सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

अलीकड गाण्याच सादरीकरण

वा👌🏻जुन रेकॉर्डिंग, रंजना पेठे यानी गायलेलं मी मज हरपून बसले ग,व्हाट्सप वर आलं ते बघितलं.
मस्त वाटलं.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.किती सुंदर कार्यक्रम कृष्ण धवल दूरचित्रवाणी वर सादर होत.
मग ती रंगीत झाली.मग zee वग्रे आलं आणि ते शो झाले.
हे सादरीकरण कसं आहे नीट बघा.त्या गाण्यापेक्षा, संगीत कार, कवी,वादक याहून मी किती हुच्च गाते याचा तोरा नाही.हावभाव गाण्यातील शब्दाचे भाव आकलन होऊन होत असत.त्यात कृत्रिम रित्या घातलेला उथळ भडकपणा नसे.आजही दिदी गायला उभ्या राहिल्या तर मनोभावे आरतीला च उभ्या आहेत अस वाटत.आशा ताई अवखळपणा करतील पण तो हि सुसंस्कृतपणा न सोडता.साडी कॅरी करणं या लोकांकडून शिकाव हल्ली च्या गायिकांनी.गाणं सर्वार्थाने नीट समजलं तर ती गान पूजा असते.ती सादर करताना सारख नाचाव लागत नाही.मूळ गायक गायिके पेक्षा अलीकडं नवे गायक
ते गाणं कित्ती अवघड आहे न मी कसं ते पेलतोय बघा,असलं प्रदर्शन करतायत अस वाटत.त्याही पुढं जाऊन काही जण किंवा जणी असे अविर्भाव करत असतात कि म्हणायला लाज वाटते पण ते विचित्र म्हणजे कसं सांगू?इतकंच म्हणीन कि,सेक्सी वाटतात.
एव्हढं होऊन वर वेगवेगळ्या अँगल मध्ये शूट,भडक कपडे,मागे सेट तसाच झगमगीत. बाकी सर्व तांत्रिक गोष्टी तर अति आधुनिक असतात.तरीही ते समाधान मिळत नाही.मग परत दिदी च किंवा किशोर दा च मूळ गाणं ऐकावं लागत तेंव्हा बरं वाटत.दिदीच्या साड्या भारी असतील.कानात घातलेली हिऱ्याची कुडी स्वतः तिचं गाणं ऐकून चमकत असतात अस वाटत.आणि डोक्यावरून घेतलेला पदर अशी ती उभी असते.पण ए मेरे वतन के लोगो ते गझल,प्रेमगीत त्यातील भावनेसह मनात उतरवते. रंजना पेठे नी गायलेलं हे गाणं हि तसच सादर केलंय.
अलीकडं खूप स्वकेंद्रित असत.
आता अकारण दिदीला ट्रोल केलं जातंय त्या कुणा नवीन गायिके वरून.दीदी म्हणली ते खरं नाही का?
आवाज सुंदर असला तरी कुणाची नक्कल करू नका.ती जास्त टिकत नाही हे सत्य आहे.यात त्या गैर काय म्हणाल्या?त्यांनी सर्वांनी जे करून ठेवलंय त्याला आजही तोड नाही.शंकर महादेवन, हरिहरन,कविता कृष्ण मूर्ती,अलका ते श्रेया घोषाल आपला ठसा जसा उमटवून आहेत तस काम करा कि. आम्ही कवतुक नक्कीच करू.
पण या मोठ्या लोकांना वादात ओढून स्वतः ची सवंग प्रसिद्धी करून उखळ पांढरे करणारे जास्त झालेत.बाय हुक ऑर क्रूक मी हिट होणारच.
व्हा बापडे.आमच आम्ही ठरवूच कुणाला ऐकायचं ते.
संगीत आपल्याला शिकावे लागत ते आपल्याला शिकत नाही.ते पर्वत शिखर मान खाली घालूनच चढाव लागत अन्यथा कोसळून पडायची शक्यता जास्त.
त्या पोस्ट मूळ इतकं मनात आलं.
सर्व गुणी कलाकारांस 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

