सोमवार, ३० जून, २०१४

घर आणि बेघर [[[ भाग २ ]]]

                                                                घर आणि बेघर [[[ भाग २ ]]]

                           घर असणार्यांच ठीक . पण जे अचानक बेघर झालेत त्याचं काय ? कस आणि कुठे राहायचं . गुगुल बाबाला विचारल . त्यान बरेच रिझल्ट दिले . आयला आपल्या डोक्यात जे येत ते आधीही कुणाच्या डोक्यात आलेलं असत. किंवा अस संकट किंवा परिस्थिती आलेले आणखी हि लोक असतात . म्हणून दुनिया गोल आहे म्हणतात कि काय ?
                    तर यावर मिळालेल्या टिप्स अश्या ,
        जर अशी वेळ आली तर गाडीत राहता येईल. कस त्याची माहिती घ्या नेटवर . आपले कपडे आणि आपला अवतार स्वच्छ ठेवा . या करता पाणी सार्वजनिक स्वच्छता गृह वापरा . अशी सोय सरकारी असतेच पण मॉल मध्ये हि असते . स्पंजीग हि परिणामकारक ठरत . म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणसां सारखे दिसाल . तुच्छ कटाक्ष टळतील . एक पाण्याची बाटली जवळ ठेवा . डीहायड्रेशन  होऊ देऊ नका . राहायला ओव्हर ब्रिज खाली सुरक्षित जागा मिळाली तर पहा . पण शक्यतो दिवसा एखाद्या सार्वजनिक बागेत झोप काढा . पोलीसांच सहसा लक्ष जाणार नाही या ठिकाणी . या मुळे रात्री सावध राहून काढता येतील . कारण इतर बेघर किंवा मवाली तुम्हाला लुटायची शक्यता असते . पोलीसही उठवायला येतील ते हि टाळता येईल व पळ काढता येईल . जर काही पैसे असतील तर एखाद्या अश्या हेल्थ क्लब ची मेम्बर्शिप घ्या ज्यांचा शाखा सर्वत्र असतील . म्हणजे तुम्हाला त्यांचे बाथरूम आणि लॉकर वापरता येतील. जिथे तुमच किमती सामान सुरक्षित राहील . खायला अन्न मिळायची सोय काही मॉल मध्ये अन्नाची तारीख बाह्य झालेली पाकीट
दुसर्या दिवशी गरजूंना वाटतात . अश्या ठिकाणी काही किरकोळ काम साफ सफाईची मिळाली तर काही पैसे हि मिळतील . काही वृद्ध लोक आपल्या कुत्रांना फिरायला नेऊ शकत नाही ते शोधा . त्यांना सांगा मी कुत्रे फिरवून आणेन . कदाचित काम मिळेल . अस काय काय होत .
              पण मग लक्ष्यात आल हे आपल्याकडे लागू होणार नाही . मग होमलेस झालात तर कस जगाल या सर्च मध्ये फक्त इन इंडिया टाकल तर फक्त
स्लम्स,धारावी असे रिझल्ट आले . बाकी काय कराल ते काही नाही . आयला कठीण आहे आपल्याकडे होमलेस होण . 

घर आणि बेघर [[[ भाग १ ]]]

                                                           घर आणि बेघर [[[  भाग १ ]]]


