शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

उस्ताद झाकीर हुसेन

*झाकीर भाई*
लहानपणी बाबांनी कॅसेट आणून दिली.तबला तबला करतोस न ऐक हे.ती ऐकून स्तिमित झालो.अरे हे काय ऐकलं !अस वाजत हातातून?ते झाकीर भाई होते.मग अब्बाजीं ना ही ऐकलं न उगम स्थान समजलं.बाबांना म्हटलं ,शिकीन तर हाच तबला.मग अब्बाजीं कडे शिकायला ही मिळालं.पण आत्ता फ़क्त झाकीर विषयी माझं मन काय म्हणत ते लिहितो.
झाकीर भाई उस्ताद अल्लारखा साहेब चे सुपुत्र.त्यांना दोन भाऊ आहेत ते ही उत्तम तबला वादक आहेतच.फजल भाई आणि तौफिक भाई.आणि बहिणी ही आहेत.
त्यांच्या घरात इंग्रजी माध्यमात शिकलेला प्रथम मुलगा तेच.
ते सकाळी उठत तबल्याचा रियाज करत.जे सरस्वती माते स वंदन करून.मग शाळेत ख्रिशन पद्धतीत प्रार्थना होई.मुसलमान आहेत म्हणून नमाज वग्रे ही असतच.त्या मूळ ते म्हणतात मी सर्व धर्मीय आहे.आणि सर्व धर्म मला तितकेच सारखे आहेत.त्यांना उत्तम तबला वादक म्हणून ओळखतात च लोक.पण ते आधी उत्तम माणूस आहेत हे प्रथम लक्ष्यात घेतलं पाह्यजे.माझं अस मत आहे,कुठलं ही काम करा त्यात तुम्ही हे आत असता तेच बाहेर देता. तर सर्वात आधी त्यांचा हा गुण अतिशय महत्वाचा आहे.
आता तबल्याविषयी सांगायच तर,
अब्बाजिनी त्यांच्या कानात बारश्याला काही कुराण च्या ओळी म्हणायच्या असतात वडिलांनी.त्या ऐवजी तबला च म्हटला. जे अब्बाजींच हि कलाकार म्हणून तबल्यावरच प्रेम ,भक्ती दर्शवत.असे संस्कार असल्याने तबल्याचा ओढा होताच.पण अब्बाजीं नी कधी ही शिक आता माझ्याकडे म्हटलं नव्हतं.त्यांच्या स्टुडंन्ट ना शिकवताना झाकीर भाई बघायचे.ऐकून वाजवू लागले थोडं. मग बऱ्या पैकी.तो वर गल्लीत मुस्लिम सणांना आणि हिंदू सणांना ढोल ताशा वाजवत असत.लहान पोर इतकं तयार वाजवतो म्हणून लोक बोलवून नेत आणि बक्षीस देत.एक दिवस मात्र अब्बाजिनी हे पाहून बसवलं जवळ आणि म्हटलं,तुझे सिखना है दिल से.हे हो म्हणले.फिर कल से तालीम शुरु 'तेरी.त्या दिवशी रात्री प्रोग्रॅम वाजवून घरी आल्यावर अब्बाजिनी उठवलं.हे बघ हे अस वाजवत ,तू ते कसं वाजवशील.अस करत शिक्षण सुरू झालं.
दरम्यान अब्बाजीना कार्यक्रमात वाजवायला या म्हणून पत्र येत जी इंग्रजी असत.झाकीर भाई वाचून परस्पर लिहीत,मैं नही आ सकता मेरा बेटा आयेगा.मग हे जाऊन वाजवून येत.वय पंधरा असावं.
शिव जी रेकॉर्डिंग ला वाजवायला नेत असत.हळू हळू नाव झालं.मग अमेरिकेत अली अकबर यांच्या संस्थेत तबला शिक्षक म्हणून नोकरीत राह्यले.तिथं अजून प्रोग्रॅम मिळाले.रवी जी नी ही साथीला घ्यायला सुरुवात केली.आणि झाकीर हे नाव चमकू लागलं.
फक्त हिंदुस्थानी संगीतात न रहाता तिथं फेमस बँड मध्ये यांनी वाजवायला सुरू केलं.अब्बाजिनी तबला तिकडं फेमस केला होताच तो झाकीर भाई मूळ अजून फेमस न आवडता झाला.सोलो कार्यक्रम ही सुरूच होते.जे आज तागायत सुरू आहेत.हा एक असा तबला वादक आहे ज्याला दुनियाभर सर्वात जास्त प्रोग्रॅम वाजवणारा म्हणून रेकॉर्ड आहे.
त्यांच्या वादन शैली विषयी म्हणायच तर अप्रतिम तयारी च वाजवणं.फक्त माझं घराणे चांगलं तेच वाजविन अस न करता सर्व घराण्यात जे जे उत्तम आहे ते त्या त्या उस्तादचे नाव घेऊन वाजवून दाखवतात आजही.त्यांचा बाया, म्हणजे डावीकडे असणारा डग्गा अतिशय बोलका असतो.थेट हृदयात उतरणारा. त्याना बाया प्लेअर ही म्हटत लोक.आणि दाया बाया च मिश्रण ही लाजवाब असत.तबल्याचा फिक्स कम्पोझिशन असतात च पण उपज नावाचा प्रकार हिंदूस्थानी संगीतात आहे.गुरू न शिकवलं त्या पलीकडं जाऊन वाजवणं.हे झाकीर भाई कडे आहे. त्यांचा तबला हा नुसता तयारीचा नसून प्रचंड बुद्धी चा तबला आहे.म्हणून त्यांनी आज वाजवलेला कायदा उद्या च्या प्रोग्रॅम ला ऐकलात तर काही नवे असत.म्हणून च लोक अजुनी त्यांना ऐकायला जातात.माझं निरीक्षण अस आहे कि, त्यांचे शेकडो कायदे तयार असतील पण कार्यक्रमात ठराविक कायदे ते बरेचदा वाजवत असतात पण आज वाजवला तसा तो उद्या नसतो.हा बुद्धी चा भाग असल्याने झाकीर च्या देह बोली ची किंवा तबल्याच्या टोन ची नक्कल करू शकाल एकवेळ पण तबल्यातील त्याच्या विचारांची नाहीच.तिथं तो माणूस अत्युच पातळी वर असतो नेहेमी.
तबलजी बरेच वेळी सोलो साठी,इन्स्ट्रुमेंटलिस्ट साठी,भक्ती संगीत किंवा नाट्य संगीत साठी,नृत्या करता,फिल्म संगीत करता आपलं प्रभुत्व मिळवून असतात.पण कुठल्याही प्रकारात आणि कुठल्याही आर्टिस्ट बरोबर कधीही उत्तम वाजवू शकेल असा झाकीर च.शिव जी म्हणतात,बाकी कुणी असलं साथीला तर मी त्याला सांगतो कि, मी हे वाजवतोय हा ठेका आहे.पण झाकीर असेल तर मी डोळे मिटून मनात येईल ते सुरू करतो आणि तो अगदी अचूक मला साथ देतो.
ते मान डोलवतात वग्रे म्हणून लोक म्हणतात गिमिक्स वापरतो झाकीर.पण याच उत्तर झाकीर भाईंनी दिल होत ते अस,
मी विदेशात रॉक जॅझ बरोबर वाजवतो.ते लोक केस वाढवून डोकं हलवीत मग मी ही केलं.आणि मी इतकं गुंग होतो लयीत कि ते आपोआप होत.दुसरं लोकांना ही त्यातून बोलांचा भाव समजतो.
त्यांना रेकॉर्डिंग आणि त्याची साधन याच उत्तम ज्ञान आहे.त्या मूळ अमुक गोष्टी ला नेमका इक्विलायजर कसा हवा हे ते नेमकं सांगू शकतात.
फक्त वादन नव्हे तर सिने संगीत ही त्यांनी कम्पोज केलंय. गाण्यात वाजवलाय ही.
उत्तम शिक्षण आणि व्यसनाधीन नसणं ही देखील त्यांची जमेची बाजू आहे.
देश विदेशात भ्रमण करून ही न थकता एअर पोर्ट वरून सरळ स्टेज वर वाजवलेल पाह्यलंय.थकवा नाहीच.कधी ही वेळेत च येतात.जबाबदारीने वागणं त्यांच्यात आहे.गोळ्या घेत वाजवताना पाह्यलंय.
नवीन कलाकारांना समभाळून आणि प्रोत्साहन देत त्यांच्या बरोबर वाजवणं,जुन्या लोकांच्या पाया पडून त्यांचा मान राखून रहाणं आणि समवयस्क लोकांत थोडी चेष्टा मस्करी करत वाजवणं हा ही वेगळं गुण च त्यांचा.
मीडिया समोर बोलताना कुठं ही भरकटुन कधी ही बोलत नाहीत.
देशाचा उल्लेख नेहेमी मेरा हिंदुस्थान असाच करतात.मंदिरात ,गुरुद्वारात ही जाऊन वाजवतात निःसंकोचपणे पण आणि आदर भक्ती न.सरस्वती वंदना संस्कृत मध्ये असख्लीत म्हणतात.गणेश परण न लाजता म्हणून तबल्यावर तसाच वाजवतात.