शेतातल भूत

*एक मजेशीर आठवण*
हेच गणपतीचे दिवस होते. बाबा पोयनाडला आले होते.घरचा उत्सव होताच.पण आज त्यांच्या शाळेच्या एका गुरुजींकडे गणपती निमित्त भजन होत.बाळ तू तबला वाजवायला हवासच हो,असा आग्रही निरोप भगवान मास्तरांचा आला होता.जेवण लवकर उरकून बाबांनी आमच्या धोंडू ला हाक मारली.
धोंड्या छकडी जोड.निघायचाय.खाऊन घेतलंस न?
हा जी .पन कूट निघताय बाळ भाऊ रातीच?
अरे भगवान मास्तर नी बोलावलंय.भजन आहे त्यांच्याकडे.आणि त्यांचा हुकूम मी टाळू शकेन का?
ते हायच. म अस करू,भजन सपल का जरा गप्पा टाकत बसा किंवा निवांत डुलकी काढा म तांबडं फुटल कि निगु.
ते आणि का?उद्या अण्णा शेतावर काही जायचे नाहीत अन तुलाही धाडायचे नाहीत.गणपती नाहीये का घरात.
पन तरी लगोलग निघायचं नाही.यिऊ कि 8वाजेपर्यंत आरतीला घरी.
तुला झालंय काय धोंड्या?का हुज्जत घालतोय?अस कधी वागत नाहीस तू.तब्येत नाही का बरी?तस असेल तर फक्त छकडी जोडून ठेव मी नेईन स्वतः.तू कर आराम.
ह्या,अस कुठं झालं का कदी?
आवरा तुमी मी जोडतो गाडी.तुमचा गालिचा द्या जरा. खाली अजून पेंढा टाकून त्या वर घालतो.
अरे बाबा बैलगाडी नाही न नेत आपण,छकडीत कशाला हवा गालिचा न पेंढा.आताच तर सजवून घेतलीत न?
हा पन,,, बरं चला म.
अस करत दोघे निघाले.
बाळ तू ती मुमै हून आणलेली बॅटरी घेतलीस न.कंदील हाय पण तिचा उजेड लख्ख पडतोय.कूट किडुक मिडुक असलं त दिसत.
हा पाणीही घेतलंय सूट तू आता.घोड्याला वैरण घेऊ नको मास्तरांकडे असेलच.
हा ते ठाव हाय.
शेवट छकडा मार्गी लागला.तिनविरा धरण आलं.लख्ख चांदण्यात त्यातलं पाणी मस्त चमकत होत. गार वारा हि सुटला होता.पावसाची अजिबात चिन्ह नव्हती.तरी धोंड्या अस्वस्थ असल्याचं जाणवत होतं.न राहवून बाबांनी त्याला विचारलंच,
धोंड्या,गप्प का रे?
भक्कन विडीचा धूर सोडतच तो म्हणला,तस काई नाही.
अरे मला सांगतोस का हे?आज ओळखतो का तुला?
बाळ भाऊ मंग सांगतो तुमाला.
नको आत्ताच बोल.का हुक्की आलीय घसा ओला करायची.धोंड्या शपथ आहे तुला हं,उत्सव सुरुय अजून तो वर घ्यायची नाही म्हणला होतास लक्ष्यात आहे न?
त.अस पाप हुईल का हातन.
अरे म बोल कि?
आता काय सांगू?हल्ली हिकडं पोर बी यायला घाबरतात.अचानक कुठल्या शेतात म्हण मोठी आकृती हुबी रहाते.ह्ये धा फूट हाय म्हण.म्हून म्हणत हुतो तांबडं फुटल का निगु.
धोंड्या तू घाबरावस या भाकड कथेला?
मी नाय ओ पण आज तुमी हायत संगती म्हून काळजी वाटते.
काही खरं नसत ते.रहा बिनघोर.त्यात गणपती आहेत म्हटल्यावर काय भितो तू.
हं ss म्हणत धोंड्याने एक मोठा झुरका घेऊन विडीचा धूर छाताडभर भरून घेतला.
बघता बघता मास्तरांचं घर आलं.गर्दी दिसत होती आणि वाद्य जुळवा जुळवी चे परिचित आवाज कानी पडले.छकडी चा आवाज ऐकून मास्तर धोतराचा सोगा हाती घेऊन वेस्कटित उभे राह्यले.
वा बाळ आलास का?ओळख ठेऊन आहेस बरं वाटत हो.म्हटलं मुंबईकर येतायत का नाही?
मास्तर तुम्ही हाक द्यावी न मी येऊ नये अस होईल का कधी.
बाबा मास्तरांच्या तिथंच अंगणात पाया पडले.पाठीवर प्रेमान हात मारत मास्तर पुटपुटले,शतायुषी भव.
ये हात पाय धुवून घे.तिथं खुंटीवत पंचा ठेवलाय तो घे हात पुसायला.झोपाळ्यावर पानाचे तबक हि आहे.तिथं विसाव जरा .मी आत जाऊन चहा सांगतो.कि आधी फराळाच काही आणू?
नको मास्तर फक्त चहा.
बार बार,आणि ए, ह्या आपल्या धोंड्या न तू?गाडी तिकडं आंब्या खाली सोड.चाकाला च घोड बांध.माग बेड्यात वैरण वग्रे लागली तर आहे.आड बाजूस घोड नको बांधू जनजनावर निघत.
जी म्हणून धोंड्या गेला.
बाबांनी हातपाय धुवून झोपाळ्यावर बैठक जमविली. चहा घेऊन विडा हि झाला जमवून मनासारखा.आत मंडळी वाट बघतच होती.
या या बाळ भाऊ.आता झक्क गवळण तर हुन द्याच पण चार नाट्य संगीत देखील ऐकवा बा. मग तबला हि बघा कसा पुडा झालाय.जमलाय का नाही सांगा.खास तुमच्याकर्ता सजवून घेतलीय जोडी.पेण हून आजच आणलीय.पेटी सुद्धा ट्यूनिंग करून आणून ठेवलीय लालबाग वरून.
झालं मग आधी बाबांनी पेटी हाती घेतली.मग तबला.शेवट बाळ भाऊ गवळण न नाट्यगीत हवंच तुमच्याकडून अशी फर्माईश आली. मग जवळची हत्यार सोडून बाबा गायला बसले.
आतून आवाज आला बाईंचा,
अरे त्याला किती दमवाल ,आधी चहा घे रे बाळ तू मग बसा गायला.सर्वांनी मध्यंतर घ्या हो जरा.
असा तो कार्यक्रम रंगत गेला.उत्तर रात्री सगळे निघाले.मास्तर म्हणू लागले,बाळ आज राहिनास हितच.दुपारी जेव न मग जरा आराम ,चहा घेऊन निघ.
थांबलो असतो मास्तर पण घरी गणपती आहे न.जाऊन जरा झोप काढीन. उद्या आमच्याकडे भजन आहे न.
हो हो ते हि आहे म्हणा.पण सावकाश जा रे.ए धोंड्या नीट हणायची छकडी उगा पळवू नको.
नाय जी.हाय मी तुमी बिनघोर र्हावा.
मग परत मास्तरांना नमस्कार करून बाबा छकडीत बसले.धोंड्या च्या इशर्तीवर कृष्णा दौडू लागली.
चांदण्यात डवरलेली शेत झुलत होती.मघाच्या भजनातले टाळाचे, पायपेटीचे सूर कानात अजून घुमत असताना त्यात रात किडे आपला सूर मिसळत होते आणि कृष्णा च्या टापा ताल धरून होत्या.
बाळ भाऊ चला हो मी लागतो हिकडं घरच्या वाटेला तुम्ही सांभाळून जावा
म्हणत भजनातला एकजण त्याच्या गावात शिरला सायकल घेऊन.आता रस्त्यावर फक्त आमची छकडी होती.
हा बोल रे आता काय सांगणार होतास?
राहू दे आता घरी जाऊ न झोपू.
अरे सांगतो का आता?
मग धोंड्या सांगू लागला.
मघा म्हणलो ते या परिसरातच दिसत.
हं बघू आपल्याला भेटायला येत का?
लांबवर तिनविरा दिसत होतं.
इतक्यात एका शेतात काही पांढुरक दिसू लागलं.धोंड्याच्या हातातील रेन खेचली गेली.घोडी हि न खिंकाळता जागी उभी राहिली.
हळूहळू काढ रे थांबू नको.
बाळ शेट पन,,
तू चल म्हणलो न
म्हणत बाबांनी धोंड्याला गाडी हाकायला लावली.ते शेत जवळ येऊ लागलं तशी ती आकृती उंच होऊ लागली.जवळ आल्यावर बाबा अचानक म्हणले,धोंड्या थांबव गाडी.
धोंड्याने आज्ञा पाळली.
गाडी थांबली तशी ती आकृती स्पष्ट दिसू लागली.एखादया कडक्या माणसाने पांढरा सदरा घातलाय न तो उभा आहे अस वाटलं.आणि बघता बघता त्या आकृती च डोकं वर वर जाऊ लागलं.त्यावर मुंडास होत ते आता दिसू लागलं. ते मुंडास चांगलं दहा फूट वर जाऊन थांबल.
बघा म्हंटल नव्हतं
धोंड्या म्हणला.
बाबांनी जवळ ठेवलेली बॅटरी काढून तिचा झोत त्या आकृतीवर टाकला.तशी मुंडाश्यात काठी दिसू लागली. ती दिसताच बाबांनी खाली उडी मारली आणि शेताकडे धावले.
कोण आहे रे तो?ये पुढं हिंमत असेल तर.म्हणत बांधावर पोचले सुद्धा.इकडं धोंड्या हि त्याची काठी घेऊन धावत आला रेन काठाला बांधून.
बॅटरीच्या झोतात एकजण न्हाऊन निघत होता.कोण रे तू?
ओ मी हाय बाळ भाऊ वळखल का?
पुढं ये.
तशी तो माणूस पुढं आला.तो भाल्या धनगर होता.देशावरून कोकणात यायचा दर साली.
काय रे हे?अस भिवतोस होय आमच्या लोकांना?
सांगतो शेट समद तुमाला.या कि हिकडं बसा घोंगडी वर.
आयल्या भाल्या तू?
आता धोंड्या हि आला.
बोल आता.
अहो मी दरसाली येतो का नाय मेंढर घेऊन तसा या साली बी अलतो.मेंढर बसवून राखतो रातीची.या साली जरा थांबलो घरला जायच तब्येत बिघडली म्हणून.म माझी गाय चरायला घेऊन रातीच हिंडत असतो.पण गावातली टारगट कुठं कुठं भेटतात पियाला बसलेली न मला तरास देतात.म हि शक्कल लढवली.तेंव्हा पासून कुणी फिरकत न्हाईत उशिराच.
बाबा जोरात हसू लागले.
पण करतोस काय अस?इतकं उंच जातंय तुझं मुंडास ते?
काय इशेस नाय बगा.हे खाली बुजगावन हाय का?त्याला पांढरा शर्ट अडकीवला.त्या शर्टाच्या मानेतून काठी काढली. त्या काठीव मुंडास ठिवल.कुणी येत आस वाटलं त आधी बुजगावन हलवतो.तरी त्यो पुढं येत राह्यला त काठी खाली बसून उच करतो.म जातंय मुंडास वर न माणसं घाबरून पळत्यात.
पर उपकार करा देवा ह्ये कुणाला सांगू नका.
बरा आहेस कि रे भामटा.चल निघतो आम्ही.
हा पर तुमी न्हाई घाबरलासा म्हणून तुमाला कळलं.पर बोलू नका कुणाला.
बाबा हसत शेतातून बाहेर आले,धोंड्या हि गालात हसत होता आणि त्याच्या छातीतून कफ वाजत होता.

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

पैलवानाची बायको

*भयकथा*
कातरवेळी चाळ शांत झाली होती.घरोघरी स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती.पोर खेळून ,दमून घरी गेली त्या मूळ चाळी खालच पटांगण मोकळं झालं होतं.तरुण पोर मात्र चाळी समोरच्या जुन्या वडाच्या पारावर गप्पा हणत बसली होती.कुणी तमाकू ची मळी काढत होता तर कुणी मागच्या बाजूला बसून गुपचूप विडी ओढत होता.आजचा विषय जरा हटके होता.इतक्यात मारुतराव पैलवान सायकल घेऊन आला तालमीतून.
पोरांना बघून त्यान् विचारलं,कारे पोरहो कसली खलबत करताय?जा कि घरला.
ओ मारुत्राव या कि हिकडं जरा.
तस पैलवान सायकल हातात घेऊन पारावर आला.स्टँडला सायकल लावली न पोरांनी सरकून करून दिलेल्या जागेवर वडाला टेकून बसला.
हं बोला काय काढलं नवीन?
काय नाय पर मळी काढतो का आधी दादा मंग बोलू.
हा न म काय,काढ डबी.
नाऱ्या न दिलेली डबी हाती घेऊन पैलवान बार जमवू लागला.
आता उचकटता थोबाड का मी जाऊ खोलीवर?लेको तुम्ही घरी जाऊन आयत गिळताल मला अजून माझं करून घ्याच हाय.
इतकं म्हणून त्याने मळी हातावर झाडून तोंडात अलगद सोडली.
आता नाऱ्या सरकून पुढं येऊन म्हणला,दादा नवं ऐकल का ?
कसचं म्हणून राह्यलाय तू?
आर गावात नवीन बोंब पडलीय.येशीवर तो तिठा है का नाही तिथं म्हण एक बाई हुभी असतेय अलीकडं दोनचार रोज झाले.येणारा जाणारा दिसला त त्याला सरळ ईचारती,यिऊ का मी संगट.
कोण म्हणल?कुणी बगीतली?उगा आपलं काय बाय खुळ काढून बसता तुमी रिकामटेकडे लोक.
आर तस्स न्हाई.हे अक्षी खरय.बापू नाय का तो खाल्ल्या अळीचा गवळी,त तो म्हणत हुता. राती गवत कापून येत होतं बेन त त्याला दिसली.झालंच तर गणू अण्णा चा परतू तालुक्याहून उशिरा आला परवा.त्याच्या बुलेट ला पण आडवी आली न ती.धूम पळवली गाडी न घरी आला .मंग जो फंफंला तो अजून ताप उतरना झाला.सारखा घाबरलेला असतो.आज भागी मावशीला उतारा काढाय लावला तवा कूट जरा शांत झालाय.
आस्स?मला तरी बी पटना झालंय. अस कसं हुईल?न भेटलीच बाई तर समोर हूब राहून ईचाराय काय गेलत का कोण बाय तू? उगा एक म्हणला म्हून दुसऱ्याला भास झाला बाकी काई नाय.उगा कंड्या पिकवू नका ज घरला सगळे.मी बी निघतु.
नाय तुला पटच ना म्हण कि म?इतकं सांगून राह्यलो तरी?
आर कसं पटाव लेका?तुमी नुसतं फुशारक्या मारायच्या कामाचे.जरा तालमीत यिऊन शरीर कमवा मंग कसली भीती उरत नाय बगा. जय बजरंग बली म्हणून दंड थोपटले का सगळी भीती जातेय.वाटलीच त समोरच्याला वाटती.
आत्ता?म लावतो का पैज?
कसली?
आज रातच्याला तिठ्याव जायच.जर ती बया दिसली तर तूच तिची विचारपूस करून दाखव.तुला रविवारच्याला एक कोंबडी मी देतो.
का उगा इरला घालतो,मला काम हैत.असल्या पैजा लावाय येळ न्हाई मला.
म हरला म्हण कि.तुुला हिम्मत हुत न्हाई?
ए भैताड कोण घाबरतंय?
आर म घे कि पैज.
चल घेतली.पन कोन यील माज्या संगट मी खरच जातो का न्हाई बगाया?
हा हा आमी कुणी येत न्हाई बा.
म उद्या बोला।पैलवान गेलाच न्हाई उगा बाता मारतो.
तस कशान हुत?तू तिठ्याव गेला का तिकडं एक बाभळीच झाड नै का?त्यात एक खिळा मारून ये.आमी सकाळी तो बगू .
चालतंय कि.पण केलं तस त कोंबडी नक्की हा.
अरे एकदम नक्की.
बार बार सुटा आता मी जेवायचं बगतो माझं.
मग सगळे निघाले.पार खाली झाला.पैलवान चाळीतल्या पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खोलीत गेला.जेवण करून बसला खाटेवर. पान जमवताना विचार करू लागला,खर असेल का हे?मायला जाऊनच बगू.पान खाऊन उठला.सदरा लेंगा घालून दारा जवळची लाठी न बॅटरी उचलून बाहेर पडला.सायकल घेतली.बॅटरीत नामुच्या दुकानातून नवीन मसाला भरून घेतला.म लागला वेशीवर जायला.चांदण पडलं होतं.बाजारपेठ माग पडली.नाक्यावर खाल्ल्या हाताला वळून वेशीकड बाभळीच्या झाडाकडे निघाला.आता कच्चा रस्ता सुरू झाला.सायकलची खडखड सुरू झाली.क्लिपवर बॅटरी अडकवली होतीच ती सुरू केली.तिचा झोत लांबवर पडला.जराश्यान वेशी वरची बाभूळ दिसू लागली.सावकाश पॅडल मारत चालत होता.
         अचानक ती बाभूळ पांढुरकी चमकते क काय असा भास होऊ लागला.चांदण्या मूळ तस दिसत असावं म्हणत पैलवान झाडाजवळ गेला.हिकडतीकडे बघितलं.रातकिडे सूर धरून होते.बाकी सामसूम होती.उगा एखादं वाळल पान उतरताना हलका आवाज करत होत तितकंच.
एला रोज त येतोय हितून कदी काय बघणं झालं न्हाई.हि कार्टी उगा घाबरत असतात.खिळा मारून कोंबडी नक्की करावी न निघावं झालं.उद्या परत तालमीत जायच हाय. अस मनात म्हणत पैलवानाने खिशातून खिळा काढला.तो ठोकायला दगड उचलायला म्हणून वाकला न बांगडी वाजली.
च्या भैन!कुणाची असलं का भास हुता म्हणत उभा राह्यला. आजूबाजूला बघितलं कुणी नाही.परत पुढं झाला तशी परत खसखस ऐकू आली जशी कुणी पदर साफ करून नीट अंगावर घ्यावा. आता मात्र हा भास नव्हता.पैलवान ताठ उभा राहून म्हणला,कोन त्ये?हिम्मत असेल त फूड या कि.अडून अडून का?
इतकं म्हणला न सर्रकन बाभळीच्या मागून एक एक बाई बाहेर आली.हातचा खिळा पडला.पण धीर करून म्हणला,कोन बाई तुमी?हित या वकती काय करतासा?
आता ती बाई त्याला स्पष्ट दिसत होती.मध्यम उंची.गोलाकार बांधा. डोईवर पदर.हातात चार सोन्याच्या बांगड्या चमकल्या.म्हणजे मघा भास नव्हता तर.
मी तुमच्या सोबत येऊ का?मला कोणी नाही.एकटी आहे.कुणाच्या तरी भक्कम आधाराची गरज आहे. तुमची सर्व काम करीन. काही कमी पडू देणार नाही.
आवाज तर इतका गोड आणि भारून टाकणारा होता.पैलवान आता अगदी समोर येऊन तिला न्याहाळू लागला.बाई हजारात देखणी होती.पैलवान मनातून तिच्यावर खूष झाला. असली बाई आपणहून सोबत येते म्हणतेय!
विश्वास ठेवा माझ्यावर.आता अजून स्पष्ट सांगते.मी तुमची बायको होऊन राहीन.तुम्हाला हवं ते देईन.खूष ठेवीन.
पण हे अस का?बदल्यात काय करावं लागल?आणि तुम्ही कोण कुठल्या?काहीच माहीत नसता आस्स क्स करावं मी₹
बदल्यात करायचं इतकंच कि,
मला कुठले असे प्रश्न विचारायचे नाहीत.मी घराबाहेत पडणार नाही.कुणाच्याही दृष्टीस येणार नाही.इतकं माझं ऐकायचं बाकी मी तुमच ऐकीन हा शब्द देते.मग येऊ सोबत?
पैलवान आता तिच्या पूर्ण कह्यात गेला होता.पटकन हो म्हणला.
म व्हा पुढं मी येते मागून.
पन म्या पैज लावली हुती.
म तो खिळा घ्या कि ठोकून अन उद्या बगू दे पोरांना.बाकी फक्त तुमच्या माझ्यात ठेवायच.कसं₹
हा हे बेस म्हणता बगा तुमी तसच करू.
मग पडलेला खिळा त्यानं झाडात दगडाने ठोकून ठेवला.आता येता त या कि सायकलीवर बसा. तशी बाई लाजली न म्हणली,पुढं नको माग बसते.पैलवान अजून खूष झाला.बाई बसल्यावर गावाकडे निघाला.पण कुणी बघितलं तर?हा विचार मनात आला तो बाईला बोलून दाखवला.ती म्हणली,बिनघोर रहा कुणी बघत नाही.
आओ पन कुनी बघितलं च तर?
मी सांगतेय न नाही होणार तस मग नाही होणार.खात्री बाळगा.
पैलवानाने मग सायकल खरच बिनघोर हाणली.तिला घरात घेतली.
आज तुम्ही थकला असाल इकडं बाजेवर झोपा मी खाली पडतो.भूक लागली असल न?परातीत भाकरी हाय ती घ्या कि.
नाही मला भूक नाही.आणि तुम्ही खाली का झोपणार?मी शब्द दिलाय न तुमच्या बायको सारखी राहीन म्हणून?म दोघे बाजेवर च निजू.
पैलवान हरखला आणि त्याने लाईट च बटन बंद केलं.भांडभर पाणी पिऊन तो बाजेकडे निघाला.


सकाळी उठून पैलवान बघू लागला कि स्वप्न बघितलंय का खर होत ते?
खोली झक्क आवरलेली होती.जमीन झाडून पुसून स्वच्छ. स्वयंपाक खोलीतून मस्त चहाचा वास येत होता.इतक्यात ती बाथरूम मधून आली. नुकतीच न्हाऊन आलेली होती.पैलवान तिचं रूप बघतच राहिला.बघताय काय नुसतं?तोंड धुवून घ्या चहा तयार आहे.तो आज्ञाधारक मुलासारखा उठला न तोंड धुवून आत गेला.त्याला बसायला तीन पाट सरकवला.चहा सोबत खारी होती. हे कोणी आणलं?आपण तर नाही. मग हिने आणली?
हे सर्व बघून ती हसत म्हणली,म्हटलं न आता तुम्हाला काही कमी पडणार नाही.
मग अंघोळी नंतर गरम गरम नाश्ता तयार होता. त्या नंतर पेलाभर बदाम पिस्ता घातलेल्या दुधाची चरवी आली. दुपारी जेवायला काय हवं फक्त सांगून जा तयार मिळेल याल तेंव्हा.पण आपली बोली लक्ष्यात ठेवा
मी इथं आहे याची कुणाशी वाच्यता करायची नाही.
नाही बा मी कशाला करतो?
ते पैज लावली होतित त्यांना काय बोलणार?
बोलायच काय?खिळा बघून या म्हणीन.कुणी बाई भेटली ना कुत्र.अस सांगीन.
हे ऐकून ती गालात अशी हसली कि पैलवान परत येऊ लागला जवळ.ती म्हणली,हं,आहेच मी आता न?तालमीत जा आता.
तशी तो हसत बाहेर गेला.दरवाजा लावून बाहेरून कुलूप लावा तितकं.आतून तिने बजावलं.त्यानं कुलूप लावून घेतलं.
कालची पोर त्याची वाट बघत होती पारावर.काय र काय बघितलं?
कसचं काय?म्हनल न उगा तुमचं कायबाय असतंय.कुनी बाई नाय कि बुआ नाय.जा खात्री करून या ठोकून आलोय खिळा. व्हय बाजूला मला तालमीत जायला उशीर हुतोय.अन ते रविवारी कोंबडी च मात्र नक्की हा.
पोर त्याच्या कड बघतच राहिली.
एकजण।म्हणलाच, याच नशीब जोरावर दिसतंय.काळवेळ जमली न्हाई म्हून सुटला.
आर हो पर माझी कोंबडी गेली कि त्या पैजेत.
हा ती त गेलीच.असू दे निदान गावावरची आफत गेली म्हणायच कि आता.