               '' अलोन इन विल्डर्नेस '' हि जुनी फिल्म पाहिली होती . एक म्हातारा जंगलात स्वतः घर बांधून राहतो . त्याच कसब बघत रहावस होत . सगळं घर स्वतः उभारतो . आसपास बटाटे वग्रे लागवड करतो . स्वयपाकाला लागणार्या मोठ्या डावा लहान चमचे हे सगळ लाकडापासून तयार करतो . घराच छप्पर करतो तेही पाहण्या सारख . पण हे तो स्वतः कारागीर होता आणि त्या देशात अस घडू शकत . त्याच लगेज विमानाने उतरल होत .
                आपल्याकडे घर घेण अफाट किंमतीं मुळे अवघड किंवा बर्याच लोकांना अशक्य होऊन बसलंय . काहींच अर्ध किंवा जास्त आयुष्य हे घराच कर्ज फेडण्यात जात . ते करताना घरात फक्त डोक टेकायला जायचं . घर रेस्ट रूम झाल्यासारखं . परदेशात फिरती घर असणारे ही लोक आहेत. पण तेही खर्चिक आणि आपल्याकडे निरुपयोगी आहे आज तरी .
                स्वस्त घर कस जमायचं याचा विचार करत होतो . गुगुल बाबा काहीतरी शोधून देतोच . तिथ केरळ का मद्रास लक्ष्यात नाही पण अशी पद्धत शोधलीय कि दोन तीन मजल्यांची वास्तू तीन महिन्यात उभी करता येते . जी भक्कम , भूकंप सहन करेल अशी आहे . अत्यंत उपयुक्त . पण अजून सर्वत्र वापरात नाहीये . मग एक दिवस सुचलं ,बांधकाम चालू असतात त्या साईटवर त्यांच ऑफिस लोखंडी केबिन मध्ये असत . जे इथल काम संपल कि दुसर्या साईट वर नेतात . सुरक्षा रक्षकांची केबिनही अशीच असते बरेचदा . हे मोठ केबिन घर म्हणून वापरायला काय हरकत आहे . एक चौथरा बांधला कि त्यावर आणून ठेवायचं . प्रश्न याच आयुष्य किती ?विज कनेक्शन ओपन झाल तर शॉक लागेल का ? दिवस उन्हात तापेल त्याच काय ? मग परत गुगुल बाबाला त्रास दिला . ह्या केबिन हव्या त्या साईझ मध्ये आणि टोईलेट बाथरूम च्या सोई सहित आहेत . तुमच्या काही कल्पना असतील तर तश्या हि करून मिळतात . आणखी शोधलं तर परदेशात शेतावर राहायला अशी केबिन ट्रक मधून आणून ठेवतात . या केबिनला भिंती इंशुलेट  केलेल्या असतात  . म्हणजे विजेचा करन्ट आणि उष्म्या पासून संरक्षण झाल . आपल्याकडे हि कल्पना माझ्या आधी एकाला सुचली आहे . तो कंटेनर घरात कुटुंबासहित राहतोय . म्हणजे जमिनीचा प्लॉट घेतला कि अस घर आणून बसवायचं .आपल बोरिंग करून घ्यायचं पाण्याकरता . सोलर उर्जा वापरता आली तर आणखी छान .  सीमेंटच घर बांधायचं खर्चिक वेळ खाऊ आहे . पर्याय म्हणून अस घर बांधल तर स्वस्तात होईल . डोक्यात आहे . कधी जमल तर नक्की करून पाहणारेय . साल स्वतः च घर कधी कधी एखाद्याला घर घर लावत पण नाही होत .

