- पसारा -
पसारा म्हटली कि जो अर्थ माहित होता त्या
पेक्ष्या वेगळा अर्थ आज्जी मुळे माहित झाला. हा पसारा कुणी आवरायचा ? असे
आई नेहेमीच म्हणत असे. पण गावी एकदा गडी ढोर घेऊन तळ्यावर निघाला तेंव्हा
मीही त्याच्या बरोबर निघालो. आज्जी म्हणाली ढोर घेऊन काय आजोबा सारखा
पसार्याला का निघालायस ? म्हटल म्हणजे ? मग हा पसारा काय ते तीन सांगितलन.
आमचे आजोबा पीक तयार होऊन डौलात उभी राह्यली कि पहाटे आमच्या धोंड्या आणि
बिल्ल्या या गड्यांना घेऊन आमचे बैल घेऊन निघत. उत्तम तयार असलेल्या पिकात
सोडत. बैलांची पोट तट्ट फुगली कि तोवर उजाडायला लागत असे. लख्ख उजाडायच्या
आत हे सर्व बैल घेऊन घरी येत. मग ज्याच्या शेतात पसारा केला म्हणजे गुर
चरायला सोडली तो येई संध्याकाळी . त्याला कळल नसे कुणी केला पसारा. तर तो
बिचारा ,अण्णा काल कुणी तरी पसारा केला माझ्या शेतात अस सांगू लागे. मग
अण्णा म्हणत अस्स? काय तरी माणसे. पण जाऊ दे आता . कुणाला कळत असे कि
अण्णांनीच केला पसारा . मग तो येउन म्हणे काय अण्णा माझच शेत मिळाल का ?
अण्णा म्हणत नाही रे मी कस करेन . बर आलायस तर ताज्या दुधाचा चहा पिउन जा.
आणि काही लागल तर ने मज जवळून. कधी आमच्या हि शेतात कुणी पसारा करी.
मी आजीला म्हटल ,कुणी रागवत नसत? आजी म्हणाली अरे रोज नाही
कधीतरी गम्मत करीत एकमेकांची . मस्त काळ होता . आता अस कोण करू
धजेल.