पैलवानाचे दिवस मस्त चालले होते.ती त्याच्या सोबत येत नव्हती कुठंही बाहेर इतकं सोडलं तर बाकी तिच्यात नाव ठेवण्या जोग काहीही नव्हतं.कुणाला कसला संशय हि आला नव्हता.त्याची खोली तशी रस्त्यावरून दिसत असे पण तरी तिला कुणीच बघितलं नव्हतं कधी.खोली एक बाजूला होती आणि अलीकडच्या खोल्या बंद असल्याने तिकडं कुणीच रहात नव्हतं.यथावकाश तिला मुलगा झाला.आता पैलवान आणि खूष झाला.पोर देखील अजिबात रडत नसे.फक्त गालात हसायचं.आश्चर्य वाटले त्याला पण कोणाला सांगणार.
एक दिवस दरवर्षी गावतल्या जत्रेस येणारा कासार आज पारावर येऊन बसला.तो नेहमी तिथं बसे.सकाळी न्याहारी उरकली कि टोपलीतल्या बांगड्या नीट मांडून विकायला बसे.येणाऱ्या जाणाऱ्या बाया बापड्या बांगड्या भरून घेत.
त्याच लक्ष पैलवणाच्या खोलीकडे गेलं न तो चरकला.काहीतरी वेगळं जाणवलं त्याला.एका नाथपंथी बाबा ची त्यानं सेवा केली होती त्या मूळ खूष होऊन बाबांनी त्याला काही विद्या शिकवली होती.अट मात्र घातली होती कि त्या विद्येचा वापर धंदा म्हणून करायचा नाही.फक्त अतिशय अडचणीत असलेल्या गरजूस मदत करायची ती विद्या वापरून.
त्या खोलीत काही वेगळं आहे हे त्याला जाणवलं.संध्याकाळी परत जायच सोडून तो पैलवानाची वाट बघू लागला. पैलवान येताच त्यानं त्याला हात केला.पैलवान त्याला ओळखत होताच.तो हि पारावर आला.काय काका कसं सुरुय धंदा पाणी?
सगळं ठीक बाबा.तुझं कस काय?
माझं हि ठीकठाक .
पैलवान एक महत्वाची गोष्ट बोलायचीय.
म बोला कि.
तुमच्या घरी कोण रहात?
पैलवान चरकला.
मी एकटाच कि.अस का ईचारल?
बघा खर सांगा लई वंगाळ बाब हाय.
कोणती पण?
घरी कोण आहे ते खरं बोला.मी विद्या जाणतो.मला काही दिसलंय जे वाईट आहे.तुमच नुकसान होईल.मी वाचवू शकतो तुम्हाला फक्त खर बोला.
आता पैलवानाचा नाईलाज झाला. त्यानं खर ते सर्व सांगितलं.
मग कासारान पिशवीतून एक ताईत काढला. पैलवानाच्या गळ्यात बांधला. आणि एका लाल रेशमी वस्त्रात बांधलेली उदी काढली. मग काही वेळ तो मंत्र पुटपुटत होता.ते झाल्यावर ती उदी एका कागदात बांधून ती खिशात ठेव.घरात गेलास कि उंबरठ्यावर ती उदी एक रेषेत टाक. तशीच खिडकीत हि टाक. जोवर ताईत आहे तुझ्या गळ्यात तोवर तुला काही होणार नाही.ती तो काढायचा प्रयत्न करेल ते होऊ देऊ नकोस.आणि दरवाज्या वर ती उदी देखील टाक म्हणजे ती कुठं जाऊ शकणार नाही.इतकं केलंस कि मी येईन आणि पुढच काम करीन. तिला तिच्या स्थानी परत पाठवून देईन.
पण तुम्ही म्हणता ते खरं कस मानू. मग आज बघच तू खात्री करून.आज तू पलंगावर झोपायच्या आधी मुलाला उचलून दूर पाळण्यात ठेव. मग तिच्यावत रात्री लक्ष ठेव.तुला समजेल काय आहे ते.
पैलवान घरी गेला.कासार म्हणला तस वागला. मुलाला दूर।पाळण्यात ठेवलं आणि बायकोच्या बाजूला झोपला.आता बाजेच्या भिंतीकडील बाजूस तो होता.रात्री मूल चळवळ करू लागल हे त्याला जाणवलं.हळूच चादरी खालून तो बघू लागला.बाजूला झोपलेली बायको देखील जागी झाली होती.मुलाला उठलेला बघून तिनं हात पाळण्याचा दिशेला केला.आणि हळूहळू तो हात पाळण्यात जाऊन पोचला लांब होत होत.तिनं त्या मुलास पंजाने उचललं आणि हात परत माग येऊ लागला.आता तो डोळे फाडून बघू लागला. हा प्रकार बघून तो घाबरून ओरडला.आता तिने पटकन वळून बघितलं.पैलवानाच्या गळ्यात ताईत चमकला.तिने मुलाला तिथेच टाकून बाजूला उडी मारली.रागाने म्हणून लागली,हे काय बांधलंत गळ्यात
आधी काढून टाका.तो नाही म्हणला तशी ती पुढं झेपावली. तिचा हात ताईतावर पडताच तिचं खर रूप दिसू लागलं. काळी बेंद्री विद्रुप स्त्री झाली ती. सुळे होते तिला ओठाच्या कडेला. पैलवणाला आठवलं उदी आहे आपल्याकडे जी उंबरठ्यावर टाकायला सांगितलंय.तो तसाच उठला न दाराकडे जाऊ लागला.ती त्याच्या अंगावर गेली धावून पण विजेचा झटका बसावा तशी माग झाली.ताईत असे पर्यंत तुला धोका नाही हे खरं झालं.तिने मग पलंगावरील मुलांकडे धाव घेतली न त्याचा गळा दाबला.तो ताईत काढ न ती उदी फेकून दे नाहीतर मुलगा मेला समज.तिची काळी नख पोराच्या नरडीचा घोट घेऊ लागली. तरी त्यानं ती उदी उंबरठ्यावर रेषा खेचत सांडली.तिनं मुलाचा जीव घेतला.इतक्यात दार वाजल. पैलवानाने उघडलं तर तो कासार उभा होता.तो आत आला.तशी ती आणि किंचाळत मागे हटली मुला पासून. काका आता हो?
घाबरू नकोस तिला तिच्या जागी पाठवतो. कासार तिच्याकडे बघत काही पुटपुटू  लागला.झोळीतूम कमंडलू काढून त्यातलं पाणी तिच्या अंगावर टाकलं.तो आता विव्हळू लागली.मला जाऊ दे म्हणून विनवू लागली.कासार काका म्हणला,तू गेलीस याची खूण काय देशील?
समोरच्या पारावरच्या झाडाची मोठी फांदी खाली पडेल.
तुझ्या मुलास हि सोबत घेऊन जाशील तर सोडतो.
ती हो म्हणली.मग अचानक खाडकन खिडकी उघडली गेली आणि ती आणि तिचा मुलगा काळा धूर होत त्या खिडकीतून बाहेर पडताना दिसली.
आता दार उघड.कासार काका म्हणले.पैलवानाने दार उघडलं.त्याच वेळी समोरच्या पारावरील मोठी फांदी झपकन खाली पडली करकर आवाज करत.
पैलवान घामाने चिंब झाला होता.
कासार काका म्हणले,पोरा मी जातो आता.माझं काम झालं.वाचलास तू .पुन्हा अशी चूक करू नकोस.आणि ते जिना उतरत दिसेनासे झाले.फक्त त्यांनी जाताना जागवलेला अल्लख निरंजन मात्र आसमंतात घुमत राहिला.
😊🙏🏻