शुक्रवार, ३० मे, २०१४

अब्बाजींच्या क्लास मधले दिवस

आज आमच्या स्पावड्या ने झाकीर भाई आणी पंडित जसराज यांच्या कार्यक्रमाची तू नळी वरील लिंक टाकली. अब्बाजींच्या क्लास मधले दिवस आठवले . एके दिवशी झाकीर भाई आले . प्रश्नोत्तरे आणि प्रत्यक्ष वादनातून मार्ग दर्शन असा बेत ठरला होता .झाकीर भाई म्हणाले आज सोलो विषयी बोलू मग कधी तरी साथ संगतीवर . आम्ही सर्व कानात प्राण आणून ऐकायला बसलो . झाकीर भाई म्हणाले ,विचारा काही शंका किंवा प्रश्न असतील ते . कुणीतरी मस्त प्रश्न विचारला ,तुमचा पेशकार कसा वाजवता ?बढत कशी होते ? मग त्यांनी आम्हालाच एक प्रश्न विचारला ,'धा' मे क्या होता है ? आम्ही गप्प . मग आमचा देव सांगू लागला , धा तैय्यार होता है 'ना ' और 'गे' से . तो मेरे पास शुरुवात करने के लीये 'ना' है, 'गे' है और दोनो मिलाऊ तो 'धा' भी है . उसके बाद तबले मै आता है 'ती'.फिर 'तिरकीड ' ऐसे' धा 'से शुरू हुई मेरी फ्यामिली बढती जाती है . और अगर आप लोग पुछोगे के कौनसा ठेका बजाना अच्छा लागता है ? तो मेरा जवाब होगा तीन ताल . क्यूंकी उसमे चार चार मात्रा जाती है और मै लय भी कम रखता हुं . तो ईस वजह से मुझे खेलने के लिये दो मात्रा के बीच बहोत जगह होती है . और अगर इतनी जगह है तो फिर मै सिर्फ तिरकीड भी चला सकता हुं . अब इसमे और कोई बोल नही है . मगर फिर भी इसमे 'तीट' है और 'कीड' है या 'कत' है . मग त्यांनी फक्त तिरकीड पंधरा मिनिट ठाय लयीत चालवून दाखवल .
आणि पुढ म्हणाले, अच्छा इसके बाद आप लोग जो कर ते हो उसपे आते है .
ये चीज कल झाकीर भाई ने बजाई थी वो तो बजाउंगा या फिर अब्बाजी और झाकीर भाई बजाते है वो मै बजाउंगा. आज भले सम पे न आउ पर कोशिश जरूर करुंगा . ठीक है ,पर क्या वो चीज क्या ठीक से समझ मै आई है . याद रख्खो जो गलतिया करनी है रियाज मे . प्रोग्राम मे कोई गलती कभीभी ना होने पाये . और दुसरी बात आप सब लोग तेज बजाने के पीछे लगे रहेते हो . आप लोगोंको बतादू मै हमेशा बहोत तेज नही होता. मै हमेशा क्लियर
बजाता हुं. तो उसकी वजह से तेज लगता हुं . बोलों का निकास हमेशा साफ होना चाहिये . और इतनी जल्दीमे , दो मात्राओं के बीच क्या क्या है तुम देख हि नही पाते . ये तो ऐसे है के हवाई जहाज से निकल गये . जरा जमीन पे चलके देखो रास्तेमे बहोत खुबसुरत झरने ,पेड , पहाड, क्या क्या खूब सुरत चीजे होती है . और तुम लोग कायदे के सारे बल क्युं खोलते हो . कायदे से खेला करो . जैसे अपने कुत्ते के साथ खेळते हो . आप उसके साथ दौडते हो ,चलते हो , रोल करते हो .
मग पुन्हा त्यांनी सांगितल्या प्रमाणे कायदे ते कसे वाजवतात त्याचे प्रात्यक्षिक झाल मग आणखी हि बरच वाजवली आणि म्हणाले, अगली बार साथ संगत पे क्लास लेंगे . पण तो क्लास काही झाला नाही .
तेंव्हा पासून पेशकार काही वाजवावासा वाटत नाही . कारण आता एव्हढ नक्की समजलय कि पाठांतर आणि ते पाठ केलेलं तबल्यावर काढण म्हणजे तबला नाही . पण ज्यांना देव मानतो त्यांच्या कडे शिकायला मिळालं ,ते वाजवतात ते थोड्या प्रमाणात हातात चढवता आलं केव्हढ भाग्य . अब्बाजी आणि झाकीर भाई दोघानाही शिर साष्टांग नमस्कार .

काईट रनर









                                             
                                                                                                                                                         




         काल पाहिला . बरा आहे . पुस्तकावरून बेतलाय . पण भाषा कळत नाही म्हणून गोची झाली . विंग्रजी सब टायटल्स डाऊन लोडवली पण ती हि बेटी चालेनात . पण एक इच्छा पूर्ण झाली . पतंग उडवताना या पतंगाच्या मागून उडवणाऱ्या कडे पाहिलं तर कस दिसेल असा प्रश्न पडायचा. नेमक तसच दृश काय मस्त टिपलाय . त्या मुळे मज्जा आली.



                                          

