मंगळवार, ३० एप्रिल, २०१९

सर तुम्ही इतके शांत कसे?

नुकताच एक स्टुडंन्ट भेटून गेला.

सर,तुम्हि आहात तसेच आहात अजूनही.
तस नसत रे.काळ आपलं काम करतच असतो.
अजून तरी मी शिकायला सुरुवात केली तेंव्हा होतात तसेच आहात.
म देवाची कृपा रे,मी खास काही केलं नाही त्या करता.
आणखी हि एक गोष्ट आहे सर.
कोणती?
आजही तुम्ही कुणी काही म्हटलं तुम्हाला तर फक्त हसून उत्तर देता.कधी रागवत नाही समोरच्यावर.
कश्या बाबतीत रागावायच?
आम्ही नाही का तुम्हाला सारख म्हणत,सर हे का तुम्ही करत नाही सुरू!किंवा आणखीही सल्ले देताना बघितलंय लोकांना तुम्हाला.पण आज जाणवलं तुम्ही रागावून रिऍक्ट होत नाही कधी कि,तो माणूस गेल्यावर त्या बद्दल खन्त,चीड व्यक्त होत नाही तुमच्या कडून त्याच्या बद्दल.त्याच कारण काय?आणि मला ते जमलं तर बरच बर होईल अस वाटत आता म्हणून विचारतोय.
काय सांगू रे तुला?
जे तुम्हाला वाटत ते.कारण मला ते उपयोगी पडेल.मी फार चिडतो अस घरचे म्हणतात.पण मी काय उगाच चिडतो का?पण चिडतो हे खरय.कलीग रोजच काम बिघडवू लागला तर काय करायच?बॉस उगाच बोलतो.माझं फिल्ड मला नक्की माहितीय. शेवट माझंच म्हणणं करेक्ट निघत ,मग आधीच का ऐकल जात नाही.अस अनेक गोष्टीत होत असत.तुम्ही थंड कसे राहता?
अरे,
आज तुझ्या दृष्टीनं मी शिक्षक म्हणून बरा असेल.
नाही चांगलेच आहात.
तस म्हण.पण व्यावहारिक दृष्ट्या मी अपयशीच आहे न?
ते कसं?
बँक बॅलन्स नाही,म्हणून मग लग्न नाही वग्रे वग्रे.
पण सर तेच सर्व काही नसतं.
हे तू मला जुनी ओळख आहे म्हणून म्हणतोयस.तू सुद्धा म्हणत असायचास न,सर क्लास काढा.गुरू पौर्णिमा सुरू करा.जाहिरात करा इत्यादी इत्यादी.
हा सर पण,,
पण मी गप्प असायचो.
मला माझ्या क्षेत्रात बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे?
हो.
मग त्यातल्या खाचा खोचा मला माहित आहेत.बऱ्याच गोष्टी मी ही करून बघितल्या आहेत.मला आर्थिक स्थैर्य नकोय का?पण,
माझ्या वाट्याला काय आयुष्य आलंय!मी काय काय न कसं कसं भोगतोय हे बाहेर माहीत नसतं.हे भोगून माझी मानसिकता कशी आहे हे माहीत नसतं.अंतिम सुख हे नाव होण्यात नसत अस माझं मत लोकांना पटत नसलं तरी मला पूर्ण पटलं आहे.संगीत हे निखळ आनंद देण्याकरता आहे.ते करताना गरजे पुरत मिळतंय.आणखी हवंय पण ते उगा जीवघेण्या स्पर्धेत उतरून नकोय.नशिबाचे दोन टक्के यश 100 टक्के फिरवून आणू शकतात हे सत्य आहे.तिथं मी मार खाल्ला तर ते आपल्या हातात नसत.मी पूर्णपण उलट्या प्रवाहातून प्रवास करत आलोय.आता स्वसुखाय जगायच.कुणाला इम्प्रेस करायला नाही.
सर्वात शेवटी इतकंच सांगीन.तुला यश मिळेल तेंव्हा ते यश च तुझ्या करता बोलू लागेल.तू अयशस्वी ठरल्यास लोक बोलू लागतात.अश्या वेळी न चिडता ते ऐकायचं.कारण त्यातील काही लोक आपल्या काळजी पोटी बोलत असतात.फक्त आपली आतली परिस्थिती आणि त्या परिस्थितीनं केलेलं आघात त्यांनाही दिसत नसतात.ज्या दिवशी यश मिळेल तेंव्हा हि तू गप्प रहायचस.तेच लोक भरभरून बोलतील त्या विषयीही.
मग अपयशात आणि यशात दुनियाच बोलत असते आपण काही बोलायच कामच नसत.आपण आपलं चालत रहायच.आलेत तर तुमच्या सोबत.न आलेत ,तर तुमच्या शिवाय.कळलं😊
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.आणि केल्या कर्माचं फळ मागू नको हे श्री कृष्ण बजावून गेलाय न?मग?
समजलं सर.ग्रेट च.
ग्रेट मी नाही,तो👆🏻