सोमवार, १ जुलै, २०१९

प्राणी पालक

त्या खास पाळलेले प्राणी फिरवायला आणायला म्हणून तयार केलेल्या पार्क मध्ये काही माणसं भेटली. जी वेगवेगळे प्राणी पालक होते.अगदी वाघ सिंह ते पोपट मैना सारखे पक्षी.एकेक जण आपले प्राणी सांगत होता.मो पोपट पाळालाय,मी मैना . ते ,मी सिंह पाळलाय. मग एक जण म्हणला मी तर गोरिला ठेऊन आहे.ज्याच्याकड जास्त हिंस्त्र प्राणी त्याच्या कडे लोक कौतुकानं ,आदराने बघत होते.शेवटी मी उरलो.मी गप्प बसून ऐकत होतो. न राहवून आपला प्राणी सर्वात हिंस्त्र आहे अस ज्यांना वाटत होतं त्यांनी मला विचारलं,तुझं काय?तू काय पाळल आहेस?म्हटलं आमचं जरा वेगळं आहे.
पोमेरियन कुत्रा कि खारुताई,अस म्हणून सगळे हसले आणि एकमेकांना टाळ्या देऊ लागले.
मग मी म्हटलं,बाबांनो मी एक माणूस पाळला आहे!
आता सर्व स्तब्ध झाले.
तू पिंजरा मजबूत करून घेतला असशील न?
नाही,मी त्याला मोकळा च ठेवतो.
आता मात्र सगळे उठून उभे राह्यले आणि मला कमरेत वाकून अभिवादन करून म्हणले,
बाबा तू ग्रेट आहेस.आम्ही आमच्या पाळीव प्राण्यांना हिंस्त्र म्हणत होतो आणि असे डेंजरस श्वापद पाळलाय याचा खोटा अहंकार बाळगून होतो.तू मात्र चक्क माणूस पाळून शांत आहेस?कल्पनाच करवत नाही.आमच्या सर्वांपेक्षा तू ग्रेट आहेस. तुझ्या त्या प्राण्याने तुझा बळी घेतला ,हि बातमी कधीतरी ऐकायला येईलच कदाचित. पण म्हणून त्या आधी तुझ्या कर्तृत्वाबद्दल तुझं अभिनंदन करतो.तुला अनेक शुभेच्छा मित्रा.स्वतः ची काळजी घे.
आणि मी तिथून निघून आलो शांत पावलं टाकत.ते लोक दुतर्फा उभं राहून मला अभिवादन करत होते.सचिन रिटायर्ड होऊन पॅव्हेलिअन मध्ये जाताना त्याला कस वाटलं असेल याचा प्रत्यय मी हि घेतला.
😊

मंगळवार, ११ जून, २०१९

स्वच्छता दूत

 फिरायला जाताना सफाई कामगार त्यांच्या कामात दिसतात.जे एरवी कधी मी बघितले नव्हते कारण ते काम करून गेले कि बाहेर पडलेलो असायचो. पण आता रोज जाताना दिसतात.त्यात पुरुष ,बायका दोन्ही असतात.बायका फक्त झाडून पुढं जातात कचरा ठिकठिकाणी गोळा करून ठेवत.मग मागच्या गाडीत तो पुरुष कामगार उचलून टाकून निघून जातात.त्यात एक ग्रुप असतो जो मोठी गटार मधली झाकण उघडून साफ करतो. त्यांच्या कडे मोठ्या काठी च्या टोकावर काटा चमचा असतो तसा काटा असतो,त्यानं ते आतली घाण उचलून कडेला जमा करतात.मुंबईत बघितलं होत प्लाझा च्या मॅन होल आधी नुसतं झाकण उघडून तसच ठेवत.एका कामगाराला विचारलं होत अस का?तो म्हणला,बाबा यात विषारी गॅस तयार झालेला असतो तो निघून जातो त्या मूळ.मग ती माणसं कुठली सुरक्षा रक्षक साधने न वापरता त्यात उतरत.वरून बघितलं तर इतका वाईट वास येत असतो.काळा कुट्ट चिखल घाणीचा.त्यात कधी कधी तो छाती इतका ही असतो.कसे काम करतात हे लोक?
परत सोपऱ्यात येऊ,
तर त्यांचं काम थोडं थांबून बघितलं.तो जमलेला मैला आता पाणी त्यातून ओसरून गेल्याने ढीग होऊन पडला होता.दोघेजण आले आणि त्या ढिगात काठी खुपसून उलट सुलट करू लागले.म्हटलं अस का करतायत हे?सरळ गाडीत टाकायचा तर हे का ?मग पाह्यलं तर त्यात एकाने हात घालून काही बाहेर काढलं.ते चक्क पैशाच पाकीट होत.त्यानं ते उघडून बघितलं.भिजलेल्या कागदा सारख काही निघालं.त्यातील काही नोटा होत्या त्या त्यांनी करेक्ट ओळखून बाजूला काढून ठेवल्या.मग काही चिल्लर निघाली ती बाजूस ठेवली.नंतर एक लेडीज पर्स हि निघाली.मी बघत उभा होतो.मग त्यांनी सगळ्या कचऱ्यातून बिअर,एनर्जी ड्रिंक चे अल्युमिनियम कॅन,प्लास्टिक च्या पिशव्या आणि इतर वस्तू ही प्रत वारी करून घेतल्या. त्या एका गोणीत भरल्या.मग कचरा गाडीत भरून ती गोण घेऊन निघून गेले.एकजण मला बघत होता तो म्हणला,अब वो सब चीजे बेची जायेगी.बेचारो को उतनी हि उपर कि कमाई होती है.
परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते.त्या लोकांना मानलं.अशी मेहनत करून जगतायत जीव पणाला लावून.
आणि एक गोष्ट अशीच मनाला चटका लावून गेली.
सुरेखा ताई पुणेकर यांच्या एका चॅनल वर झालेल्या मुलाखती मधला दीड मिनिटांचा भाग तू नळीवर बघितला.त्यात त्यांना त्यांच्या प्रेमा बद्दल विचारलं गेलं.त्यांच आयुष्यही खूप खडतर गेलंय. तर त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या,
मी माझ्या लोकाकर्ता खूप केलं.आता नंतर च्या काळात मला कुणीतरी आवडला होता.तो हि प्रेम करत होता माझ्यावर.पण लग्न करू शकत नव्हता.मी ते समजून होते तरी प्रेम करत होते.आता यात कुणाला हरकत का असावी?ज्या कुटुंबा साठी पोरांसाठी मी आयुष्यभर काम केलं त्यांनी माझी ही इतकीच गोष्ट मानायला काय हरकत होती?पण नाही.त्यांनी खूप विरोध केला मग ते प्रकरण संपलं.
दोन्ही गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरी जगताना कुणाला काय भोग भोगावे लागतील सांगता येत नाही.मग निदान अश्या आयुष्य भोगणार्या लोकांना त्यांच्या वर्तुळातील लोकांनी समजून घ्यायचा प्रयत्न न करता वागणं हे खूप निर्दयी वाटलं.आज सुरेखा ताईंचं नाव आहे.अमेरिकेत जाऊन कार्यक्रम सादर करून आल्यात.मराठी बिग बॉस मध्ये त्यांना घेण्यात आलंय. पण बाईच्या मनातली हि खन्त कशी दूर होणार?
या पार्श्वभूमीवर अस काहीही न भोगलेली माणस अश्या माणसांना उगाच नाव ठेऊ लागली कि अश्या लोकांची किव येते.हलकट हो यातलं 5 टक्के तुमच्या वाट्याला आलं असत तर तुम्ही नक्कीच टिकला नसतात.
पण नशीब कुणाला कुठं कसं ठेवेल सांगता येत नाही.
काल प्रेमा च्या विषयात मी म्हणलो कि प्रेम म्हणजे काय?तर त्या हत्ती न आंधळ्या लोकांसारखं आहे.ज्याच्या समोर,हाती जे लागेल ते चाचपून ते त्याला तस वाटेल.आयुष्याची हि तीच कहाणी आहे.प्रत्येकाची वेगवेगळी. आपल्या वाट्याचे आपण इमानदारीत जगावे.
फिरताना घडकेला किस्सा नंबर दोन.
काल अचानक आल्या चा सुगन्ध आला.बघितलं तर टपरी होती चहा ची.पुढं जाववल नाही.एक कटिंग दे म्हटलं.त्यानं टपरीच्या बाजूला एक बाक ठेवलाय त्यावर बसलो.नुकताच गाळून आलेला चहा त्या मूळ ग्लास गरम होता.तो बाजूस ठेऊन निववत ठेवला.इतक्यात बाजूनं एक म्हातारा गृहस्थ आला.टी शर्ट होता काळ्या पांढऱ्या पट्ट्याचा आणि पॅन्ट.दोन्ही मळलेल्या अवस्थेत. माझ्याकडं पाठ करून बसला.दोन्ही हात भरलेले होते.एक ग्लास पाण्याचा,एक चहा चा आणि ग्लुकोज बिस्कीट चा पुडा. शरीर कृष्. तो खाली बसला.हळूच सगळं खाली ठेवलं.बिस्कीट पुडा सोडायला त्याला बराच वेळ लागला.सुटल्यावर त्यानं पाण्याचा ग्लास घेऊन त्यात बिस्कीट बुडवून खाऊ लागला.तेंव्हा जाणवलं त्यांना दात नसावेत.नजर समोर ,पण कुठंतरी शून्यात बघत बसला होता.चहा तसाच होता बाजूला.एकेक बिस्कीट हळूहळू काढत होता न खात होता. मनात आलं कोण असेल हा?काय कहाणी असेल याची.चेहेरा अत्यंत सोज्वळ वाटत होता. कसलं दुःख हवेत बघत विरघळवत होता पाण्यात बुडणाऱ्या बिस्कीट सारख?मला खरच बघवल नाही.कारण माग एकदाच अश्या प्रसंगी मनात विचार आला,हेच आपलं झालं तर?
मग एक घोटात चहा संपवून उठलो.त्या टपरी वाल्याला पैसे दिले.तो त्या म्हाताऱ्या कड बघत होता एकटक.कदाचित ग्लास घेऊन पैसे बुडवून पळून तर नाही न जाणार !अस त्याच्या मनात असेल का?हा हि विचार आला.मग त्याला म्हटलं,त्यांनी पैसे दिले का? तो नाही म्हणला. किती होतायत त्यांचे?
सहा रु.
बिस्कीट?
वो लाया था .दिया होंगा किसिने.
तो ये उनका चाय का पैसे लिजीए.उनसे लेना नही.और पुछे तो बोलना, वो तुम्हारे साथ था वो दे के गया.
ठीक है साब.
मग त्या गृहस्थाकड न बघता त्याच्या मागून मी निघालो.तो अजूनही ग्लासात दिसायला तरी,बिस्कीट बुडवत होता.
मी भीक देत नाही जनरली.तसच कुणी म्हातारे, परावलंबी दिसलं तर जमत ते देतो.पण खायला मात्र देतो घेऊन.
का ? पुण्याची जोडणी?
बिलकुल नाही.ते मी कोण करणारा?पण अश्या लोकांत मी स्वतःला बघतो आणि स्वतः च स्वतःलाच मदत करतो.
कबीर कानात कोकलत असतो,
इतना ही देना स्वामी
ज्या मे कुटुंब समाय
मै भी भुखा न रहू
साधू न भुखा जाय
यात माझा आग्रह मात्र इतकाच
कि
*इतना तो देनाही*