मतदान २०१४

सकाळी सहा पन्नासला मतदान केंद्रावर हजर झालो . आत सर्व मांडा मांडी सुरु होती . सव्वासात ला त्यांच आटोपलं . आत गेलो . एकानं नाव विचारलं . यादीत नाव मिळाल . पुढे गेलो त्या बाईनी पालिकेनी दिलेली मतदार चिठ्ठी दिली . अंदाजा प्रमाणे बाई बोलल्याच , आय डी प्रुफ ? [ या पालिकेच्या मतदार चिठ्ठीत लिहील आहे . ,या चिठ्ठीचा ओळखीचा पुरावा म्हणून वापर करता येईल . माझ्या मामाला त्या वर विसंबून राहिल्याने परत मतदार ओळख पत्र आणावे लागले . ] हे विचारणार माहित असल्याने मी इतर पुरावे जवळ ठेवले होते ते दाखवले . मग पुढे दुसर्या बाईंकडे गेलो . अजून शाईची बाटली उघडली नव्हती . बाईनी बराच प्रयत्न केला काही जमल नाही . मग कुणी बुवा ती उघडायला घेऊन गेला तो पाच मिनिट आलाच नाही . मग बाईनी नवी बाटली काढली . ती हि उघडता येई ना . मरा म्हटल आता . इतक्यात तो बुवा बाटली उघडून आला . मी डावा हात न सांगता टेबलावर ठेवला . बाई शाईत काडी बुडवून मला म्हणाल्या डावा हात ठेवा . मी तसाच उभा . बाई परत अहो डावा हात ठेवा . मग म्हटल , माझ्याकडे दुसरा डावा हात नाही . मग उजेड पडला बाबा आणि बोटाला शाई लागली . मग मशीनच बटण दाबल . शिट्टी वाजली . मी जाऊ लागलो तर बाईनी परत हाक मारली, अहो बटण दाबल का ? तिथल्या दुसर्या माणसाने त्यांना सांगितल,बाई आवाज झाला कि झालं मतदान . अश्या तर्हेने आज मतदान करणारा पहिला मतदार झालो . अवांतर भाऊ म्हणाला मी बटण दाबल . लाईट लागला पण बीप नाही झाली . म्हटलं देवाला काळजी .