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

बोलो जिंदाबाद पावधर शिखरो कि उंचाईपर
हिम्मत करके कब्जा करलो सागर कि गेहराई पर
अपनी आखोमे झाको तुम
नमी नही चिंगारी है
चिंगारी पर राख नही
लपटो कि तैय्यारी है
चलो हवा दो इस चिंगारी को 
शोलो मे ढाल दो
जहा चुनोती का बादल है
 शोला एक उछाल दो
देख रही है दुनिया तुममे
उजियाले विश्वास को
एक एक दिन दिव्य बनाकर
तोफा दो इतिहास को
नई रोशनी कि तेहरीरे
लिख डालो आकाश मे
उठो बांधलो सारा सूरज
अपने बाहु पाश मे
जोशीला अंदाज तुम्हारा
रग रग मे तुफान है
थाम तिरंगा करो घोषणा
हिंदुस्थान गतिमान है
जन गण मन सन्मान हमारा
वंदे मातरम जान है
थाम तिरंगा करो घोषणा
हिंदुस्थान गतिमान है
👍🏻🙏🏻
आज देशाची मनःस्थिती आंदोलीत असताना देशाच्या प्रगतीच द्योतक ठरणारी वंदे भारत ट्रेन सुरू झाली.माननीय पंतप्रधानानी तिला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं.
एकीकडे कालचा दुःखद प्रसंग ज्याने दुःख,चीड,आक्रोश अशी संमिश्र भावना असताना या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानानी अतिशय समयोचित भाषण केलंच,पण ट्रेन सुरू होऊन निघाली तेंव्हा ज्या कुणी सुसंवादक बाई अत्यंत सुंदर, स्पष्ट आवाज आणि शब्दोच्चार करत माहिती देत होत्या त्यांनी हि अत्यंत समर्पक अशी कविता हि वाचली.ती ऐकताना इतकी आवडली कि शेअर करावीशी वाटली.जे शाहिद झाले त्या जवानांना श्रद्धांजली म्हणून आणि दुसरीकडे देशाच्या प्रगतीच एक आणि पाऊल पुढं पडलं त्याचा अभिमान म्हणून.
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

सांजवात

हं,भुत्या आठवला.कंदील आठवले. त्या वेळी सांजवात हा शब्द खरोखर जगावा लागे.
कंदील,भुत्ये आणि कुणी मुंबईकराने आणलेला लाफ हि असे.तो जरा ऐटीत उभा असायचा.मग ओगले चीच काच उत्तम असा सूर असे.कंदील प्रभात चा. कंदिलाची ती आडवी वात आमचे तात्या नेमकी सुबक कापून घेत.कारण ती नीट कापली गेली नाही तर काजळी धरे काचेवर. परसात जाताना पावसाळी किंवा हिवाळी गवतावर काच लागली तर पाण्याने कच्च कन फुटे.भुत्या बिचारा साधा माणूस.कुठल्या तरी 100ml च्या बाटली च्या बुचाला भोक पाहून मिळाली तर नाडी नाहीतर कपड्याची चिंधी वळून वात केली जायची.मात्र तो राकेल जास्त पिणारा गडी.कंदीला ची वात हवी तशी सरती करून उजेड कमी जास्त करता येई.
काही बॉक्स मधले दिवे ही रुबाबात असत.नाजूक पितळी सांगाडा आणि मेणबत्ती लावायला जागा असे.
या सर्व दिपकांची संध्याकाळी सेवा नीट करावी लागे म्हणजे ते काळोख पडल्यावर नीट काम देत.ते हाताळणारा माणूसही अनुभवी लागे. नाहीतर स्वतः भोवती काजळी करून रुसून बसत.
काही लोकांकडे मग ऍडव्हान्स गॅजेट म्हणून पेट्रोमॅक्स असत.ती विदेशी ललना.तिची और च तर्हा. वात नसे तिला. मेंटल यायच.ते नवं बसवण्यात वाकबगार व्हावं लागे नाहीतर इतकं नाजूक कि लागलीच तुटायच.थंडीत तिचा हिटर म्हणून फायदा होई.पण मे महिन्यात ती नको वाटे.आणि रुपगर्विता असल्याने तिचा आवाज ही सुरू असे सारखा.
आमच्या नाटकाच्या थेटरात तब्बल पाच सहा पेट्रोमॅक्स वर नाटक होई.तिला हवा भरायला नाटक सुरू असताना माणूस स्टेज वर जाऊन पंप करीत असे. बाबांनी जर्मनीच्या पेट्रोमॅक्स आणल्या होत्या.त्यांची टाकी वर होती.ते बघायला लोक।मुद्दाम येत.
मात्र तरीही माजघरातल्या देव्हाऱ्यात जी समयी मंद प्रकाशीत असे तिला तोड नाही आजही.त्या तिच्या शुभ्र कळ्या अंधारात धीर देत.आणि देव्हाऱ्यातले देव त्या प्रकाशात सौम्यपणे उजळलेले दिसत.
चैला सुरेश भट ही मस्त रोमँटिक लिहून गेलेत न!
सहज कधी तू घरात
लावशील सांजवात
माझे ही मन तिथेच
ज्योती सह थरथरेल,,,,,
आता चकपक जमाना.led कि रोशनी.
ती सांजवात ज्यांनी अनुभवलीय ते भाग्यवान च🙏🏻सांजवात