पहाट झाली. मी उठलो. ब्रश करून चहा घेतला. मोबल्या काढून वर काय ,बघू लागलो. (व्हाट्सप च मराठी भाषांतर:-वर काय
)
अरेच्या रात्री मस्त मैफल जमली होती तर? मग पोस्टवून प्रभात फेरीस निघालो.
भैरू आठवला का बाल भारतीतला बालक विहाऱ्यांनो? तो भैरू आता रिटायर्ड होऊन कैक वर्ष झाली असतील. कदाचित, त्याच्या मुलांची लग्न झाली असतील. मग दोन सुनांमध्ये,भला उसके पास मुझसे अच्छी साडी क्यो?असा प्रश्न उभा राहिला असेल. मग भैरू च्या मुलांची गोची झाली असेल.त्यांनी भैरू कडे वाटणी मागितली.भैरूने नाईलाजाने जमिनीची वाटणी करून घर तीन हिश्यात वाटून एक घराची तीन वेगळी घर केली असतील.तुम्हाला वाटणी दिली पण मी माझा नांगर मात्र माझ्याकडे ठेवणार कारण तो माझा ट्रेड मार्क आहे.त्या मूळच आजचा प्रौढ वर्ग मला ओळखतो.
मुलं म्हणली असतील ठेवा बाबा. तुमच्या मनासारखं होऊ दे. नाहीतरी जमीन राहिलीय कुठं. आम्ही ती विकून बंगले बांधले, गाडी घेतलीय. या घरातील हिश्यात आलेल्या रूम भाड्यावर दिल्यात.
किंवा
भैरू आता शेतावर ट्रॅक्टर घेऊन जातो. इस्रायली पद्धतीने हायड्रो फार्मिंग शिकून एक मुलगा आलाय त्यानं शेती आधुनिक पद्धतीनं करणं सुरू केलंय. भरघोस उत्पादन. ऑरगॅनिक प्रकल्प असल्याने त्यांच्या पिकांना जबरा मागणी आहे. धाकटा मुलगा रत्नांग्री च्या पशु वैद्यकीय कालेजातून डिग्री घेऊन गोधन वाढवतोय. त्याच्या गायीच्या दुधास न तुपास चढा भाव मिळतो. तुपाला तर 2 हजार भाव असून देखील वेटिंग असत. जोड धंदा म्हणून गांडूळ खत, गोमूत्र, शेणी पासून मच्छर मारक औषध अशी प्रोडक्टस ही जोरात विक्री होत्ये. एक सून पशु वैद्यक असल्याने घरचा Dr गुरांना मिळतो आणि आजूबाजूस असलेल्या सर्व गावातील जनावरे तिच्याच अंडर ट्रिटमेंट घेऊन मस्त असतात. दुसरी सून स्वखुशीने घर सांभाळते. तिच्या हाताखालील टीम घर आणि शेत दोन्हीकडच्या भोजन आदी ची व्यवस्था बघतेच पण ती इतर खाद्य पदार्थ तयार करून विकते ज्याला चांगली डिमांड आहे. शेतातील आंबे,फणस,आवळा,जांभूळ, केळी वग्रे फळांची वेगवेगळी उत्पादने करून ती उत्तम नफ्यात विकली जातायत. तिची आणखी एक टीम बाहेरची लग्न मुंजीची ची ऑर्डर घेऊन कॅटरिंग व्यवसाय जोरात सुरुय. नातवंडे इंग्रजी शाळेत शिकतात.
आणि भैरू आणि त्याची बायको अत्यंत समाधानाने हा सगळा व्यवहार भरल्या हृदयी पहात शेतातल्या स्वतः च्या विठुरायाच्या मंदिरात हात जोडत असतात. तिथं नेमाने किर्तन प्रवचन सुरू असतं आणि गाव दर्शनास येत असत.
सलील जोशी।

आणखीन तिथं गेलात ,तर विस्तीर्ण गेट वर पाटी दिसते. भैरू फार्म हाऊस!!! पुढं आलात की गोल आयलंड मध्ये सुबक गार्डन फुललेली असून मध्यभागी तोच जो तुम्हाला आठवतो तो भैरूचा प्रसिद्ध आणि तुमच बालमन व्यापून राहिलेला नांगर त्यांच्या फार्म चा ट्रेड मार्क म्हणून तिथं कायमचा दिमाखात विराजमान झालेला दिसेल. दोन पैकी तुम्हाला आवडेल तो भैरू तुम्ही आपला मानून घ्या. मी निघतो प्रभात फेरीस। दिवस आनंदी जावो।
सलील जोशी।