-******- कलंदर कलाकार -*******-
कलाकारांचे किस्से तुम्ही हि ऐकले असाल . काही मी ऐकलेले सांगतो .
गुरु शिष्य नात किती घट्ट असत . पूर्ण विश्वासाच . एक विद्यार्थी गुरूगृही तबला शिकायला रहात होता . सगळ सुरळीत सुरु असताना गुरु काही कामानिमित्त काही महिने बाहेर गेले . मी शिकवलंय त्याचा रियाज करा अस सांगून . काही दिवसातच या शिष्याला उदास वाटू लागल . गुरूंच्या बायकोने विचारलं , कारे बाळ अस का ? गप्प ,उदास असतोस . हा म्हणाला काही नाही गुरुजी नाही आता शिकू कसा पुढच ? ती माउली म्हणाली, हात्तीच्या एव्हढंच न मग मी शिकवते . हा चाट पडला . तुम्ही शिकवणार ? हो त्यात काय . माझे वडील तबलजी आहेत . त्यांनी माझ्या लग्नात तीनशे कायदे आणि तेव्हढ्याच गती , रेले अस तुझ्या गुरुजीना हुंडा म्हणून दिलाय . आणि त्या विद्यार्थ्याला गुरु पत्नीने पुढील शिक्षण दिले .
होय जुन्या काळी कलाकार लोकं हुंडा म्हणून विद्या घेत . आणि जो देणारा माणूस जे हुंडा म्हणून दिलाय ते स्वतः कधीच वाजवत नसे . त्या गोष्टींवर कायम साठी पाणी सोडत असे . म्हणजे त्याच्या कडे किती ज्ञान असेल . आणि ज्या गोष्टी द्यायच्या त्या हमखास रंगणाऱ्या . निवडक अश्या .
अश्या पाचशे गती लाहोरहून हिंदुस्थानात आल्या होत्या . त्या आजही झाकीर भाई आणि अन्य कलाकार वाजवतात . काही कलाकार अश्या चांगल्या मैफिलीत रंगणाऱ्या गोष्टी अडचणीच्या काळात सावकाराकडे गहाण ठेवत असत . आणि सावकारही ते मानून पैसे देत असत . अश्या गहाण गोष्टी कितीही फर्माईश लोकांनी केली तरी कलाकार गात वा वाजवत नसत . इतकी इमानदारी होती .
आणि कले विषयी अभिमान हि तसाच असे . तबल्याचे महान उस्ताद अहमद जान थिरकवा . शिकलेले नव्हते . त्यांचा एकदा रेडिओवर
कार्यक्रम रेकोर्ड झाला आणि चेक आला . त्यांनी अंगठा उमटवला . एक अतिशहाणा अधिकारी त्यांना कुस्कटपणे म्हणाला ,काय उस्तादजी तुम्हाला सही करता येत नाही ? यावर थिरकवा म्हणाले , आपके दुनियामे लोग पढे लिख्हे है ? बहोत है तो म्हणाला. मग उस्तादजी हसून म्हणाले , लेकिन थिरकवा कितने है . एक हि है . त्या अधिकार्याची बोलती बंद झाली .
एकमेकान विषयी प्रेम हि तसेच असे . जात पात धर्म हे काही आड येत नसे . हेच थिरकवा बाल गंधर्व यांचे तबलजी होते . पण फक्त त्यांचीच गाणी वाजवत . पुढे गंधर्व कंपनी फुटली आणि काही लोकांनी तीच नाटक करायची ठरवल . ते थिरकवांकडे वाजवाल का आमच्या कडे अस विचारायला गेले . थिरकवां म्हणाले , बजा तो लूंगा पर गंधर्व कहांसे लाओगे ? नाहीच वाजवल इतर कुणा बरोबर . मग गंधर्वांच्या उतरत्या काळात गंधर्व एका मंदिरात गात होते . थिरकवां तिथे आले . दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि उठून घट्ट मिठी मारली . दोघांच्या डोळ्यातून अश्रू घळघळा वहात होते . मग अर्थातच साथीला थिरकवा साहेब बसले . अस प्रेम आणि आदर एकमेकांच्या विषयी . याच थिरकवा साहेबांच्या वर एक फिल्म तू नळीवर पाहिली होती . त्यात त्याचं घर राहणीमान पाहायला मिळत . पण मला विशेष वाटल कि त्याचं वय पंचाहत्तर किंवा जास्त असावं पण एका दृश्यात झोपेत हि टक्कल पडलेल्या डोक्यावर बोट तबलाच वाजवतायत .
आणि एका गायकाची गोष्ट वाचली होती . या गवय्याच्या प्रेमात एक बाई पडली . लग्न झाल . सुरवातीचे दिवस छान गेले . मुलगीही झाली
पण या बाईला छान छौकीची सवय . त्यामुळे पैसा संपला . मग बाई एका धनिकाचा हात धरून निघून गेली . जाताना मुलीला घेऊन गेली .मुलीला भेटायचा प्रयत्न करू नका अस बजावून . या गवय्याला खंत काय जास्त होती कि बच्ची को पूरी तालीम नाही दे पाया . काही वर्षांनी रेडीओ वर त्या मुलीच गाण लागल . हे ते गाणं कुणाच्या तरी घरातून ऐकू येणाऱ्या रेडीओ द्वारे ऐकत होते . गाण संपल आणि यांच्या डोळ्यात पाणी वाहू लागल . बरोबरच्या माणसाने विचारल क्या हुआ उस्तादजी बच्ची अच्छा गायी . तर म्हणे नही, वो ऐसा नही है . पर कसूर मेरा है . मै हि उसे पुरा निवाला नही दे सका . मग हे सरळ निघून शहरात आले . तसेच रेडीओ स्टेशन वर गेले . आधी कुणी ओळखलंच नाही साध्या वेषामुळे . बर्याच वेळाने यांचा चाहता असलेला माणूस आला . यांना पाहून धावत आला . पाया पडला . उस्तादजी आप आज आये ? हमने कितने खत लिख्खे के आपका एक तो प्रोग्राम रेकोर्ड करे . पर आपने जवाब हि नाही दिया . उस्तादजी म्हणाले बेटे आज करले तू रेकोर्ड . जाने फिर मोका मिले न मिले . मग अधिकार्यांना विनंत्या करून रेकोर्डिंग झाल .
उस्तादजीचं गाण प्रसारित झाल . खूप आवडल रसिकांना . मग काही दिवसांनी बातमी आली कि यांची मुलगी परत गाणारेय रेडीओ वर. त्या दिवशी हे परत त्या घराबाहेर उभे राहून आपल्या मुलीच गाण ऐकू लागले . तीही तेच गात होती जे यांनी गायला होत . बाप आपल्यासाठीच गायला हे तिला कळल होत . बापाच गाण ऐकून तिन आपल्या चुका सुधारून गायली . तिलाही हे माहित होत कि आपला बाप आपल गाण ऐकणार . गाण झाल आणि उस्तादजी म्हणाले अब तालीम पूरी हुवी . मैने पूरा निवाला खिलाया बच्ची को . आणि भिंतीला टेकत बसले ते शेवटच .
असे किती तरी कलंदर कलाकार . त्या सर्वांच्या साधनेला प्रणाम .