुमचा ओवा अर्क आम्ही पण नेतो मुंबईला.मला आवडतो.तिथं मिळतो पण तुमच्या सारखा नसतो.
थोडं हसून म्हणले,अरे तो अर्क आवडतो काय म्हणतायस.ते औषध आहे.आणि मी काही धंदा म्हणून करत नाही.तुमचे आमचे जुने समंध आहेत म्हणून मी घराकर्ता करतो तेंव्हा तुमच्या सारख्या आणखी एक दोन घरी द्यायला करतो.आता मात्र थकलोय.तो उपद्व्याप आता जमेलस वाटत नाही.आणि इथवर येताना अलीकडं धाप हि लागू लागलेय म्हणून म्हटलं हा बहुतेक माझ्या कडून शेवटचा अर्क.
आणि ते खरं हि झालं.अप्पा गेले काही दिवसात.पण त्यांचा ओवा अर्क त्याच्या ठसक्या सह आणि उग्र पण खमंग वासा सह अजून तसाच्या तस्सा आठवणीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा