- तबल्याचे नामकरण आणि विकास -
तबल्याच्या खूप आधी पुराण काळी महादेवाच्या हातात डमरू दिसत. ते आद्य ताल वाद्य असावं. पण तबला हे नाव कस पडल याची कथा प्रसिद्ध आहे.तबल्याच्या आधी पखवाज हे वाद्य होत. कुणा राजाच्या दरबारातील पखवाज वादकाला कुणी दुसर्या कलाकाराने आव्हान दिले. शर्त होती जो हरेल त्याने परत पखवाज वाजवायचा नाही. हि पैज राजाचा कलाकार हरला. त्याने कबुल केल्या प्रमाणे वादन सोडले. पण खूप दुख्खी झाला. ज्या वाद्यावर आयुष्यभर प्रेम केल,मेहेनत केली त्याला हात लावायचा नाही?
मग समोर असलेला पखवाज उचलून जोरात हापटला. त्याचे दोन तुकडे झाले. काय केले हे कळताच रडत रडत ते तुकडे त्याने प्रेमाने सरळ करून ठेवले. त्यांच्या कडे पाहत असता हे लक्ष्यात आल कि हे नव वाद्य होऊ शकत. आणि त्याने तबला तयार केला.
पखवाजचे बोल काढायची पद्धत बदलून वादन केले. मग राजाकडे जाऊन म्हणाला '' महाराज पखवाज तर नाही पण दुसरे वाद्य वाजवू शकतो कि नाही''. राजा म्हणाला जरूर वाजवून दाखवा. मग त्याने त्याचे नवे वाद्य वाजवले. सर्वाना हे वाद्य खूप आवडले.
राजाने विचारले ,पंडितजी ये साज आपने कैसे बनाया ? हा म्हणाला ,बीच मे काटा पखवाज को . राजा म्हणाला ,काटा तब भी बोला? हा उत्तरला हो . मग हि गोष्ट मागे उभ्या असलेल्या प्रधान ,सरदार यांच्यात काटा तब भी बोला अशी पुढे पुढे सांगत येताना तब भी बोला च तबला झाल .
भगवान शंकर अरण्यातून जात असता एका राक्षसाशी त्याचं युद्ध झाल . त्यांनी त्या राक्षसाला मारून उंच भिरकावल आणि निघून गेले . काही वर्षांनी ते परत त्याच ठिकाणाहून जात असता त्यांना घूघू असा आवाज ऐकू आला . कुठून येतो याचा शोध घेतला तर आपण भिरकावलेल्या राक्षससाचे शरीर झाडावर अडकून पडले आहे. त्याचा फक्त सांगाडा उरला आहे . त्या हाडांच्या पिंजर्यावरील चामडी टिकून आहे. आणि त्यातून वाहणाऱ्या वाऱ्याने हा ध्वनी तयार होत आहे हे शंकरांच्या लक्ष्यात आल आणि त्यांनी त्या चामड्या पासून वाद्य तयार केले . अशीहि एक गोष्ट सांगितली जाते . पण या दंतकथा आहेत . याला पुरावा नाही.
त्या काळी धृपद धमार गायकी प्रचलित होती . तिला पखवाजाची साथ असे . नंतर ख्याल गायकी आल्यावर पखवाजाचा घनगंभीर आवाज त्या गायकीला योग्य नव्हता . म्हणून , अमीर खुश्रो नावाचा विद्वान माणूस होऊन गेला. त्याला अनेक विद्या अवगत होत्या. त्याने तबला तयार केला असे जाणकारांचे म्हणणे आहे. याचा उल्लेख सापडतो असे म्हणतात.
आणखी दुसरे असे कि,तबला सदृश एक रण वाद्य लढाईच्या वेळी सैनिकात जोश येण्याकरता उंटाच्या पाठीवर ठेऊन वाजवले जात असे काठीने. त्याला 'तबल्जंग ' किंवा दुग्गी म्हणत. याचाच विकास होऊन तबला झाला असे हि मत आहे.
पूर्वी चामड्याच्या वाद्यांच्या ऐवजी दोरी वापरत. डग्गा- माती,लाकूड,काच ,किंवा लोखंड ,तांब असा धातूचा. हल्ली धातूचे बाये प्रचलित आहेत. त्यात पंजाबी बाया उभट आकाराचा असतो. त्याला शाई ऐवजी पखवाजा प्रमाणे कणकेचा गोळा लेपून वाजवतात . कळशी घाटाचे बाये हि प्रसिद्ध आहेत.
मागे काही वर्षान पूर्वी ड्रम च्या प्रमाणे प्लास्टिक तबल्याच्या पुडी करता वापरून पाहण्याचे प्रयोग केले पण जमले नाहीत. चामड्याच्या वाद्यान ऐवजी ढोलकी प्रमाणे नट बोल्ट लावून पहिले गेले पण कुणाला पसंत पडले नाही. धातू ऐवजी फायबर बायां करता वापरल गेल ते हि चालले नाही.
. एकल वादनात तबलजी काय काय सादर करतो हे पुढच्या वेळी लिहीन म्हणतो.