खूप खूप लिहिण्या सारख आहे.माणूस आभाळा इतका असल्यानं मी खुजा पडतोय लिहिताना.
थोडक्यात सांगायचे तर
अफाट परिश्रम,गजब हुकूमत वाद्यावर, प्रचंड बुद्धी च वादन
आणि माणूस म्हणून ही सर्वांग सुंदर अस लोभस व्यक्तीमत्व.बघितलं की आपोआप हात त्यांच्या पायाकडे च जातात.
त्यांचे दोन्ही भाऊ ही उत्तम वाजवतात.फजल भाई तबला च वाजवतात.तौफिक भाई मात्र झेंबे वादक झालेत.
नितीन झाकीर भाई वेगळे का ? तर त्याच उत्तर थोडं मला शक्य होत तस वर लिहिलंय.
पण त्यांचे सख्खे भाऊ मात्र हात तयार असून त्यांच्या सारखे होऊ शकले नाहीत.फजल भाई म्हणले होते, आमच्या घरी दोन वट वृक्षा सारखी मोठी माणसे असल्यानं आम्ही कितीही वाजवल तरी लोक म्हणतात,यार अब्बाजीं कि तरह नही या झाकीर कि तरह नही .तेच जर स्टुडंन्ट नी वाजवल तर कौतुक होईल पण आमची तुलना मात्र या दोन थोर कलाकारांशी होत राहते.म्हणून तौफिक भाई दुसऱ्या वाद्यांत तबल्याच ज्ञान वापरून वाजवू लागले नी यशस्वी झालेत.
शेवटी या प्रश्नाचं उत्तर असच
झाकीर ,अब्बाजीं सारखी माणसं येतानाच तयार होऊन येतात.अब्बाजीं झाकीर भाई विषयी म्हणले होते,
मैने उसे सिखाया जरूर पर उसे खुदा ने ही भेजा है के जा बेटा नीचे जा के लोगो को तबला सुना.
आणि काय लिहू ?
लेखन सीमा🖌

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

द वॉल

अमेरिकन स्नाईपर शेन त्याच्या स्पॉटर अॅलन सह एका साईटवर वाळवंटात आलेत.
स्पॉटर मंजे स्नाईपर च्या बाजूला च झोपून त्याच्या स्कोप मधून बघून सांगत असतो,
टार्गेट किती अंतरावर आहे.वारा कसा न किती वाहतोय.हवेत ह्युमीडिटी किती आहे.कारण या सर्व गोष्टी वर बुलेट चा प्रवास अवलंबून असतो.या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन ठरवलं जात कधी शॉट घ्यायचा.समोर च्या स्नाईपर न डागलेली गोळी सुटली कि जो आवाज येतो तो जरासा उशिरा येतो.त्या आवाजाला किती सेकंड लागले यावरून अंतर मोजल जात अदमासे.हे सगळं या प्रकारच्या सिनेमात बघायला मिळत.
तर हे दोघे साईट वर दबा धरून बसल्याला 22 तास झालेत.समोर वाळूत एकीकडे क्रेन आहे.एक गाडी आहे,कचऱ्याचा ढिगारा दूर आहे.आ8णि एक दगड रचून उभी केलेली भिंत आहे.
शेन उठून उभा रहातो.आता धोका नाही असं वाटून आणि मैदानात उतरतो खात्री करून घ्यायला कि धोका नाही .एक मुडदा गाडी च्या बाजूला पडलेला आहे.तिकडून जाताना त्याला काही जाणवत तोच एक गोळी त्याच्या शरीरात घुसते आणि तो कोसळतो.पलीकडचा स्नाईपर अजून दबा धरून असतो आणि हे गाफील पण त्याच्या समोर येतात.जोडीदार पडला म्हणल्यावर अॅलन झिग झ्याग धावत येतो.म्हणजे स्नाईपर ला निशाणा घेता येऊ नये म्हणून.पण त्याला ही अचूक टिपलं जात.पायात गोळी बसते.तो त्या भिंती च्या माग आश्रय घेतो.जोडीदाराशी वॉकि टॉकी वरून बोलू लागतो.जराही हलू नको सांगतो.रेडिओ वरून सुटके करता मदत मागू लागतो तर रेडिओ नाकाम होतो.
पायातली गोळी काढतो.इतक्यात वॉकि टॉकी वर आवाज येतो.तू कुठं आहेस.पोझिशन सांग.हा सांगू लागतो. पण बातचीत सुरू असताना त्याला पलीकडच्या ची भाषा अमेरिकन नसल्याच जाणवत.मग सरळ विचारतो तू कोण बोलतोयस ?
त्या स्नाईपर न त्यांची रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्यून करून तोच बोलत असतो.तो म्हणतो माझ्याशी बोलत रहा नाहीतर जोडीदाराला गोळी घालेन तो अजून मेला नाहीये. नाईलाजाने हा बोलत रहातो.दरम्यान शेन शुद्धीत येऊन रायफल घेऊन कचऱ्या च्या ढिगाऱ्याच्या दिशेने शॉट घेऊन बघतो तर पलीकडून गोळी खातो. आता भिंती माग अॅलन एकटाच आहे.तो युक्ती न रायफल हस्तगत करून घेतो.हेलिकॉप्टर चा आवाज ऐकू येऊ लागतो.आपली सुटका करायला येतायत हे दिसताच अॅलन ती भिंत हातानं ढकलतो.या मूळ येणाऱ्या ना आपली उपस्थिती ही कळेल आणि समोर चा स्नाईपर जर हलला किंवा शूट करू लागला तर ते ही समजेल.मग स्वतः रायफल हाती घेऊन त्या ढिगाऱ्याच्या दिशेने नेम धरतो. तिथून 2 बुलेट फायर होताना दिसतात.याच्या आजूबाजूने जातात.त्या फायर च्या रोखाने हा बंदुकीतली एकच असलेली गोळी फायर करतो.पलीकडून उत्तर येत नाही.म्हणजे समोरचा सम्पला. हेलिकॉप्टर लँड होत. दोघांना स्ट्रेचर वर घेऊन विमानात घेतलं जातं.टेक ऑफ होतो ,,,,,
मग
बघा.थ्रिलिंग आहे.

सोमवार, ७ ऑगस्ट, २०१७

मंगळा गौर

 काल आबांच्या वाड्यावर थोरल्या सून बै ची मंगळागौर झाली म्हण.जाता जाता गडबड दिसली म्हणून डोकावलो तेंव्हा समजलं.
लहानपणी माझ्या बहिणींच्या मंगळागौरी झाल्या त्या आठवल्या.
सगळ्या बायका रात्री जमत.पुरुषांना बाहेर पिटाळले जाई. ते सर्व लोक्स मग बाहेरच्या अंगणात पत्त्यांचा डाव मांडीत. आम्हाला ही बाहेर खेळा म्हणत.फक्त मुलींना न बरणी लोक ना आत एंट्री असायची.
आई ताई आत्या सकट सर्व जणी पूजा करायला जमल्यात मग आता जोरात हशा ,टाळ्या न बडबड ती ही मोठ्याने कसली चाललीय म्हणून डोकावलं तर वेगळंच दृश्य.
बसून घालतात म्हणून बस फुगडी,पिंगा,खुर्ची का मिरची वग्रे खेळ असतात ते बघितलं.प्रथमच.त्या ही पेक्ष्या आश्चर्य म्हणजे आई ला हे सगळं सॉलिड जमतंय न सर्वजणी मामी मामी करतायत!एला आई ती गाणी ही फटाफट म्हणतिय!!हे शिकली कधी?घरात एकदाही ऐकलं नाही.या धक्क्यातून बाहेर पडायच्या आधी ,ए मुला तिकडं जा पाहू बाहेत इकडं आज नाही यायच.आई काही यायची नाही.
ओ पण तहान लागलीय.
खेळतोय आम्ही न तुला रे कशी तहान लागते?
सल्या sss आलाच आहेस तर ते कॉफी च ताट ने न दे पुरुष मंडळी ना.पान सुपारी ही बघ बाहेरच्या ताटात सम्पलीय का ती.नसली तर आतून नेऊन दे.आम्ही ही विसावतोय पाच मिनिटं.मग परत आत नाही घेणार.मग कॉफी, पान सुपारी दिली नेऊन.आम्ही ही हाणली दोन दोन कप.मी न माझा आते भाऊ. खडाक, परत दार लागलं.मग आतून परत कल्ला सुरू झाला. या गावचा त्या गावचा पाटील नाही आला ,सुरू.
बाबा ना जाऊन म्हटलं,ओ तुमची बायको बघा कसली गाणी म्हणतिय,खेळतेय.
हा रे म्हैतीय.ताई ची मंगळागौर आहे न.म्हणून न आलोय इकडं.तेच सुरू आहे.मग परत वाटलेली पान हातात घेत म्हणले,किलवर किलवर हुकूम माझा. तिकडून नाना म्हणले,चैला बाळ माझ्या कडे बघायचस तरी करण्या पूर्वी.अस्सा घोटाळा करतोस.ए सल्या ती काता ची डबी दे इकडं.अन बडीशेप सारी सम्पवलीत न टोणग्यानो.
साला इकडं हे लोक बिझी तिकडं त्या आत घी ना त.
एक बरं होत इतक्या रात्री आम्ही क्रिकेट ची बॅट काढली तरी कुणी काही बोलत नव्हतं.हळूच रस्त्याकडेला असलेल्या विहिरी च्या काठावर बसून आलो तरी कुणी काही बोलत नाही.आजूबाजू च्या घराच्या बाहेर चे दिवे सुरू असल्याने लख्ख उजेड दिवाळी सारखा.
मग मध्यरात्री नंतर घुमून घुमून सर्व घुमा बाई दमल्यावर दार उघडलं बॉ एकदाच.त्या वेळी अश्या प्रसंगी ठेवणीतले अत्तर काढलं जाई त्याचा उग्र पण सण समारंभाची जाणीव करून देणारा सुगन्ध ही दारा बाहेर आला.
आटोपलं का तुमच,परत एकदा कॉफी येऊ द्या आमचं नाही झालं अजून.म्हणून पुरुष लोक पुन्हा डावात रंगले.
तर हे सर्व आठवलं हो आबांच्या वाड्यात डोकावून. थोरल्या सून बाई ही झक्क नटल्या होत्या.असो.
मग एक तीव्र इच्छा झाली .त्या लाम्ब नाव वाल्याला सांगावं जाऊन,बघ लेका अशी असते मंगळागौर.
तशी नाही जशी तू दाखवलीस.पेशवीण बाई न मस्तानी खुर्ची का मिरची खेळल्या नसतील तू दाखवल्यास तश्या.
हल्ली ची पिढी हे अनुभवेल का नाही कुणास ठाऊक.हल्ली मंगळागौर ही हॉल घेऊन करतात.त्यात मजा नाही राव.आपल्या घरी मग ते वाड्यात ल नसलं चाळीतील असलं तरी त्यात मंगळागौर साजरी करणं यात च गम्मत होती खरतर त्या खेळात सर्वांग सुंदर व्यायाम ही होतो अशी रचना आहे.पूर्वी बायका स्वयंपाक घरातच जास्त असत. सतत दडपणा खाली.त्यांना या निमित्ताने मोकळीक मिळावी,ऐकमेकींशी थट्टा विनोद करून ताज तवाने व्हावं ही भावना असली पाह्यजे त्यात.
माझ्या आईच च मला आश्चर्य ,कौतुक न अभिमान ही वाटला. आश्चर्य या करता कि या बाईला इतकं सगळं येत ?
अभिमान या करता,
सर्व जणी मामी मामी करीत असत.ए मामी मला बस फुगडी शिकव न.ए मामी परवा पासून आलीय न तुझ्या कड मग आधी काय झालं होतं शिकायला,आत्ता मामी आपण पिंगा च घालूयात.
असा घोळका असे आई भवती.तिला इतकी प्रसन्न पाहून आम्ही ही खूष व्हायचे.
बाकी ही बायकांचं चाले ते ऐकायला मजा यायची.
शके ss कसली भारी साडीय!विदेशी दिस्तीय.
हो म जारजेट आहे जारजेट.यजमानांनी आणलीय हो फारीन हुन.
हं ss नवराच अस्सा गटवलन बोटी वरचा तिचे स्प्रे ही इंपोर्टेड असतात हो,न ती लिपस्टिक ही.
सासू बाई तुम्ही ही सांगा जावयाला म्हणावं एखाद बाटली दिली स सासूला तर काही बिघडत नाही.
हो मी मागतीय.हे आणतात न मला.
अगो आत्ये ते आपलं देशी ,विदेशी बघ वापरून कसं दरवळ त ते.
नको बै ,नाना हपिसातून येतात त्या रस्त्यावर आहे त्यांच ठरलेलं दुकान तिथून आणतात खस,वाळा. आम्हाला नकोत बाई ते विदेशी फवारे महागडे.
शके ही साडी मला नाही हं दाखवलीस अल्ये होते काल तर तुझ्या कड.काय ग किंमत असेल.
रजे बस कर हो चवकशा. तुला ही बघू हो बोटीवरचा नवरा.
ए मग त्या तिच्या हपिसातल्या राजेश खन्ना च कस ग होईल.
तुम्ही उगा भलत सुरू करू नका हो,मामी चल ग आपण खेळू.
अस कै कै चालायचं.