स्वप्न

कसली तरी धुसफूस ऐकू आली . आवाज स्वयपाक घरातून येत होता . आत गेलो तर सर्व पाकसिद्धी चे शिलेदार हमरी तुमरीवर आले होते . काय झाल काही कळत नव्हत . शेवटी आवाज चढवून दम देत म्हटलं , काय झाल ते एकेकानी सांगा . चमचा पटकन म्हणाला काही नाही सगळे जास्त काम कोण करतो या वर वाद घालताहेत . डाव म्हणाली हं फिरला लगेच चहाडी करायला . म्हटल काय चाललाय ? तुम्ही सगळे काम करता म्हणून चालत न सगळ ? काय तक्रार आहे ते एक एक जण सांगा .
चमचा --- मी आपला शांत लटकलेला असतो कुणीही येतो आणि आणि कशात हि बुडवतो . मग न धुता बेसिन मध्ये फेकून जातो . याला काय अर्थ आहे ?
तवा ---- मला तापव तापव तापवतात . काम झाल कि बाजूला ठेवतात . कधी एव्हढा गरम असतो तर लगेच नळाच्या धारे खाली धरून थंड करतात . अरे काही आमच्या तब्येतीची काळजी कराल कि नाही ? बर नीट पोळ्या करता येत नाहीत असे लोक्स करपलेलि कड स्वच्छ करत नाही . मग राब चढतो न अंगाला .
कुकर ---- मी शिट्ट्या मारून अंगातली सगळी गरम वाफ संपवतो पण तंद्रीत असतात सगळे . म टाकतो व्हाल्व उडवून . अरे माझा गळ पट्टा असलेली रिंग बदलत नाही वेळेवर . किती दिवस जुनीच चालवायची ? परत हल्ली नीट काम करत नाही ,बदलायला हवा .
भांडी --- आम्ही तर आदळ आपट करायलाच आहोत . पाणी,ताक ,औषध काहीही पितात आमच्यातून आणि नीट ठेवत नाहीत . आम्ही तोल सांभाळताना पडलो कि आमच्यावरच रागावणार . आम्ही भावंड वेगवेगळ्या उंचीची आणि घाटाची आहो हे लक्ष्यात घेऊन लावा कि आमची रांग ,मग बघा पडतो का?
चमचा समूह --- हो बरोबर . मागे भूकंप आला तेंव्हा आम्हाला फीज वर आमच्या stand ला नीट होतो ठेवलेले म्हणून भूकंप झाल्यावर थरथरून जाणीव करून दिली होती कि नाही . नीट ठेवल नीट वापरल कि असा दुसरा उपयोग होतो आमचा .
कप बशी ची जोडी --- बाकीच्यांचं ठीक आहे . ठराविक वेळेला काम असत . आम्हाला मात्र रात्र नाही दिवस नाही ,पहाट नाही संध्याकाळ नाही कि दुपार नाही . कधीही कामाला लावतात . अरे जीव किती आमचा काम किती वेळेला करून घेता .
ग्यास शेगडी ---- माझ काय वेगळ आहे . मला तर अग्निहोत्रच चालवाव लागत . वर उतू गेलेलं दुध,आमटी कायकाय अंगावर वागवायला लागत .
गाळण --- चैला माझ काम काय ? चहा कॉफी गाळण. पण साय असलेल ताक कधी कधी गाळता . आणि काम झाल कि धुतल्यावर आपटता का?
ताटे ---- आमच्यातल्या मोठ्या लोकांना तर काम देतच नाहीत हल्ली . आम्ही मध्यम आकारची असलो म्हणून जेवायला , मिसळ खायला ,उपमा खायला अस सगळीकडे ओव्हर टाईम का करायचा ? प्रत्येक गोष्टीला योग्य वस्तू वापरा आम्हाला डिश सारख वापरून मिजासच का घालवता .
लायटर --- आता मला तर काही इंधन म्हणून वीज वग्रे लागत नाही न ? म काम झाल कि जागी लटकवा . पाण्यात नाही तर आणि कशात बुडे पर्यंत कट्ट्यावर का ठेवता ?वेळेवर चाललो नाही कि मग आपटण्यात काय हशील ?
वाटी --- आम्हाला विसळल कि नीट पुसून नाही ठेवता येत ? पाण्याचे शिंतोडे वाळले कि डाग दिसतात न अंगावर . [ याला बर्याच मंडळीनी दुजोरा दिला ]
मी --- हुश्श …. झालं तुमच सगळ्याचं . आता माझ ऐका . बाबानो इथ आधी आई होती आता मी आहे . प्रत्येक घरात अस कुणी तरी म्हणजे जास्त करून आई,वाहिनी बायको असा महिला वर्ग .क्वचित एखादा माझ्यासारखा . अरे बाहेरची काम अर्थार्जनाची ,इतर सटर फटर काम ,आणि मुख्य म्हणजे जे भोजन भाऊ आहेत त्यांची आवड निवड ,मर्जी सांभाळत आम्ही तुमच्याच मदतीने त्यांना खुश करायचा प्रयत्न करत असतो . एव्हढी मेहेनत घेऊन तुम्ही आम्ही खपून केलेलं बाहेरच्या खोलीतील लोकांना पसंत पडल कि गंगेत घोड काय हत्ती न्हाला समजा . आता हि तारेवरची कसरत करताना तुमच्या कडे थोडे दुर्लक्ष ,हेळसांड होत असेल त्या बद्दल माफी मागतो . खर सांगू का ? कुकिंग किंवा घर सांभाळणे हा बर्याचदा थ्यांक लेस ज्यॉब असतो बरेचदा . तर सांभाळून घ्या रे भावानो . यावर समस्त किचनकर मंडळी डोळ्यांच्या ओल्याकडा पुसत म्हणली , रडवतो काय आता ? आमच काही म्हणण नाही .तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है . तुझ्यासाठी कायपण भावा . होऊ दे खर्च .
ए … उठ किती वाजले बघ ? रात्री जगायचं पिसी लाऊन आणि सकाळी कुंभकर्ण होऊन पडायचं . पाहतो त बाबा उठवत होते . पण मस्त स्वप्न होत. जर वेगळं

जीवदानीचे रहिवासी


जीवदानीला दर आठवड्याला जातो . हे एकच कुटुंब उरलंय आता . यांचा वावर अगदी खालच्या गणपती मंदिरा पासून ते डोंगर माथ्या पर्यंत असतो . छोटे साहेब लै खोडकर आहेत . वाटेत असणार्या कोंबड्याना घाबरवतो तर कधी त्या मागे लागल्या तर स्वतः घाबरून पळतो . कुठल्या तरी दुकानाजवळ चौथर्या वर गंभीर चेहेरा करून बसलेला असतो . कुणी काही खायला दिल तर स्टाईल मध्ये फक्त बघत राहील . पावसात छपरावरून धावत असतो . आणि हल्ली एक खारुताई ची जोडी दिसते . त्या हि सर्वत्र असतात . कातळावरून तर अश्या धावतात कि नजर ठरत नाही . त्यांचा फोटो काढण कठीण आहे . एक जागी बसतच नाहीत