सोमवार, ३ जून, २०१९

खलनायक

सकाळी सकाळी अमजद आठवला रे सिकंदर मधला.क्या बे पगले ,अरे साब आप इधरिच है क्या अब भी,चलो अपना भत्ता चालू करो भोत भूक लग रेहला है बाप किंवा ऐसा सुम बैठने से काम नही चलेगा नाम बोल लंबू आणि शेवटी सिकंदर जोहराच्या तसा प्रेमात नव्हता हे समजल्यावर मरायच्या आधी ,या अल्ला ये आखरी वक्त भोत बडा गलती हो गया
अस म्हणणारा गुंड .अमजद ने अमिताभ असताना व्हिलन जबरदस्त उभा केला होता शोले नंतर.गब्बर तर अजरामर च.इन्कार मध्ये त्याचा भला भक्कम हात फोनची रिंग डायल करताना बघण आणि एक पाय दुसऱ्या पायावर घासत उभं राहणं
काळजात धडकी भरवणारे होत.
प्राण चा व्हिलन त्याच धारदार नाक आणि तेज नजर मूळ भारदस्त असे.वेगवेगळे गेटप, सिगरेट ची वलय शत्रुघन सिन्हा सारखी तो सोडत असे.
रणजित तर दिसायचाच बदमाश.
वन्स इन अ ब्लु मून, कभी कभी ,,सारख वाक्य म्हणजे दुर्जनतेच मूर्तिमंत स्वरूप.
दुर्जन वरून कन्हैया लाल सारखा अर्क व्हिलन,जो म्हातारा होता पण,राधा रानी म्हणत हिरविणीस जेरीस आणणारा आणि चप्पल फेकून मारावी अस वाटायला लावणारा.
अजित दमदार आवाजात सुटेड बुटेड राहून गँग बाळगून सोन,हिरे वग्रे मध्ये डील करणारा हुच्चभ्रू  व्हिलन.लायन चा उच्चार लॉयन सारखा फेमस करणारा.
ऑ अस काहीसं टिपिकल टोन न म्हणत खलनायक सादर करणारा   जीवन.
तसा सुशिक्षित हरामखोर व्हिलन हातखंडा साकारणारा प्रेम चोप्रा.
प्रेम.प्रेम नाम है मेरा.प्रेम चोप्रा.अस युवा प्रेम युगुल ऋषी,डिंपल ला घाबरवणारा व्हिलन.
बरेचदा श्रीमंत शेट बदमाश पेश करणारा आणि स्थूल शरीराचा प्रेमनाथ हि उपस्थिती राखून होता.
आपली अशी वेगळी संवाद शैली स्वतः लिहून हलकट आणि कधी कधी विनोदी अंगाने व्हिलन पेश करणारा कादरखान.जो स्वतः उत्तम लेखक होता.आणि मरायच्या आधी कुठल्या तरी समारंभात,मी भाषा बिघडवली हिंदी सिनेमाची.आता ठीक होऊन काम करीन तेंव्हा परत ती चूक नक्की सुधारीन अशी खन्त व्यक्त करणारा माणूस.
बाकी ही अनेक लोक छोटे पण उत्कृष्ट व्हिलन रंगवणारे होते,जसे सुधीर पांडे,सुधीर,सुजित (ज्याचे कपडे भारी स्टायलिश आणि परफेक्ट फिटिंग चे असत),मोहन,मॅक मोहन.
मदन पुरी ने ही उत्तम व्हिलन साकारले.
या लिस्ट मधील वेगळे लोक म्हणचे शॉट गन सिन्हा आणि विनोद खन्ना.ज्यांनी आधी व्हिलन आणि मग हिरो तितकेच सफाईन सादर केले.
सर्व हिरो लोकांना यशस्वी करण्यात या सगळ्या व्हिलन लोकांचं योगदान नक्की आहे अस मला वाटत.कारण इतक्या तगड्या लोकांशी सामना करतो तो हिरो.
सर्व दुर्जन साकारणाऱ्या कलाकारांस सलाम. म्हटलय न दुर्जनम प्रथम वंदनम. वाईट आहे म्हणून चांगलं उठून दिसत.

मंगळवार, २८ मे, २०१९

काय म्हणते तुझी बहीण?

रामदास स्वामी आणि त्यांच्या शिष्यांची गोष्ट आठवली आज जी खूप फेमस आहे.
स्वामी आणि शिष्य परिवार जंगलातून मार्गक्रमण करत जात असतात.वाटेत एक छातीभर पाणी असणारा ओढा पार करून जायच असत.एक तरुण स्त्री तिथं उभी असते.तिला हि पलीकडे जायच असत पण पोहोता येत नाही म्हणून कुणी पार नेऊन सोडता का अस प्रत्येक शिष्याला विचारते.पत्येक जण तिला टाळून जातो.कारण आपण संन्यासी,स्त्री स्पर्श वर्ज.शेवटी रामदास स्वामी येतात.त्या स्त्री ला खांद्यावर बसवून पलीकडे नेतात.ती त्यांना पाया पडून निघून जाते.या लोकांचा हि पुढील प्रवास सुरु होतो.एक शिष्य मात्र स्वामींच्या मागे पुढं घुटमळत चालत असतो.शेवटी स्वामी थांबून त्याला विचारतात,
काय रे तुला काही विचारायचे आहे का?अस्वस्थ दिसतोस म्हणून म्हटलं.
स्वामी शंका जरूर आहे.पण धाडस होत नाहीये विचारायच.
किंतु न ठेवता विचार.
स्वामी आपण संन्यासी.तरी त्या स्त्री स आपण उचलून नदी पार केलीत.
मग? तिला मदत करायला नको होती?
तस नव्हे,पण त्या मूळ आपला संन्यासी धर्म ,,,,
याच उत्तर अस आहे कि, तिला खांद्यावरून उतरवून मी बराच पुढं निघून आलोय पण तुझ्या खांद्यावर मात्र ते ओझं अजून आहे.तिच्या विषयी माझ्या मनात कुठलीही भावना नव्हती.फक्त तिला नदी पार करण्यात मदत करणे इतकंच माणूस म्हणून,स्त्री दाक्षिण्य म्हणून मनात होत.मन साफ असलं कि पापाला त्यात उतरायला मिळत नाही.
      हे लिहायला कारण कि,
फिरून येताना एक टोळकं उभं होत.जिथं एके ठिकाणी पायऱ्यांवर मी बसतो तिथं.
एक जण दुसऱ्याला म्हणला,
काय रे तुझी बहीण काय म्हणते?जाऊन भेटत वग्रे नाहीस तिला. तुला काळजीच नाही बहिणीची हं.अस काही बाही म्हणून तो निघून गेला.ज्याला म्हणला तो माझ्या ओळखीचा होता.तो अस्वस्थ होत जवळ येऊन बसला. खूप बेचैन होता.म्हटलं,क्या बावा क्या हुआ?
अरे यार काय सांगू काका तुम्हाला?
दोस्ती खात्यात मन मोकळं कर.कदाचित मी काही सांगू शकेन!
हा,तुम्ही नक्की सांगू शकाल.तुम्हीही यातून गेले असाल.
ते माहीत नाही पण यातून म्हणजे कशातून?
बोलू का सगळं?
बिनधास्त.
अहो,आमच्या ग्रुप मधला तो जो आत्ता बडबड करून गेला तो एका मुलीवर एकतर्फी प्रेम करतो.पण भिडायची हिम्मत नाही.ती मुलगी माझ्याशी मस्त बोलते.यात माझा काय दोष?पण
ते याला खपत नाही .मग मला जबरदस्ती बोलत असतो,तुझी बहीण काय म्हणते?मी त्याला कितीवेळा म्हटलंय माझ्या मनात तिच्या विषयी तस काहीच नाही.फक्त निखळ मैत्री आहे.तरी याची रेकॉर्ड तिथंच अडकलेली असते.मला नाहक मनस्ताप होतो.आता बोला कसं वागायचं?
आपण कसं वागायचं हे आयुष्य संपलं तरी कळणार नाही.कारण आपण इतरांना नको तो हक्क देतो.
आता मला सांग ती मुलगी तुझ्याशी मनमोकळं बोलते.
हा न.
ग्रुप मधील इतर मुली?
हो.इतर मुलीच का मुलंही माझ्याशी मनमोकळं बोलतात.
मग त्याला तेच खटकत असेल.
पण यात माझा काय दोषय.
कुठं आहे.अजिबात नाही.तू त्याला नाहक विचारात स्थान देतोस म्हणून हा त्रास तुला होतोय.
आणि एक लक्षात घे.जर स्त्रिया तुझ्याशी मनमोकळं बोलतात तर ते क्रेडीटेबल आहे दोस्त.कुठलीही स्त्री तुझा विश्वास असेल तरच तुझ्याशी बोलेल मनमोकळी.अन्यथा तुला चार हात लांब अंतरावर च ठेवेल.मुलंही तुझ्याशी तसच मोकळेपणी वागतात याचा अर्थ तू जग मित्र आहेस.तुझा स्वभाव, तुझं वागणं आश्वासक असल्याने तुला मित्र मैत्रिणी खूप आहेत.
पण मग हा असा का वागतो, इतर का नाहीत म्हणत तस?
कारण इतर जण ही निर्विकार मनाने मैत्री ठेऊन आहेत.त्या तुझ्या सो कॉलड मित्रा च्या मनात तिच्या विषयी वेगळी भावना आहे.जी तिच्याकडे व्यक्त करायची हिम्मत नसेल.मग असे तडफडते आत्मे असेच इतरांना छळत बसणार, कुढत बसणार.
अहो पण आता आम्हीही लहान राहिलोत का?याला समज कधी येणार?
समज आणि वय याचा बरेचदा समंध नसतो.कारण वय वाढलं म्हणून समज वाढते अस नसत.स्वकेंद्री,आकसाने जगणारे लोक सहन करता येत नाहीत तेंव्हा त्यांना टाळलेल उत्तम.त्यानं उगाच आपली मनस्थिती बिघडते.
अहो मी तर हा लोच्या च नको म्हणून ग्रुप मधून बाहेरच पडायचं म्हणतोय.
त्यानं तो बदलेल का?पण तुझे इतर मित्र मैत्रिणी विना कारण गमावशील.
म्हणता ते पटलं पण डोक्यात जातो ओ तो.
डिलीट मार भेजे मे.
यावर तो झक्क मनमोकळं हसला.काका,थँक्स.सगळं क्लिअर केलंत.
अरे असे मनात कुढत बसणारे असतातच पण मनमोकळं वागणारे ही असतात कि नै.
अश्या कुढ्या लोकांचा विचार करत आयुष्य दुःखी करावं कि इतर झक्क लोकांना आपलंसं करून रहावं हे आपणच ठरवाव.
त्याला जाऊ दे त्याच्या मार्गाने.स्वामीच ओझं त्यांच्या शिष्याच्या मानेवर होत.ते उपदेश मिळाल्यावर त्यानं खाली टाकलं पण ते तुझ्या त्या सो कॉलड मित्रा सारख्यांच्या खांद्यावर असत बसलेल.आपण स्वामींच्या आणि इतर शिष्य परिवारा सारख पुढं जात रहावं.
करेक्ट काका.अजून एक विचारू का?
आहेच का अजून काही?
नाही आमच्या पिढीचे होत हे पण तुमच्या वेळीही असे लोक होते का?
मग लेका उगा तुला उपदेश देऊ शकलो का .काहीच बदलत नसत यार.जुनीच फॅशन नव्याने येत असते.कालचक्र एकच आसा भोवती फिरत.
लक्ष्यात ठेव.कुठल्या पोरी विषयी काही वाटलं तर तिला स्वतः जाऊन बोलावं.ताकाला जाऊन भांड लपवू नये.हो म्हणली उत्तम.नाही म्हणली,,,दुसरी बघायची.नाही जुळत कधी कधी दोन्ही कडून.उसमे क्या है.जबरदस्ती त प्रेम नक्की च होऊ शकत नाही.ग्रो अप बडी.
दे टाळी,
त्यानेही कचकचीत टाळी दिली आणि आम्ही पायरी वरून उठलो.